नवीन लेखन...
Avatar
About विठ्ठल जाधव
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

दुष्काळ

आला म्हणती तो काळ असा पडतो दुष्काळ ||धृ || नसते पिण्यास पाणी नसते खाण्यास धान्य नसते रानात पळपळ नसते वनात सळसळ ||१|| मरती भूकेली गुरंढोरं पडती आजारी पोरंसोरं होई जीवांची तळमळ रडते कडेवर ते बाळ ||२|| मोकळी झालेली गव्हाण दु:ख धरतीचं आंदण होई ओसाड तो माळ राती भेटेना सकाळ ||३|| कुठे घडतेय माळीण कुठे गुडूप किल्लारी […]

आस…

ओळीने चालल्या बगळ्यांच्या रांगा हा निरोप अमुचा त्या ढगांना सांगा तहान लागली धरतीच्या लेका थेंब पावसाचे जमिनीत टाका पुरे झाली आता दुष्काळाची सजा पाषाणहृदयी तू होऊ नको राजा झाडांना दे पाणी जनावरांना चारा धान्याची बरकत जीवांना निवारा ओळीने चालल्या… — © विठ्ठल जाधव शिरूरकासार (बीड) सं. ९४२१४४२९९५

सैनिक आम्ही

सैनिक आम्ही देशाचे टिळा कपाळी मातीचा जिंकविण्या भारतास त्याग करी जगण्याचा एक नारा आम्हा प्यारा ‘जय हिंद’ घोष गगनात पुढे चला रे पुढे चला रक्षण्या देश हा भारत एकच ठावे विजयी व्हावे उरी दाटले निशान तिरंगा पहाडी छाती अभिमानाने सीमा लढवू पार अभंगा — विठ्ठल जाधव शिरूरकासार (बीड) सं.९४२१४४२९९५

शोध

देव देव राहतो कुठे ? सांग आई, सांग आई ! चंद्रावरती, सूर्यावरती आभाळी की धरेवरती? सागरात , पर्वतशिखरी जंगलात की पाण्यामध्ये दगडगोट्यात,धातूमध्ये देवळात की मठामध्ये? शाळामध्ये, घरामध्ये रानीवनी की मुर्तीमध्ये मंत्रतंत्र की ग्रंथामध्ये महाली की कोपीमध्ये ? तुझी वात माझ्यामध्ये माझा दीप तुझ्यामध्ये दिसला गं देव माझा आई, मला तुझ्यामध्ये देव देव राहतो कुठे? — विठ्ठल […]

गुरूजींची बदली

एक बातमी धडकली. गरूजींची बदली झाली. आता ते दुसऱ्या गावी जाणार होते. मनाला वेदना होऊ लागल्या. सरकारी आदेश आला होता. नाईलाज झाला होता. गुरुजींनी बदली मागितली नव्हती. तरीही बदली झाली. मुलं पोरकी झाली. मुलं रडत होती. गाव डोळे पुसत होते. पाठमोरी आकृती धुसर होत होती.  […]

बाजारचा खाऊ

तू एक बहीण आम्ही तिघे भाऊ वाटे टाकू चार मिळून खाऊ, खाऊ बाजारच्या खाऊची मजा असते भारी पुडा सोडताच तोंडा सुटते खारी गोडीशेव, जिलेबी शिळे नको ताजे आई म्हणते कशी नका खाऊ भजे रंग फळांचा दिसे गंज आबलुकवाणी दाताने कुरतडावे जिभेस सुटते पाणी उघडा खाऊ खाऊन दुखेल बरकां पोट पालेभाज्या खाऊन सुधारते ती तब्येत सकस खा, […]

जंगलचे नेटवर्क

कावळ्याचे नवे फेसबुक भलतेच आले बघा रंगात रोजरोज न जाता शाळेत शिका म्हणे नेटच्या घरात कोल्होबाचे व्हॉट्सऍप करते करामती भारी जंगलातील बित्तंबातमी येते लगेच स्क्रीनवरी सिंहाचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा म्हणे जंगली कविता म्हणतो लाईक्स वाढवा म्हणे सारा सोशल मिडिया जंगलात शिरला आहे म्हातारीचा मोबाईल वाघानंं पळवला आहे! जंगलातील शांतता मोबाईलने भंगली कोल्हेकुई,डरकाळी नेटवर्कने थांबली! — […]

सोरड

पिकांनी माना टाकल्या होत्या. उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत होता. नद्या आटलेल्या , कोरडयाठाक पडलेल्या होत्या. अंगाभेवती चिलटं घोंगावेत. पुन्हा हातानं हानावेत. तशी माणसं कावल्यागत झाल्ती . पावसाचा शिपका जूनमधी पडून गेल्ता. त्यानंतर गोमतार शिंपडल्यावाणी तरी यायचं त्यांनी. चार- दोन ढगं आभाळात यायचे . […]

हे यंत्रा!

हे यंत्रा ! तुझी जात कोणती? तुझा धर्म कोणता? तुझा पक्ष कोणता? तू सनातन आहेस? कि पुरोगामी आहेस? तू सजीव आहेस? कि निर्जीव आहेस? का बनवतोस रस्ता? धर्मनिरपेक्ष तुझे काम संविधानावर तर चालतोयस.. मानवी कल्याणासाठी तू.. यंत्रयुगातील तू.. कोणती घ्यावी शिकवण? हे यंत्रा ! विठ्ठल जाधव शिरूर, जि.बीड सं.९४२१४४२९९५

1 2 3 4 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..