Articles by प्रकाश बाळ जोशी
वेडेपणातलं शहाणपण
मुंबई नुसती बुडून जाऊ शकते असे नाही, तर जळून भस्मसात होऊ शकते. ही सगळी चर्चा ऐकून भिजलेल्या शरीरावर काटा उभा राहिला. जगबुडी वर्तवणाऱ्या त्या गप्पा सोडून दिल्या तरी वेडेपणातही काही शहाणपणा होता. बुडणाऱ्या मुंबईला वाचवणार कोण? […]
कलकलाट
आता ध्वनी-प्रदुषणाविरुद्ध मोहिम काढली पाहिजे, असं मत नुकतच एका जागरुक प्रतिभावान लेखकानं जाहिर केलं आहे. ते सुरु करण्यासाठी दोन-तीन लाऊडस्पीकर्स खरेदी केले आहेत. ‘आवाज कमी करा’ हे सांगितलेले कळणार कसं? ते कळावं म्हणून आहे त्या आवाजापेक्षा मोठा आवाज काढून बोललं तरच लोकांना कळणार, असं त्याच मत आहे. […]
खिडकीपलीकडे
दोन्ही टेकड्या हिरवीगार शाल पांघरुन बसतात. काळपट वाटणारा पर्वत माथाही हिरवागार होतो. कुठल्याही छान चित्रात शोभावं असं हे दृश्य आणि तेही भरवस्तीच्या बकाल मुंबई शहरात. अशी हिरवळ आणि शांत वृक्षराजी आजही मुंबईच्या कानाकोपऱ्यात शिल्लक आहे. पण ती शोधून सापडावी लागते. […]
पावसाचं आगमन
पण नरिमन पॉइंटवर पांढऱ्या शुभ्र झग्यातले, डोळ्याला पांढरं मुंडासं वर काळी फीत लावलेले अरबस्तानातील लोक जमायला लागले, की समजावं आता पावसाळा आला. वाळवंटात राहणारी ही मंडळी. त्यांना पावसाचं विलक्षण आकर्षण. पावसापेक्षा पावसाच्या आगमनाचं, पहिल्या पावसाचं. […]
मायाबाजार
कुणी विकतं, कुणी खरेदी करतं, पण काही खरेदी करण्यापूर्वी कमवावं लागतं. मग ज्याच्याकडे जे असेल ते जास्तीत जास्त भावात विकलं जातं. कुणी बुद्धिमत्ता विकतं, कुणी सत्ता विकतं, कुणी जरब विकतं, कुणी देवाने दिलेले सौंदर्य विकतं, तर कुणी त्याच्याच शेजारी आपले वैगुण्य घेऊन विकायला बसतं. मायाबाजार चालू राहतो. […]