विस्तार बघून आश्चर्य वाटेल असं जगातलं सर्वांत मोठं रेल्वेस्टेशन इटलीतल्या मिलान इथे आहे. १०३ एकरांच्या भल्याथोरल्या परिसरात ते पसरलेलं आहे; तर भारतातलं सर्वांत मोठ स्थानक कलकत्त्यात ८० एकर परिसरात हावडा रेल्वेस्टेशन’ नावानं बनलेलं आहे. इथे १६ ते १८ प्लॅटफॉर्म्स आहेत. या स्टेशनच्या बाहेर हातगाडी, घोडागाडी, बैलगाडी, ऑटो, टॅक्सी, लॉरी, बसेस आणि ट्राम्स इतकी विविध त-हेची वाहनं उभी असतात. स्टेशनबाहेरच्या जागेत वाहनांची इतकी विविधता एकाच ठिकाणी दृष्टीला पडणारं हे जगातलं एकमेव रेल्वेस्थानक आहे. […]
राहुलच्या किर्तीमुळे, यू -ट्यूब मुळे शास्त्रीय संगीताकडे वळलेली तरुण पिढी काल मोठ्या संख्येने चित्रपट गृहात होती. अन्यथा १९८३ साली निवर्तलेल्या या सूर्यासारखे दाहक गाणाऱ्या गायकासाठी चाळीस वर्षांनी नवी माणसे (जी कदाचित त्यावेळी जन्मलेलीही नसतील) फिरकली नसती. […]
काही लोकांना ते ज्ञात असते. काहींना त्याची अनुभूती येते तर काहींना तो निव्वळ योगायोग वाटतो. मी ही अशीच योगायोग आणि अनुभूतीच्या उंबरठ्यावर अडकले आहे. नुकताच पीठापुर आणि कुरवपूर यात्रेचा योग गुरुकृपेने जुळून आला. त्या दरम्यान असे सुंदर अनुभव आले, जे सामान्य माणसाच्या विज्ञान निष्ठ बुद्धीला ही कोड्यात टाकणारे होते. […]
संयुक्त महाराष्ट्रातील पहिले मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान ठाणे शहराला मिळाला. दिनांक १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले आणि ७ व ८ मे १९६० या दिवशी ४२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे शहरात भरले. यापूर्वी ५ व ६ नोव्हेंबर १९३२ साली, भारतरत्न पां. वा. काणे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण प्रांतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात भरले होते. […]
ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला शकुंतला मुळ्ये यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. मात्र आजही हे संदर्भ सद्य परिस्थितीत जसेच्या तसे लागू पडतात. […]
जीवन हा संघर्ष आहे. शारीरिक असो वा मानसिक असो, संघर्षाबरोबर वेदना आल्याच. वेदना नको म्हणून संघर्ष नको असे म्हटले तर जगण्यातले वैविध्य, नाविन्य संपेल. जीवन नीरस, बेचव होईल. वेदनेचा सामना समजून उमजून करण्यातच आपले भले आहे. […]
आत्मस्वर स्पष्ट असो वा कुजबुजीच्या स्वरात तो केव्हाही पथदर्शकच ठरू शकतो विशेषतः त्याची गरज भासत असते तेव्हा! आत्मस्वर हा भावनांच्या, क्षणिक आवेगाच्या पार असतो आणि आपल्याला एखाद्या परिस्थितीचे वस्तुनिष्ठ दर्शन घडवू शकतो. हा आत्मस्वर कालातीत असतो- भूतकाळाचे अनुभव जोखून मार्ग अधिक निष्कंटक करीत असतो, वर्तमानाची काळजी तर घेत असतोच पण भविष्याचा रस्ता प्रकाशित करीत असतो. […]