नवीन लेखन...

फिस्ट ऑफ गॉड

काम संपल्यावर कँन्टीमध्येच पुस्तक वाचत तो रात्र रात्र जागतो, असे त्याचे इतर सहकारी सांगत. बघता बघता रात्रीची शाळा करुन त्याने दहावी पूर्ण केली. रात्रीच कॉलेज सुरु केल. ऑफिस संपल्यावर बसल्याबसल्या टायपिस्टकडून टायपिंग शिकला. अडीअडचणीला टायपिंगची मदत करु लागला. टायपिंगची परीक्षा पास झाला.


          मी पाहत राहिलो. चेहरा ओळखीचा वाटला. पण लक्षात येईना याला कुठे पाहिल होत. संध्याकाळच्या गर्दीत अचानकपणे समोर येऊन तो तरुण उभा राहिला. हातात सुटकेस, पायात चकदार बूट. डिझाईनर्स शर्ट आणि त्याला मॅच होणारी पँट, हातात किमती घडयाळ. किंचित वाकून नमस्कार करुन तो विचारत होता. मला ओळखल का?

माझ्या चेहऱ्यावरचे बावरलेले भाव बघून त्यान फार वेळ घेतला नाही. मी शंकर, त्याबरोबर एकदम लक्षात आल. दहा वर्षापूर्वी आमच्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये कामाला होता तोच हा शंकर. चेहऱ्यात काही बदल झालेला नव्हता. पण त्याच्या पोशाखावरुन एकदम ओळखण कठीणच होत. हाफ पँट- शर्ट घालून चहाची किटली आणि कप घेऊन ऑफिसीभर लगबग फिरणारा आणि न कंटाळता दहा तास गरागरा फिरुन लोकाना गरमागरम चहा पाजणारा शंकर आणि समोर सुटाबुटात उभा असलेला शंकर यात जमीन-अस्मानाचा फरक होता. फक्त डोळयातील चमक मात्र कायम होती.

फार फार तर तीन-चार वर्षच तो ऑफिसात असावा. पण बरीच वर्ष काम केल्यासारखा सर्वांच्या परिचयाचा आणि विसरता न येणारा असा बनला होता. कधीही न कंटाळणारा आणि हसतमुख्य राहणारा शंकर सर्वांचा दोस्त बनला. चहा देण्या-घेण्याबरोबर तो ऑफिसातील इतर बारीकसारीक काम केव्हा करायला लागला कुणालाच समजल नाही. लोकही विश्वासान त्याला आपली खाजगी काम रेल्वेच रिझर्वेशन करण, टेलिफोनची बिल भरण असे सांगू लागली. काम सांभाळून तो ही कामे केव्हा करतो. ते काही समजत नव्हतं. पण शंकर नाही म्हटला की सर्वांची कामं अडतं.

त्याची एक सवय माझ्या लक्षात आली होती. चहाबरोबर इकडून तिकडे ऑफिसचे कागद नेताना ते तो वाचण्याचा प्रयत्न करत होता. टेबलावर पडलेले मासिक-वर्तमानपत्र हातात घेऊन चाळल्याशिवाय तो खाली ठेवत नव्हता. वयाच्या सहाव्या वर्षीच केरळातून आलेला. पण मातृभाषा विसरलाच असावा. हिंदी मोडक- तोडक इंग्रजी बोलायचा. मराठी वाचायचा. माझ्या टेबलावरचा कथासंग्रह त्यान एकदा वाचायला मागितला तेव्हा मी चमकलोच. क्या चक्कर है शंकर? मी विचारल.

दहावीच्या परीक्षेला बसलेला शंकर त्या लेखकाची एक कथा शाळेच्या पुस्तकात होती म्हणून ते पुस्तक वाचायला मागत होता. काम संपल्यावर कँन्टीमध्येच पुस्तक वाचत तो रात्र रात्र जागतो, असे त्याचे इतर सहकारी सांगत. बघता बघता रात्रीची शाळा करुन त्याने दहावी पूर्ण केली. रात्रीच कॉलेज सुरु केल. ऑफिस संपल्यावर बसल्याबसल्या टायपिस्टकडून टायपिंग शिकला. अडीअडचणीला टायपिंगची मदत करु लागला. टायपिंगची परीक्षा पास झाला.

जसा आला तसा अचानक नाहीसा झाला आणि दहा वर्षानंतर माझ्यासमोर उभा होता. त्याला बघून खूपच आनंद झाला. किमान त्याची वाचनाची आवड थोडीफार पुरवायला मी करु शकलो होतो. त्याचा हातात फिस्ट ऑफ गॉड पुस्तक होत.

गेल्या दहा वर्षातला आराखडा त्यान भडाभडा बोलून उभा केला. आमच ऑफिस सोडल्यावर तो पदवीधर झाला. ऑफिसातच नोकरी लागायचा प्रयत्न पण जमल नाही. खूप ठिकाणी वणवण केली. मिळेल ती नोकरी केली. स्टोनोग्राफी शिकला. एका कंपनीत क्लार्क- कम -प्यून  म्हणून लागला. त्याच वेळी कंपनी सेक्रेटरीचीही परीक्षा देतच होता. ती पास झाला आणि बऱ्यापैकी नोकरी मिळाली. आता एक कंपनीत कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करतोय.

खूप वर्ष भटकंतीतच केली. मिळेल तिथ आळखीन राहला. आता नालासोपाऱ्याला स्वत:च घर घेतलय. एचडीएफसीच कर्ज घेऊन.

त्याच्याकडे पाहून बर वाटल. त्याच्या हातातील पुस्तकाच नाव बदलून गॉड इन द फिस्ट अस लिहाव असे वाटल. असे अनेक शंकर मुंबई शहरात विखुरलेले असावेत. कष्ट करणाऱ्याला मरण नाही. मी इथपर्यंत आलो ते मला लोकांच सहकार्य मिळाल म्हणून. ते नसत मिळाल तर काहीच जमल नसत. तो सांगत गेला. गावाकडली धाकटी भावंड आज त्याच्याबरोबर आहेत. आपल्यापेक्षा जास्त शिकून त्यानी पुढे जाव अशी त्याची इच्छा आहे. मुंबईत ते शक्य आहे.

-प्रकाश बाळ जोशी

आज दिनांक १५ डिसेंबर १९९४

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..