नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – ४७ )

आज सकाळी विजय त्याच्या कार्यालयात जाण्यासाठी त्याच्या इमारतीतून बाहेर पडला. त्याच्या हातात पाण्याने भरलेल्या दोन बाटल्या होत्या. इमारतीच्या खाली त्याच्या ओळखीचे एक गृहस्थ भेटले त्याच्या हातातील पाण्याच्या बाटल्या पाहून ते म्हणाले, ” ह्या बाटल्यांची हमाली उगाच कशाला करतोस ? त्यावर विजय त्या गृहस्थाला म्हणाला, ” महिनाभर जर मी पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन पाणी प्यायलो तर १२०० रुपये होतील आपल्या इमारतीचा मेंटेनन्स फक्त ८०० रुपये आहे. विजयचे हे उत्तर ऐकून तो गृहस्थ गप्पच बसला. विजयने जो विचार केला होता तो विचार त्या गृहस्थाने स्वप्नातही केलेला नसेल. विजय नेहमीच इतरांपेक्षा वेगळा विचार करतो म्हणूनच कोणी त्याच्या तोंडाला लागत नाही कारण त्याच्या प्रत्येक कृतीचे त्याच्याकडे कोणालाही पटेल असे स्पष्टीकरण असते. हा घरातून पाण्याच्या बाटल्या न्यायचा विचार विजयच्या मानत काही लगेच आला नव्हता. जवळ – जवळ आठवडाभर पाणी विकत घेऊन प्यायल्यावर हा विचार त्याच्या मनात आला होता. विजयच्या घरात बाथरूम आणि न्हाणी घरात छोटी ट्यूबलाईट होती जी वोल्टची होती. विजयने त्या जागी ९ वोल्टचे एल इ डी बल्ब लावले. त्यानंतर विजेचे बिलही कमी येऊ लागले. विजय आणि विजयच्या बाबांमध्ये नेहमी पंखा फास्ट ठेवण्यावरून भांडण होत असे कारण त्यांच्या मते पंखा जास्त फास्ट ठेवला तर जास्त लाईट बिल येते. तर विजयचे म्हणणे होते तसं काही नसत ! पंखा फास्ट ठेवा नाहीतर स्लो ! बिल यायचे तेवढेच येते. विजयचे बाबा आजही त्यांच्या मतावर ठाम आहेत आणि विजय त्याच्या मतावर आपले मत बाबांना कसे पटवून दयायचे हे विजयला अजूनही कळलेले नाही. त्यामुळे त्याने गुगलवर सर्च केले असता त्याला कळले कि पूर्वीचे इलेकट्रीक रेग्युलेटर पंखा  स्लो असतानाही  विजेची बचत करत नव्हते पण सध्याचे इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर विजेची किंचित बचत करतात म्हणजे आजच्या क्षणाला विजयचे बाबा बरोबर होते. त्यामुळे आता यापुढे गरज नसताना विजय पंखा स्लो ठेवणार होता. विजय पूर्वी ज्या कारखान्यात कामाला होता त्या कारखान्यातील ट्यूब बल्ब पंखे विनाकारण सुरु ठेवत नसे आजू बाजूचे लोक त्याला म्हणत मालकाचा खूपच फायदा करून देतोस त्यावर विजय म्हणत असे मी मालकाच्या फायद्याचा नाही तर देशाच्या फायद्याचा विचार करतो…आपण वाचविलेल्या विजेमुळे कित्येकांच्या घरात उजेड होऊ शकतो. विजयच्या घरातील कोणताही नळ जर टपटप गळत असेल तर तो तो लगेच बदलून टाकतो कारण त्यामुळे पाणी वाया जाते हे महत्वाचे कारण आणि वास्तुशास्त्राच्या मतेही ते अशुभ असते. आपल्याकडे कितीही पैसे साधने धन – संपत्ती असली तरी काही गोष्टी अशा आहेत ज्यांची  बचत आपल्याला करावीच लागेल नव्हे तर ती बचत करणे हे आपले कर्तव्य आहे. त्या गोष्टी आहेत पाणी , वीज आणि इंधन, या निमित्ताने विजयला कोठेतरी वाचलेली एक गोष्ट आठवली एक गावात एक खूपच कंजूस व्यक्ती राहत असतो. तो त्याच्या घरात त्याचे ज्या भागात काम असेल तेवढ्या भागात गरजे  पुरता दिव्याचा उजेड करून काम करत असे.  एक दिवस काही लोक काही सामाजिक कार्यासाठी त्याच्याकडे रात्री देणगी  मागायला जातात तर त्याच्या घरात सगळीकडे अंधार असतो आणि एका टेबलावर एक छोटा दिवा लावून वाचन करत असतात ते दृश्य पाहून देणगी मागायला आलेले लोक विचार करतात की हा माणूस तेलाचीही इतकी बचत करतो तो आपल्याला देणगी काय देणार ? तरीही ते आत जातात आणि आपण  कशासाठी आलो आहोत हे त्या गृहस्थाला  सविस्तर सांगतात ते ऐकून ते गृहस्थ त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूपच जास्त देणगी देतात. त्याचे त्या देणगी मागायला आलेल्या लोकांना आश्चर्य वाटते आणि ते म्हणतात, आम्हाला वाटले होते तुम्ही खूपच कंजूस आहात ! कारण सध्या दिव्यातील तेलाचीही तुम्ही बचत करता ! त्यावर ते गृहस्थ म्हणाले,” मी त्या दिव्यातील तेलाची बचत करतो म्हणूनच तुम्हाला ही देणगी देऊ शकलो… त्यातून  काय समजायचे ते लोक समजले आणि या कथेतून काय समजायचे ते विजयलाही समजले होते. दोन चार दिवसापूर्वी विजयला त्याचा एक मित्र काही काम निमित्त त्याला भेटायला आला होता. विजय मागील चार वर्षांपासून एकच मोबाईल वापरत आहे. या चार वर्षात त्याचे चार मोबाईल झाले होते. तो विजयला म्हणाला, आता मोबाईल बदलून टाक ! नवीन मोबाईल घे ! त्यावर विजय त्याला म्हणाला,” हा मोबाईल उत्तम चालतोय त्याच्यात काहीही समस्या नाही आणि मला नवीन मोबाईलची काही गरज नसताना मी विनाकारण नवीन मोबाईल का घेऊ ? आज प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात एक मोबाईल असतो तो हल्ली प्रत्येक वर्षला बदलला जातो. हातात पैसे असतील तर रोकड आणि नसतील तर ई एम आय वर घेतला जातो तोही हजारोच्या किंमतीत ! हल्ली लोकांकडे बाईक असते पण त्यात पेट्रोल भरायला पैसे नसतात. तसेच महागडे मोबाईल असतात पण ते रिफील करायला पैसे नसतात. एका कुटुंबात जर पाच व्यक्ती असतील तर वर्षाला फक्त मोबाईलवर त्यांचे जवळ जवळ ५०,००० रुपये खर्च होतात. अशा कुटुंबाकडे वेळेला ५००० रुपयेही नसतात हे दुर्दैव आहे…

एकदा बसमध्ये चढताना विजयच्या शर्टच्या खिशातून फक्त १० रुपये मारले आणि पाकिटात ५०० रुपये असताना पाकीट मारले तेव्हापासून विजयने पाकीट विकत घेतले नाही आणि शर्टाच्या वरच्या खिशात तो एक रुपयाही ठेवत नाही. काही दिवसापूर्वी विजयला एका बँकेने जबरदस्ती क्रेडिट कार्ड दिले ते ही त्याने एकदाही वापरले नव्हते पण एकदा ऑनलाईन मोबाईल रिचार्ज करताना चुकून ते पैसे क्रेडिट कार्डमधून कापले गेले ते ही त्याने दुसऱ्या दिवशी लगेच भरून टाकले…. विजयच्या भावाच्या मते ज्याच्यावर जितके जास्त कर्ज असते तो तितकी जास्त मेहनत करतो पैसे कमावण्यासाठी ! पण विजयावर कोणाचे एक रुपयाही कर्ज नव्हते. विजय ज्या कारखान्यात कामाला होता त्या कारखान्यातूनही त्याने कधी एक रुपयाही कर्ज घेतलेले नव्हते म्हणूनच त्या कारखान्याच्या मालकाचा प्रचंड गैरसमज झाला होता की विजयला पैशाची फार काही गरज नाही म्हणूनच त्याने त्याला वर्षानुवर्षे पगार वाढविला नाही. विजयने लग्न केले नाही म्हणूनच कदाचित त्याला व्यवहार कळला नाही आणि त्याच्यावर कर्ज काढण्याची वेळ आली नाही. पूर्वी विजयला त्याच्या बाबांनी पतपेढीतून काढलेले कर्ज फेडता फेडता नाके नऊ आले होते. त्यामुळे विजय कर्ज प्रकरणापासून चार हात लांबच राहतो. त्याला मिळेल त्याच्यात सुखासमाधानाने राहायला आवडते. त्याने त्याच्या सर्वच गरजा खूपच संकुचित करून घेतलेल्या आहेत. त्याला विशिष्ट अशा कोणत्याच गोष्टीचा मोह उरलेला नाही. पूर्वी तो महागडे बूट, महागडे कपडे वापरत असे पण आता तसे काही राहिलेले नाही. विजयला निरर्थक गोष्टींना जवळ करण्यात काहीही रस उरलेला नाही. त्याला आता हवे आहे ते अंग टेकण्यापुरता निवारा, अंग झाकण्यापुरते कपडे आणि पोट भरण्यापुरते सात्विक अन्न… विजयने महिन्यातील पाच दिवस जरी काम केले तरी सध्या  विजयच्या या गरजा पूर्ण होऊ शकतात. मग कशाला हवी ! ती धावपळ , दगदग , मनस्ताप  आणि शारीरिक त्रास ? या विचार पर्यत विजय येऊन पोहचलेला होता… विजयला लोकांची तितकीशी गरज नसली तरी लोकांना त्याची गरज पडते म्हणून त्याची आता जी काही थोडी धावपळ सुरु आहे ती चाललेली आहे… बस्स… विजयच्या या निर्मोही स्वभावाचा विजयच्या कुटुंबियांना खरं तर त्रासच होतो. पण विजय त्याला काहीही करू शकत नाही. ह्याचा अर्थ विजयला आरामशीर आयुष्य हवे असे नाही. त्याला सतत वाटत असते कि त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सत्कारणी लागावा. म्हणूनच त्याने लिखाणाचा आणि समाजसेवेचा  छंद जोपासला… पण आजकाल लोक समाजसेवाही स्वार्थापोटी करतात हे पाहून विजयला प्रचंड दुःख होते. कधी – कधी त्याला खंतही वाटते कि तो कोणाचीही आर्थिक मदत करू शकत नाही. त्यावरही तो स्वतःलाच समजावतो की आपण कोणाला आर्थिक मदत करावी ही त्या परमेश्वराचीच इच्छा असावी बहुदा ! त्याची जेंव्हा कधी वाटेल कि मी लोकांना आर्थिक मदत करावी तेंव्हा देव मला आर्थिक दृष्ट्याही सक्षम करेल… देवाने मला सुरुवातीलाच आर्थिक दृष्ट्या सक्षम केले असते तर कदाचित लोकांना मदत करण्याची जी भावना आता माझ्या मनात आहे ती तशी नुसतीच कदाचित ! माझ्याकडून त्या ईश्वराला जे महान कार्य करून घ्यायचे आहे त्याची कदाचित हि पायाभरणी असावी.. असे विजयला सतत वाटत असते..

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..