नवीन लेखन...
Avatar
About विठ्ठल जाधव
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

शेतकरी पाल्यांचे शिक्षणवास्तव

दरवर्षी शालेय सत्राच्या सुरूवातीस जशी मुलांची, पालकांची शाळासुविधेसाठी धावपळ असते. तशीच रानातदेखील शेतकर्‍यांची धावपळ सुरू होते. नवा वर्ग, नवे मित्र, नवी शाळा, नवे दप्तर , नवे कपडे. सारे काही नवे नवे. या नवेपणाच्या नवलाईत खूप काही बाबी लक्षात घ्याव्या लागतात. शेतातही तसेच असते. नवा पाऊस, नवी पालवी, खते पिके आणि नवे बियाणे. हा काळ महत्वाचा याचसाठी […]

वर्‍हाडाची तर्‍हाच न्यारी….

लग्नसोहळा हा सर्वांच्या आवडीचा विषय. नवरदेव, नवरी, करवले, सोकाण्या, करवल्या, वरमाई, वरबाप , वर्हाड, मांडव, बोहला, जानवसा, देवक,अक्षता, परण्या ,आहेर, वरात हे शब्द मध्यमवर्गाच्या लग्नकार्याची साक्ष देणारे. ग्रामजीवनात लग्नपायर्या ठरलेल्या असतात. हळद लावणे, तेल चढवणे, देवाचे दर्शन, मिरवणूक , मंगलाष्टके, आशिर्वाद, सप्तपदी, सूनमुख पाहणे, भोजन,  रंगनाथ दर्शन, नवरी वाटं लावणे, येतीजाती, सोळावा वगैरे. तसेच वाजंत्री, तोफ […]

पंढरीच्या वाटेवर

महाराष्ट्राला वारकरी सांप्रदाय ही खूप मोठी अध्यात्मिक देणगी लाभलेली आहे.त्यातील वारी हा अविभाज्य भाग. दर आषाढ- कार्तिक महिन्यात असंख्य दिंड्या निघतात. पताका खांद्यावर घेऊन , टाळ आणि मृदंगाच्या गजरात ह्या दिंड्या पंढरीकडे आगेकुच करतात. हरिनामाचा घोष होतो. उत्साही वातावरण असते. मजूर, शेतकरी, व्यावसायिक सर्वच स्तरातील माणसं वारीत सहभागी होतात.आनंदाचे डोही, आनंद तरंग ची अनुभुति घेत.मुलांसाठी हा […]

नवं न्यारं अन् खळ्यात उपनेरचं वारं !

जगण्याचा खरा आनंद हा बालपणीचाच. गावखेड्यातलं जगणं म्हणजे मुक्त छंदातील कविता! मोकाट भटकायचं.मनसोक्त पोहायचं. वाट्टेल तसं जगायचं.गावात जशी माळवदाची घर तशी रानात खळं-दळं, बोंदरी बारदाना आलाच. शिवळाट-जोते, चाढं-ओटी , इळे-खुर्पे, सुतळी दाभण, डांभमेखी. जगातील कोणत्याच शब्दकोशात न सापडणारी शब्दसंपदा. जवळची वाटणारी. ऊन्हाळ्यात रानं निपचित पडल्याली. दिवसभर उन्हाच्या झळायांचा आलेख खालीवर होणारा.खळं आणि जागली ठरलेल्या. आंब्याच्या कैर्या आणि […]

लोककला आणि कलावंतांना राजाश्रयाचा प्रश्न..

जीवन ही एक कला आहे. मानवी जीवनात कला नसेल तर औदासिन्य , दैन्य असेल. कलाकार आपली कला जीव ओतून सादर करत असतो.रसिक त्यास प्रतिसाद देतात. रसिकांचा प्रतिसाद हा कलाकारांचा खरा आनंद असतो. कलाकाराच्या दृष्टीने कला हे त्याच्या जगण्याचे आणि इतरांना आदर्शवत जगवण्याचे माध्यम असते. चित्रकार रंगरेषांच्या, गायक आवाजाच्या, वादक वाद्यांच्या तर लेखक लेखनीच्या माध्यमातून आपली कला […]

ते दिवस…त्या आठवणी..

शाळा गावचं वैभव असते.शिक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती असते. गावचा सुशिक्षीतपणा घेतलेल्या ज्ञानावर अवलंबून असतो. त्या गावात माध्यमिक शाळा आहे. दहावी आणि बारावीतील मुलांना निरोप समारंभाचा कार्यक्रम होता.प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते. मुलामुलींची भाषणं झाली. कार्यक्रम जोरात होता.गावातील प्रतिष्ठित मंडळी भाषण करत होती. अध्यक्षीय भाषण, बक्षीसवितरण कार्यक्रमही उरकला.बराच वेळ झाल्याने मुलं चुळबुळ करत होती. सुत्रसंचलकाने शब्द उच्चारले ‘ […]

माणूस, मरण आणि मसणवटा..

प्रत्येक सजीवाला मृत्यू आहे. जो जन्मतो तो एक दिवस मरतो. माणसाचेही तसेच आहे.तोही मरण पावतो. एकदा शरीरातून प्राण निघून गेला की शरीर निजिर्व होते. मग आप्तस्वकीय दु:ख व्यक्त करतात. रडतात. आक्रोश करतात. त्या व्यक्तीच्या कर्मावर , वयावर या दु:खाची तीव्रता अवलंबून असते. जी व्यक्ती आपल्या जवळ वावरलेली असते.तिचा लळा लागलेला असणे. तिच्या कर्तत्वामुळे अनेकांचे भले झालेले […]

शाळा, शिक्षक, मुलं आणि सकाळ…

पहाट होते.जाग येते.सूर्य उगवतो . तसा वेध लागतो.उरक वाढतो. आंघोळ होते . सकाळचा चहा होतो. आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम सुरू असतात. नियमितपणे. बातम्या , भक्तीसंगीत, आरोग्याचे कार्यक्रम वगैरे. जेवणाचा डबा तयार होतो. तोपर्यंत असते दारात हजर वर्तमानपत्र . ठळक बातम्या आणि संपादकीय पानावर लेख वाचण्याची मजा काही औरच. पक्षांचा किलबिलाट.. मंदिरातील घंटा घण्- घण वाजते. सूर्य किरणं […]

कारखाना

पांडबाच्या छपराच्या भोवताली धूर घोटळत होता.निळ्या रंगात वस्ती गुडूप झाल्ती.वस्तीवर सगळ्या घराच्या चुली पेटल्या होत्या.मसाला भाजल्याचा वास येत होता.काहीतरी गोडधोड ,मसालेदार खाण्याचा बेत सार्‍या वस्तीचा असावा असे वाटत होते. वस्ती धुंदाळल्यासारखी भासत होती. काळ्या कॅरीबॅगा वार्‍यानी उडून जात तराडाच्या झाडाला गुतल्या होत्या.येणारा जाणाराच्या नजरा रोखत होत्या.पळापळ वाढली होती.पोर्‍ही-सोरी लगबगीन इकडं-तिकडं पळत होत्या.गोठयातली जनावरं कावरी-बावरी झाली होती. […]

पटसंख्येवरील मुले शाळेत कधी दिसणार ?

आयएसओ , प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, शाळा सिध्दी, उपक्रमशील शाळा असे नविनच उच्चारण हल्लीच्या शिक्षण प्रक्रियेत ऐकायला मिळत आहेत. तसेच शाळा एक मंदीर आहे. शिक्षक हे पुजारी आहेत . विद्यार्थी हे दैवत आहे . असे काही सुविचार ऐकायला , पहायला मिळतात. एकंदरीत  आजच्या शिक्षणप्रणालीचा विचार केल्यास ती विद्यार्थीकेंद्रित आणि कृतीयुक्त बनलेली आहे. तुला मोठा झाल्यावर काय व्हायचे […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..