नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – ४२ )

एका ६१ वर्षीय प्रियकरचा ४० वर्षीय प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवताना मृत्यू…ही बातमी विजयच्या वाचनात आली…कोणाच्याही, कोणत्याही कोणत्याही कारणाने झालेल्या मृत्यूची बातमी वाचल्यावर प्रथम वाईटच वाटते.. पण थोड्यावेळाने आपण त्या बातमीकडे बातमी म्हणून पाहायला लागतो…या बातमीत सर्वात पहिली गोष्ट लक्ष वेधून घेते ती म्हणजे प्रियकर प्रेयसीच्या वयातील २० वर्षाचे अंतर आणि पुरुषाचे प्रेमात पडण्याचे वय…पाहता…प्रेमाला कोणती बंधने नसतात ही गोष्ट लक्षात येते…आता त्या व्यक्तीचा मृत्यू जरी दुर्दैवी असला तरी तो अनैसर्गिक नसावा बहुदा…कारण या वयातील कित्येक पुरुषांचा मृत्यू असाच शारीरिक संबंध ठेवताना होत असतो. त्यात भर म्हणजे तो प्रियकर दारू प्यायलेला होता…त्यात त्या त्याच्या मनाने तरुण असलेल्या प्रेयसीचा काही दोष नसवा…असो…प्रेमाला वयाच्या बंधनात बांधून ठेवणे हे तसे विजयला मान्यच नाही…पण प्रेम विवाह केलेलेही बरेच पुरुष आज विवाह बाह्य प्रेमसंबंध ठेवतात हे दुर्दैव आहे ! याला स्त्रिया अपवाद नाहीत…यावरून विजयला त्याचा एक मित्र आठवला तो ही स्त्री- लंपट होता…स्त्रिया आशा पुरुषांना लगेच ओळखतात असे म्हणतात… एक दिवस तो हायवे क्रॉस करायला हायवेवर उभा होता… इतक्यात एक आर येऊन त्याच्या जवळ थांबली ती कार चालवणारी स्त्री खूपच सुंदर होती…तिने त्याला दरवाजा उघडून आत बसायला सांगितले तो ही स्त्रीलंपट पुढचा मागचा विचार न करता बसला…त्यांच्यात संवाद सुरू झाल्यावर तिने त्याला त्याच्या कामाबद्दल वगैरे विचारले आणि ती त्याला म्हणाली,” तू चल मझ्याबरोबर फिरायला मी तुला खायला प्यायला देईन आणि पैसेही देईन…तो लगेच तिला ठिक आहे म्हणाल्यावर ती त्याला एका बीचवर घेऊन गेली तेथे तिने रूम बुक केला आणि त्याच्यासाठी खायला प्यायला आणि बिअर मागवली…त्यांनतर तिने त्याच्यासोबत शरीर सबंध प्रस्थापित केले…तिच्याशी गप्पा मारता मारता कळले तिचा नवरा कामानिमित्त परदेशात असतो तिला दोन मुले आहेत आणि तिची सासू तिच्यासोबत असते…ती मुलांना शाळेत सोडून येताना त्याला पिकप केले होते. आता जाताना ती त्याला ड्रॉप करून मुलांना घेऊन घरी जाणार होती…त्या प्रमाणे तिने त्याला ड्रॉप केले आणि पैसेही दिले…तो खूप खुश झाला… खायला – प्यायला मिळाले आणि सुंदर स्रीसोबत मजाही मारायला मिळाली.त्यानंतर जवळ – जवळ महिनाभर तो त्या स्रीसोबत  रोज जात होता…महिनाभरानंतर तो खूप आजारी पडला तेंव्हा तिचा नाद सोडला…हाच मित्र शाळेत असताना एक मुलगी त्याच्या प्रेमात पडली होती…तिचे उपद्व्याप घरी कळल्यावर तिच्या घरच्यांनी ती अठरा वर्षाची होताच तिचं लग्न लाऊन दिले लग्न झाल्यावर एक दिवस ती माहेरी आली असता ती ह्याला भेटली आणि हा तिला घेऊन एका लॉजवर गेला आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले… त्यानंतर जेंव्हा जेंव्हा ती माहेरी यायची त्याला भेटायची ! ते त्याचे लग्न झाल्यावर कदाचित थांबले असेल… तो पर्यत तो बेवडा झाला होता… त्याची बायको दिसायला खूपच सुंदर होती…तो दारूच्या नशेत तिला मारझोड करत असे म्हणून त्याच्या आई वडिलांनी त्याला स्वतंत्र घर घेऊन दिले. त्याच्या सोबत काही महिन्यांनी त्याचा लहान भाऊही राहायला गेला…तो तर दिसायला एखाद्या चित्रपटातील हिरोसारखा होता…त्याचे त्याच्या वाहिणीसोबत सूत जुळले आणि एक दिवस तो अचानक लवकर घरी आला असता त्याने त्या दोघाना नको त्या अवस्थेत पाहिले…त्याने भावाला आणि बायकोला घरातून हाकलले त्याच्या आईने लगेच त्याच्या त्या भावाचे एक गावची मुलगी बघून ताबडतोब लग्न लावून दिले… त्याची ब बायको माहेरी गेली ती काही परत आली नाही…ती माहेरी निघून जाण्याचे खरं कारण हा जगाला सांगू शकत नव्हता…त्यामुळे जास्त दारू धोसायला लागला होता…ह्यावरून एकच कळते की दुनिया गोल आहे…माणूस जे पेरतो तेच उगवतं…

इतके  दिवस विजयच्या पायाचे दुखणे कमी होत आलेले पण कोकणातून  घरच्यांनी पाठवलेले आंब्याची गोणी उचलून विजयच्या पायावर दाब येऊन त्याचा पाय पुन्हा दुखू लागला…पाय दुखायला लागला त्याचे काही नाही पण जे आंबे पाठवले ते ही कच्चे हिरवेगार ! ते पिकायला अजून सात – आठ दिवस जातील तो पर्यत नजरेसमोर फक्त हापूस आंबे फक्त पाहणे ही शिक्षाच वाटते…तरी त्यातला साधारणतः पिवळसर झलेला एक आंबा शेवटी विजयने कापला तर आत पिवळा होता पण खाल्ला तर मरणाचा आंबट ! विजय होता म्हणून तो त्याने  खाल्ला,  दुसरा कोणी असता तर जिभेचा स्पर्श होताच फेकून दिला असता..त्या आंब्याची किती सेवा करावी लागते तेंव्हा कोठे मेवा मिळतो..विजयला काही आंबे प्रचंड वगैरे आवडत नाही फक्त आता आंब्याचा बाटा कोणी खायला मागत नाही म्हणून त्याची आई सूनवते याची त्याला आठवण आली , आई म्हणायची,” तुम्ही लहान असताना आंब्याच्या बाट्यासाठी मारामाऱ्या करायचात ! विजयला आठवत ते पण हल्ली तो ही बाटा नाही खात पूर्वीसारखा चाटून पुसून….कदाचित उपलब्धता हे कारण असेल त्या मागे…एकदा विजयने आमरस तयार करण्याचाही प्रयत्न केला होता तो शेवटचा ! त्यांनतर त्याने आमरस हे नावही काढले नाही…विजयला कच्च्या कैऱ्या आणि करवंद खूप आवडतात हे जगजाहीर आहे…लिंबू खाण्यात तर त्याचा कोणी हातच धरू शकत नाही. पण कोकणातील या उपलब्ध वस्तूंचा विजयला व्यवसाय न करता आल्याची खंत त्याला वाटते. कोकणात काजुची फॅक्टरी टाकण्याचे त्याचे लहानपणापासूनचे स्वप्न होते.  फक्त स्वप्न नव्हते तर त्याचा त्याने भरपूर अभ्यासही केला होता पण गावच्या सरपंचाने त्याच्याच वाडीत ती फॅक्टरी सुरू केली… विजय गावी गेल्यावर ती फॅक्टरी पाहायला नक्की जातो. तेथील मशनरी पहतो त्या कसं काम करतात ते पाहतो. त्यात मेहनत खूपच आहे ती मेहनत करणे विजयच्याने जमणे आता अशक्य होते… कारण त्याला सर्व कामे यंत्राने करायची सवय लागली आहे..हातात यंत्रे नसली की तो निष्क्रिय होतो…त्याच काही डोकं चालत नाही. म्हणजे एखाद लाकूड करवतीने कापता येत पण ते कापायला खूप वेळ जातो पण मशीनवर ते काही सेकंदात होते ते ही अचूक …त्यामुळे रिकाम्या वेळेत विजयला करावंसं असं बरच काही वाटतं पण जवळ यंत्रे नसल्यामुळे तो आपला विचार सोडून देतो…

विजयला असणारे यंत्रांचे आणि नवनिर्मितीचे वेडच आजच्या त्याच्या पायदुखीला कारणीभूत होते…प्रसंगी बारा बारा तास उभं राहून यंत्रांवर उभं राहून काम करण्याची त्याला गरज नव्हती.. तो आरामात ए. सी. त बसून संगणकावर काम करू शकला असता. आता काय तेच तर करतोय ! त्याच्या यंत्रांच्या वेडाने त्याचे आयुष्य आज असुरक्षित करून ठेवलेले आहे… पैसे तर फार कमवता आले नाही उलट पायाचे दुखणे ओढवून घेतले. पैशासाठी काम केले असते तर कमवून बसला असता पण मनासिक समाधानासाठी काम मात्र त्याला महागात पडले.

त्याला हे ही लक्षात आले की आपल्या देशात असंघटित कामगारांचे प्रचंड हाल होत आहेत.. त्यांचे भविष्य सुरक्षित नाही, त्यांच्या आरोग्याची कोणाला काळजी नाही. त्यांना नियमाप्रमाणे काहीच मिळत नाही,  आजही मुंबईसारख्या शहरात लोक ३०० रुपये रोजवर काम करत आहेत म्हणजे  महिन्याला २५ दिवस भरल्यावर त्यांच्या हातात फक्त ७५००/- रुपये येणार त्यात तो त्याचे भविष्य काय घडविणार ? अंग मेहनतीचे काम आणि आरोग्याबाबत काही विचार नाही काही तरतूद नाही…हे कारखाने चालवून फक्त या कारखान्याचे मालक श्रीमंत होतात…काम करून आजरी पडल्यावर कर्ज काढून उपचार करण्याची वेळ त्यांच्यावर येते… या देशातील प्रत्येक कामगाराला आरोग्य विमा मिळाला तर या कामगारांचा त्रास थोडा कमी होईल पण ते कशाला ? देशातील सर्व वैद्यकीय उपचार मोफत व्हायला हवेत…पण देश रांगेतून सुटायला हवा ! आजही देशात  सरकारी हॉस्पिटलच्या बाहेर सकाळी लवकर जाऊन लोक केस पेपरसाठी रांगा लावतात… नशीब असत त्याचा नंबर येतो बाकीचे उद्याच्या रांगेची तयारी करतात हे कधी थांबणार आहे ? गरिबांना रांग लावल्याखेरीज कधीच काहीच मिळणार नाही का ?

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..