नवीन लेखन...
Avatar
About विठ्ठल जाधव
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

वाया जाणारे अन्न वाचवता येईल

लग्नसराई सुरू असते. प्रत्येक जण लग्नाच्या गरबडीत असतो.घरामध्ये उत्साह असतो.याच उत्साही वातावरणात आपण काय करतो.याचे भान नसते. लग्नकार्यात अनेक बाबी हितकारक घडतातच असे नाही. काही परंपरा जपल्या जातात. वधुवरांची मिरवणूक असते. वर्‍हाडींचा थाटमाट असतो. पै पाहुण्यांचे आदरातिथ्य असते. भोजनावळी उठतात.हे प्रत्येक धर्मामध्ये कमीअधिक प्रमाणात घडत असते. त्यामुळे मानवी जीवनात आनंद घेणो हा एक हेतू यामागे असतो. […]

शैक्षणिक सहल आयोजनातील सावधानता

शाळा सुरू असताना अनेक सहशालेय उपक्रम घेतले जातात. स्नेहसंमेलन, परिसर भेट, चावडी वाचन अशा काही उपक्रमाचा प्रामुख्याने त्यामध्ये समावेश असतो.स्पर्धा परीक्षा, रांगोळी स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा , संगीत खुर्ची,जिलेबी रेस, विविध खेळ या उपक्रमामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते . सहल हा भौगोलिक आणि ऐतिहासिक माहीतीसाठी उत्तम प्रकार आहे. गड-किल्ले पाहणे,  धरण, […]

बालविवाह ; विकासातील अडथळा

बालकांनी शिकावे. जीवन जगण्याची कौशल्य प्राप्त करावीत.अनेक क्षेत्रात यश मिळवावे. देशाचे भले व्हावे. या देशाचे सुजान नागरिक व्हावे या अपेक्षेने येथील शिक्षणव्यवस्था चालते . सहा ते चौदा वर्षे वयोगटातील बालकांच्या शिक्षणासाठी कायदा (आरटीई अॅक्ट-2005 ) करण्यात आलेला आहे. कायदे आहेत.यंत्रणा आहे . ज्या स्तरावर त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे तिथे मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. विवाहाचे योग्य […]

ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची आवश्यकता

मानव अभिव्यक्तीप्रधान प्राणी आहे. आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी त्याची धडपड असते.ते झाले तर जीवनात सफलता येते. जगण्यात जीवंतपणा येतो. आपली संस्कृती जतन करता येते. भावभावना आणि सृजनाचा मुक्त आविष्कार होत असतो. प्रबोधन होते. संस्कार होतात. समाज घडतो. सामाजिक घडामोडींचे प्रतिबिंब साहित्यात उतरत असते. तद्वतच साहित्य जगण्याचे नवे भान देते. वेदना, आक्रोश, प्रेम, शौर्य, विद्रोह, हर्ष यासम […]

तुटलेला अंगठा

गुरूजी, तुम्ही सकाळी जरा होता घाईतच लवकर गटवायची असेल ना खेडवळ शाळा ? तुटलेल्या चपलेचा अंगठा जोडून घेताना आज शहराच्या चौकात पाहिले मी तुम्हाला .. तिथेच मारलीत गाडीला मोजून हवा अन् अडकवलात ट्यूशनवाल्याच्या बॅनरला भाकरीचा डब्बा… तसे एकलव्याने गुरूदक्षिणा म्हणून दिलेला अंगठा गुरूजींनो,सरांनो,साहेबांनो परत कधी जोडणार आहात ? परत कधी जोडणार आहात ? ©विठ्ठल जाधव शिरूरकासार, […]

पिल्लू

जाय जाय केलत् जात पण नाय कुतल्याच पिल्लू दुधकाला खाय लेशमाचं त्याच मऊ मऊ अंग तुटतच नाय त्याचा माहा संग कानाला धलून खेलं गाल्या गाल्या उगल्यात त्याला मिशा काल्या काल्या हातभल जीभ कसं कालतय् बाहेल बाबाला पाह्यलं त् चय धूम पलंल हाय हाय केलं त् गुयं गुयं कलल् युव युव केलं त् गोंदा घोलंल छोव छोव […]

महाविद्यालयीन युवतींचे शिक्षण; वास्तव अन् अपेक्षा

गावखेड्यातील मुलं शाळेत येतात. शिक्षण घेतात. तसेच महाविद्यालयातही प्रवेश घेतात. मात्र ग्रामीण भागात शिक्षण घेण्यास आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिक्षणाच्या सोयी अत्यल्प असतात. घरची परिस्थिती नाजूक असते. कृषी संस्कृतीशी निगडित व्यवसाय असतो. घरचे संस्कार त्यांच्यासोबत असतात. गावचे रीतिरिवाज, रूढी, परंपरा यांचा पगडा मनावर असतो. शिक्षण ही संकल्पना जसजशी प्रगल्भ होऊ पाहते, तितकीच ती कठीण […]

बाप रगत ओकतो, दुष्काळा पोटात घेतो…

पोटाचे प्रश्न माणसाला अस्वस्थ करतात.शांत झोपू देत नाहीत. प्रत्येक जीवाला जसे जगण्यासाठी अन्न लागते तद्वतच मानवासही ते लागते.समाज पोटाचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यवस्था निर्माण करतो. त्या व्यवस्थेप्रमाणे कार्यकर्तृत्व करण्याचा माणूस प्रयत्न करतो. कमीअधिक प्रमाणात पोटाचे प्रश्न सुटतातही . तसे भाकरीच्या प्रश्नावर अनेकदा राजकारण होते. चळवळी उभ्या राहतात. समाजकारण होते.क्रांती होते. परिवर्तन होते.’ भाकरी मिळत नसेल तर केक […]

ढासळलेले बुरूज, पडके वाडे अन् पांगलेली वस्ती

स्वातंत्र्यानंतर गावखेडी बदलत गेली. गुलामगिरी संपली. स्वराज्य आणि सुराज्य बहरू लागले.पाश्‍चात्य गेले. जुलमी राजवट संपली.इंग्रज गेले . भारतात सुरू झाला तो स्वातंत्र्याचा उपभोग. देशाने लोकशाही स्वीकारली. गुलामीत वास्तव्य केलेल्या खेड्यात नवी पहाट उगवली. स्वातंत्र्स संग्रामासाठी केलेला त्याग पाठीशी होता. देश बदलतो आहे. प्रजासत्ताक प्रशासन प्रणाली, लोकशाही जीवनव्यवस्थेचा स्वीकार झाला. देशात शहरे बदलत गेली तसा खेड्यातही बदल […]

ऊसतोड मजुरांचे स्थलांतर चक्र

ऊस हे नगदी पीक आहे. ते पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. पश्‍चिम महाराष्ट्रात भरपूर ऊस होतो. तर मराठवाड्यात कमी पर्जन्यमान असल्याने येथील शेतकरी, शेतमजूर ऊसतोडीचा पर्याय निवडतो. दिवाळी – दसरा सणादरम्यान बहुतांश साखर कारखाने सुरू होतात. हंगाम सुरू होण्यासाठी बैलगाडी,ट्रॅक्टर, ट्रक यांचा वापर ऊस वाहतुक करण्यासाठी केला जातो. ऊसतोडीस मजूर लागतात. त्यांना उचल, आगावू रक्कम दिली जाते. […]

1 3 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..