नवीन लेखन...

मुंबईचा हवालदार

मुंबईतील गर्दी हीच सुरक्षिततेचा विश्वास देते. पूर्वी मुंबईचा पोलीस हे नागरिकाना सुरक्षेच प्रतीक वाटायच. पण आता काय झालंय कुणास ठाऊक, पण मुंबईच्या पोलिसांचा ताल बदललाय.


          मुंबई तशी सुरक्षित, म्हणजे एक वेळ दिल्लीत संध्याकाळी सात-आठ वाजल्यानंतर एकट-दुकट फिरायला असुरक्षित वाटेल. पण मुंबईत आजसुध्दा रात्री-अपरात्री लहान-मोठी माणस ये-जा करु शकतात. कारण रात्री एक ते सकाळी चारपर्यंत थोडी विश्रांती सोडली, तर दिवस-रात्र लोकल, बस, टॅक्सी, रिक्षा यातून हजारो लोकांची वाहतूक सतत चालू आते.

मुंबईतील गर्दी हीच सुरक्षिततेचा विश्वास देते. पूर्वी मुंबईचा पोलीस हे नागरिकाना सुरक्षेच प्रतीक वाटायच. पण आता काय झालंय कुणास ठाऊक, पण मुंबईच्या पोलिसांचा ताल बदललाय.

एकेकाळी मुंबईच्या पोलीस दलाचा देशतील सर्वोत्कृष्ट पोलीसदल असा नावलौकिक होता. ‘इंटरपोल’ सारखी आतरराष्ट्रीय पोलिस संघटनासुध्दा  मुंबई पोलिसांवर विश्वास टाकून मोकळी व्हायची आणि कोणत्याही गोष्टीचा छडा लावण्यासाठी मुंबई पोलिस पुढे होता.

लंडनचा ‘बॉबी’ जसा लंडनकरांना जवळचा, तसा मुंबईतला पोलिस हवालदारही मुंबईकराना विश्वासातला, मोठमोठया अवघड प्रकरणांचा तपास लावल्याबद्दल वरिष्ठ पोलिस अधिका-यांना पदकं मिळालेली असती, तरी खर काम पोलिस हवालदाराचचं असायच.

मुंबई पोलीस दलाचा इतिहासही मोठा. ब्रिटिश पोलिस दलाची शिस्त आपोआप अंगी बाणली गेली होती. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही इतका दबदबा निर्माण झालेला, की इन्स्पेक्टर गोटेसारखी पात्र इंग्रजी साहित्यात स्थिरावली. मुंबईला कधीही भेट न  दिलेल्या इंग्रजी लेखकाने लंडनमध्ये बसून मुंबई पोलिसांच्या माहितीच्या आधारे डिटेक्टिव्ह इन्स्पेक्टर गोटे उभा केला आणि साहित्य क्षेत्रातही मुंबई पोलिसांचा भाव वाढला.

चार्लस शोभराज सारखे अंतरराष्ट्रीय गुन्हेगार, वॉलकॉट शेन्झसारखे स्मगलर्स जाळयात पकडल्यामुळे, रामन राघव सारखे माथेफिरु शोधून काढल्यामुळे आणि एकंदर कायदा -सुव्यवस्था नीट ठेवल्यामुळे मुंबईतील पोलिस हवालदाराचा एक दबदबा होता.

पण आज परिस्थिती बदललेली दिसते. पोलिस हवालदाराचा आत्मविश्वास ढळल्यासारखा वाटतो. जातीय दंगलीनंतर झालेली सततची टीका, बॉम्बस्फोट, वाढती गुन्हेगारी, टोळीयुध्दृ कोर्टातील गोळीबार, तुरुंगात घुसून केलेले खून, हातावर तुरी देऊन पळवून गेलेले अट्टल गुन्हेगार, वाढता भ्रष्टाचार, सामान्य माणसाकडे दुर्लक्ष या सगळयांचा फारच परिणाम झालाय त्याच्यावर. त्यामुळे केवळ आत्मविश्वास मावळला अस नाही, तर त्याचबरोबर दराराही नाहीसा झालाय.

आकडेवारीत बोलायच झाल, तर पूर्वी कमी संख्येत चांगल काम व्हायच. आता वाढत्या लोकसंख्येमुळै प्रश्न वाढले आहेत. त्यामानाने पोलिसांची संख्या कमी राहली आहे. गुन्हेगारांच्या हातात एके-४७ सारखी अद्ययावत उपकरणे आली. तर मुंबईचा हवालदार अजूनही ३०३ रायफल म्हणून त्यावर प्लॅस्टिकच कव्हर लावून त्यावर रबर लावतोय.

गुन्हेगारी जगत आणि पाकिस्तानची आयएसआयसारखी खतरनाक हेर संस्था मुंबईत हातपाय पसरत आहे. केवळ गुन्हेगारी जगतावर ताबा ठेवण सोप, पण मिळेल ते मार्ग वापरणारी आणि बुघ्दिवंतांपासून व्यापा-यांपर्यंत दहशत पेरणाऱ्या आयएसआयला काबूत ठेवण अवघड. त्यात जातीय दंगलीनंतर मुंबई पोलिसांची खबरेमंडळी तुटलेली. त्यामुळे गुन्हेगारी जगतात नेमक काय चाललय, याचा थांगपत्ता लागण कमी.

त्यात पोलिस अधिकाऱ्याचे या ना त्या टोळीशी लागेबांधे. त्यात राजकीय कारणासाठी हस्तक्षेप. अशा वेळी मुंबईचा हवालदार भांबावलेला असला तर त्यात नवल नाही.

त्यात भर म्हणजे फक्त गुन्हेगारांवर लक्ष ठेवण, त्यांना अटक करुन ताब्यात घेण एवढच त्याच काम राहिलेले नाही. पोलिसांमधील अधिक कार्यक्षम हवालदारांची भरती ब्लॅक कमांडोंमध्ये होते. त्यांना अद्ययावत आयुधाच प्रशिक्षण देण्यात येत आणि झेड कॅटेगरीतील नेत्यांना, प्रमुख नागरिकाना संरक्षण देण्याची त्यांच्यावर जबादारी येते. आज प्रत्येक आमदाराना खास संरक्षण देण्याची वेळ मुंबई पोलिसांवर आली आहे. त्यात रोज वेगवेगळया देशातील नेतेमंडळी मुंबईत मुक्कामाला असतात. त्यांच्यावर लक्ष ठेवाव लागत.

मुंबई पोलिसांकडून काही अपेक्षा करायच्या असतील, तर त्याला त्याच्या अधिकाऱ्यानी थोडासा विश्वास देण्याची आवश्यकता आहे.

-प्रकाश बाळ जोशी

आज दिनांक ६ ऑक्टोबर १९९४

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..