नवीन लेखन...
Avatar
About अशोक मारुती भेके
मी लहापणापासून मुंबईतील घोडपदेव या श्रमजीवी भागात राहत असून सध्या मी बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत सेवेला आहे.

एक चित्रकर्मी: श्री मोहन लोके

लहानपणापासून जे पाहिले, अनुभवले त्या क्रित्येक प्रसंगाची, व्यक्तीची, व्यंगाची, चालीरीतींची अनेक प्रतिबिंब मनावर कोरली गेली आहेत. अशीच एक व्यक्ती समईच्या प्रकाशात शिवपिंडीवर विराजमान असलेल्या बेलपत्रावर गुलाबाच्या फुलाने छानपैकी विराजावे त्याप्रमाणे मनाच्या सांदीकोपऱ्यात दडलेली आहे. ती महानता आपणां सर्वाना ठाऊक असेलही.पण त्या व्यक्तिमत्वाकडे पाहिले तरी एक गोड कहर उसळतो. वामनमूर्ती … गव्हाळवर्णाची आणि सदैव प्रसन्न आणि हसतमुख […]

खांदेरीच्या पोटात दडली विजयगाथा

पोर्तुगीझांबरोबर स्वराज्यास त्रास देणारे जंजिरेकर सिद्दी आणि इंग्रज यांना शह देण्यासाठी, इंग्रजांची सिद्दीला मिळणारी रसद ठप्प करण्यासाठी, या दोन शत्रूच्या मुळावर पाचर ठोकण्यासाठी अलिबाग आणि मुंबईच्या मध्यावरील बेटांवर छत्रपती शिवरायांनी बांधलेला किल्ला…. खांदेरी. खांदेरी म्हणजे इंग्रजी भाषेत हेनरी. यानंतर सिद्दीने दीड किलोमीटर असलेल्या बेटावर उंदेरी किल्ला बांधला. अलिबागसमोरील खोल समुद्रात हे जलदुर्ग आहेत. मुंबई समुद्र किनाऱ्यावरून दिसणारे […]

धन्य तो पिता

एक जेमतेम शिकलेला पिता. नांव त्याचं शिवशंकर कोळी. सोलापूर शहरात राहत होते. त्यांना शिवपार्थ नावाचा लहान मुलगा माध्यमिक शाळेत शिकत होता. चुणचुणीत आणि तल्लख बुद्धीचा.खेळाची आवड होती. त्यात तो फुटबॉल खेळण्यात अत्यंत निष्णात. गेल्या काही दिवसापूर्वी शिवपार्थ मैदानात फुटबॉल खेळत होता. रखरखतं ऊन होत. सूर्य आग ओकत होता. खेळता खेळता शिवपार्थ उष्माघाताने कोसळला. उपचारासाठी जवळच्या सरकारी […]

सोनारांचे कान टोचण्याची गरज !

कधी काळी भारतात सोन्याचा धूर निघत असे. खरं आहे. सोने हे आपले सर्वांचे आकर्षण. एक चांगली गुंतवणूक म्हणून पाहताना आपण अन्य गोष्टींपैकी सोन्याला विशेष प्राधान्य देत आलो आहोत. दीर्घकाळात सोन्याचा परतावा योग्य येऊ शकतो या कारणास्तव सोने  म्हणजे भविष्यातले आपले तारणहार पण हिला निर्जीव गुंतवणूक म्हणू या …! कारण या पासून आपल्याला व्याज असे काही मिळत […]

भटक्या कुत्र्यांची दहशत

‘समर्थाघरचे श्वान, त्यास सर्वही देती मान’ असे म्हटले जाते, पण रस्त्यावरच्या बेवारशी कुत्र्यांच्या नशिबी मात्र आयुष्यभर हाड्तुड सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. परवा एक भटका कुत्रा माझ्या अंगावर भू भू करीत आला.सोबत त्याची सवंगडी खानदानही भुंकू लागली.  मला त्याचे विशेष असे काही वाटले नाही. उलट मला त्या भुंकणाऱ्या कुत्र्यांची दया आली. या कुत्र्यांसाठी माझे काहीतरी योगदान आहे. […]

डॉक्टर  नावाच्या देवांनो…….!

एका दु:खी बापाचे काय सांगू गाऱ्हाणे…..! काळाने उलटा डाव टाकला होता हसतं खेळतं बाळ अंथरुणाला खिळलं होतं. एक दिवशी काळ उगवला अन बाबूचा बबन्या देवाघरी गेला. डेंग्यूने एक बळी घेतला होता. बाबु हतबल झाला. तीळ तीळ तुटला. बाबु होता कणखर तरीही वाहत होती डोळ्यातून आसवांची खळखळ…! एखादे फुल उमलण्याच्या आधीच नष्ट झाले. त्या मात्या- पित्यावर झालेला […]

अविस्मरणीय गांधीजयंती सप्ताह

आठवणींमध्ये रमण्याचा छंद सगळ्यांनाच असतो. ‘गुजरा हुआ जमाना’ आपल्याला नेहमीच वर्तमानापेक्षा अधिक रमणीय भासतो, कारण त्यात आठवणींचे गहिरे रंग भरलेले असतात. सुख-दुःखाचे प्रसंग, जुनी माणसं आठवताना आपलं मन भरून येतं.पण अप्रूप वाटावं त्या उत्सवाचं अर्थात हुतात्मा बाबू गेनू यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या घोडपदेव विभागातील  श्रीकापरेश्वर मंदिराच्या प्रांगणात होत असलेल्या महात्मा गांधी जयंती सप्ताहाचं. मराठी मातीत वाढलेल्या, रुजलेल्या […]

विशाल जुन्नर आणि विश्वासार्हता

परवा निवडणुकीच्या निमित्ताने एका संस्थेशी संबधित एक सज्जन संचालक गृहस्थ आम्हाला म्हणाले, संचालक म्हणजे लांडगे आहेत. लांडग्यांचा कळप…  एक लांडग्याला जमिनीत पुरतात.फक्त मुंडके वर ठेवतात. ते पाहण्यासाठी बकऱ्या जातात तेव्हा लांडगा त्याला हव्या असलेल्या बकऱ्यांचा तोंडात पाय करकचून पकडतो. त्यामुळे अन्य बकऱ्या पळून जातात. मग पकडलेल्या बकरीचा समाचार घ्यायलाl लांडगे  लक्ष्याच्या ठिकाणी एकत्र येतात. तेव्हा सज्जन […]

मला भावलेला चित्रकार : श्याम हुले

आठवणीतील माणसं हे सदर लिहिताना अनेक चेहरे डोळ्यासमोर आले अन रेखाटले गेले पण काल घोडपदेव नाक्यावर लागलेला भाऊ यांचा फलक पाहिला आणि श्याम हुले नावाचं व्यक्तिमत्व अलगद अंत:चक्षूसमोर उभं राहिलं. त्यांच्या स्मृतीगंधाची दरवळ मनात रेंगाळू लागली. काळाच्या ओघात आपण अशा अनेक व्यक्ती आणि वल्ली पाहतो आणि विसरून जातो. फक्त   आजूबाजूच्या आणि रोज च्या जीवनातील व्यक्ती लक्षात […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..