नवीन लेखन...

शेळीचे मानसशास्त्र !

शेतीपुरक व्यवसायामुळे शेतजीवनात मदत होते. हे तत्व ओळखले होते. आमच्याकडे तीन शेळ्या जोबतीला होत्या. आजही आहेत.पण तीसेक वर्षापुर्वीची ही घटना. हरणासारख्या रंगाच्या. लांबलचक. ऐटदार. त्यांची करडं तर मऊसूद आणि आबलुक दिसायची. पोरांना त्याचं भारी आकर्षण. दिवाळीला लोकरीचा कंडा (गोप) तयार करून त्यांच्या गळ्यात घालण्यात मुलं दंग असायची. त्यांच्याबरोबर खेळण्यात मजा असायची.करडाच्या अंगावर बसुन गाड्या-गाड्या खेळणं. हा आवडता खेळ. तेही शिंगानी मारायचे पण लटकेच.अवसानात होती. ते झापाखाली कोंडलेले असत. मुलांना पाहिलं वा आवाज ऐकला. ओरडत. डोकायची सवय झालेली. शेळ्या ओळखीच्या. दुधावर घरादाराचं चहापाणी भागायचं.एका शेळीला हातभर दाढी. म्हणून तिचं नाव ‘ दाढीवाली ‘ . एकीचे शिंगे अकोला (बाकदार) म्हणून ती ‘आकुली’. तिसरीचे शिंगे बरोबर चिन्हं. खिलार. म्हणून तिचं नाव ‘खिल्लारी’. दोन शांत होत्या. पण त्यातली आकुली नावाची शेळी जरा आघाव होती. मारायची.दावं तोडून , मेखी उपटून पळायची . तिला सगळेच वैतागलेले. एक दिवस गावात लग्न होतं.त्यादिवशी मोठी माणसं लग्नाला.पोरंच घरी. शेळ्या सोडायच्या होत्या. चारायला न्यायच्या होत्या. पर्याय नव्हता. त्या ओरडायला लागल्या. विचार केला यांना खायला आणून टाकावं कि बांधाला चारायला न्याव्यात. बेस्ट वे म्हणजे चारायला घेऊन जाणे.सोडल्या. दावं तसेच गळ्यात.घुंगराच्या माळांचा खळ्ळ आवाज करत पळू लागल्या. शेळ्या कशा वळायच्या ? याचं एक शास्त्रच ! ते अनुभवाशिवाय शिकता येत नाही. चर्हाटाला धरून बांधाकडं नेली.तिकडं हेकळा आणि टाकळाची झुडपं जास्त. लवकर खाऊन लवकर फुगतील ही अपेक्षा. आकुली शेळी जशी सोडली. तशी धूम् पळायला लागली. ती कशावरच तोंड टेकीना. तिला पायखुटीची सवय होती.

एक युक्ती सुचली.सडक लाऊन बांधुयात.तीन शेळ्या एकमेकीत अडकणार नाहीत याची काळजी घेतली.एका झुडपाला एकेक बांधली. आकुलीनं ते उपटून घेतलं.बळच पकडली.चर्हाट हातात घेतलं. तरीपण ओढ घ्यायची.पळायची. ओढता-ओढता हाताला पडला फास्सा. ती ओढतच होती.जमिनीवर कधी आडवं केल ते कळलं नाही. एका हाताला फासा.ती ओढतेय. पळतेय. रानारानात. काट्याकुपाट्यात. एक किलोमिटरचे अंतर पार केल्यावर एका झुडपाला हे लटांबर गुतलं.त्यातून कशीबशी सुटका करून घेतली.अंगाची सालपट निघाली.रडत-पडत. कन्हत. तिला शिव्या हासडल्या. हाताची ओळखनं अजुनही आहेत.मनातही आहेत! वाडगं, काठी, खर्हाटा, अमोनिया वायू, भोरकडी, आळपा , पायखूट या शब्दांसह शेळीच्या मनाच्या शास्त्राचा अभ्यास तिथेच सुरू होतो! तो शेळीपालनासाठी उपयुक्त ठरतो.

विठ्ठल जाधव
शिरूरकासार, जि. बीड

मोबाईल – ९४२१४४२९९५

Avatar
About विठ्ठल जाधव 57 Articles
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..