Web
Analytics
एक होतं गाव – Marathisrushti Articles

एक होतं गाव

एक होतं गाव.
“महाराष्ट्र” त्याचं नाव.

गाव खूप छान होतं,
लोक खूप चांगले होते.

“मराठी” भाषा बोलत होते,

गुण्यागोविंदानं नांदत होते.
त्यांचं मन  खूप मोठ्ठं होतं.
वृत्ती खूप दयाळू होती.

दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे.
आल्या-गेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ
देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे,

महाराष्ट्रात होता एक भाग.
“मुंबई” त्याचं नाव.

मुंबईसुद्धा छान होती;
महाराष्ट्राची शान होती.

सर्वांच्या आकर्षणाची बाब होती.
आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते.

इथं आले, की इथलेच होऊन
राहत होते.

“अतिथी देवो भव…!”

या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं.
पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले.

हळूहळू परिस्थिती बदलू
लागली. “अतिथी”
जास्त आणि “यजमान” कमी झाले.

मुंबई  कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली. सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती.

मराठी आपली वाटत नव्हती.

प्रश्न ?मोठा गहन होता,पण माणसं मात्र हुशार होती, दूरदृष्टीची होती.

त्यांना एक युक्ती सुचली.
दूरदेशीची परदेशातील
भाषा त्यांना जवळची वाटली.

त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील,  परदेशात जातील, उच्चशिक्षित होतील. सर्वांचाच,अगदी “महाराष्ट्राचा” ही विकास होईल, म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली.

आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली.
आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली, शिकवू लागली,

आणि मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना, मराठी कोणीच बोलेना,
बोलीभाषा ही बदलली.

सगळ्याचा नुसता काला झाला.
शुद्ध, सुंदर मराठीचा लोप झाला.

अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर

माफ करा हं……..

आपल्या ‘मम्मी’ बरोबर एकदा वाचनालयात गेला.

चुकून त्याचा हात एका  पुस्तकावर पडलं, त्यानं ते उघडलं. पुस्तक शहारलं, पानं फडफडली, आनंदित झाली.

त्यांना वाटलं, चला निदान आज तरी आपल्याला कोणी वाचेल.

इतक्यात त्या मुलानं
विचारलं, (त्याच्या भाषेत)
“मम्मी” कोणत्या भाषेतलं पुस्तक आहे गं हे ?”

‘मम्मी’ खूप सजग होती,
मुलाचं हित जाणत होती, सगळं ज्ञान पुरवत होती.

पुस्तक  परत जागेवर ठेवत म्हणाली, “अरे, खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबांच्या वेळेस, “मराठी भाषा” प्रचलित होती; आता कोणी नाही ती बोलत.

पुस्तक कोमेजलं, पानं आक्रसली, पानांपानांतून अश्रू ठिबकले;
पण……………….

हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं. कारण, आता मराठी साठी दुःखी  होणारं काळीज कोणाचंच उरलं नव्हतं.!!

महाराष्ट्राची शान “मराठी”भाषा!!!

मला एकानी विचारले तू मराठीत का ‘पोस्ट’ टाकतो….??? आणि,
मी त्यांना एवढंच म्हटलं,

आमच्या घरात “तुळस”आहे,
‘Money plant’नाही.

आमच्या घरच्या स्त्रीया  “मंदीरात” जातात,
‘PUB’ मध्ये नाही.

आम्ही मोठ्यांच्या  पायाच पडतो, त्यांच्या डायरेक्ट गळ्यात मिठी मारत नाही.

आम्ही “मराठी” आहोत,
आणि मराठीच राहणार !!!

तूम्ही English मध्ये मेसेज केलात तरी मी रिप्लाय
मराठीतूनच देतो,

याचा अर्थ असा नाही की, मला English येत नाही,

अर्थ असा आहे की, मी आपल्याला मराठी शिकवतोय.

अरे गर्व बाळगा तुम्ही मराठी असल्याचा…

“तुळशी” ची जागा आता
‘Money Plant’ ने घेतलीय…!!

“काकी” ची जागा आता ‘Aunti’ घेतलीय…!!!

‘वडील’ जिवंतपणीच “डेड” झालेत.

अजुन बरंच काही आहे, आणि तुम्ही आत्ताच Glad झाले….???

“भाऊ” ‘Bro’ झाला…!!
आणि “बहीण ” ‘Sis’…!!!

दिवसभर मुलगा “CHATTING” च करतो… नाही तर रात्री झोपताना Mobile वर ‘SETTING’ पण करतो…!!!

दुध पाजणारी “आई” जिवंतपणीच ‘Mummy’झाली.!!

घरची “भाकर” आता कशी आवडणार हो…

५ रु. ची ‘Maggi’ आता किती “Yummy” झाली…!!!

माझा मराठी माणूसच “मराठी” ला विसरू लागलाय….

आपली संस्कृती लोप पावण्यापुर्वी ती जपण्याचा निदान प्रयत्न तरी करा !!!

 

 

About Guest Author 512 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…