नवीन लेखन...

पॉवरकट (कथा)

 

न रडणारं, बुटांचा आवाज ऐकत स्तंभित झालेल, नुकतंच जन्मलेलं बालक इतकं बोलकं असू शकतं? कुणास ठाऊक, कॅमेऱ्याची करामतअसावी. टोपलीत ठेवून ते मूल अलगद छोट्या ओहोळात सोडलं जातं. वाहत वाहत पुढे पुढे जात राहतं. अजूबाजूचा प्रदेश बदलत जातो.


चित्रपट केव्हा सुरु होतो समजत नाही. लाईट ऑफ. फारशी गर्दी नाही. बॅल्कवाली पोरं आणि  बायका कट्टयावर बसून चकाटया पिटत होत्या. हळू हळू दिवे मंद होत गेले. तारका मंद होत जाता तशा. एकदम दिवे जाऊन अंधार पडला नाही. हळूहळू प्रकाश कमी होत गेला. त्यामुळे डोळयांभोवती फारशी अंधारी आली नाही. दिवे विझण्यापूर्वीच आत आलो होतो. त्यामुळे एकदम उजेडातन अंधारात आल्यावर डोळयावर एकदम येणारी अंधेरी आली नाी.

थिएटर जवळ जवळ रिकामच होत. रिकमटेकडे लोकच अस्ताव्यस्त बसले होते. आज काल कुणी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघत नसाव. मी सुध्दा फार दिवसानी वेळ जावा म्हणून येऊन बसलेलो. गाडीची वाट पाहत.

खुर्चीच कव्हर निघालेले. दांडा मोडलेला, भिंतीचे पोपडे पडलेले. पडदाही पिवळट पडलेला, स्टेजवरचा पडदाही खराब झालेला, पंख्यांवर मणभर माती साठलेली, गचाळ. बऱ्याच दिवसात झाडलेली नसावं.

जाहिरातीच आक्रस्ताळं संगीत आणि उत्तेजक चित्र पुढे पुढे सरकत होत. लोक आत येतच होते.

डोअरकीपर कोपऱ्यात स्तब्धपणे उभा. हातातल्या बॅटरीची उघडझाप करत. आत          येणाऱ्याला पुढे येऊन जागा दाखवण्याची तसदी घेत नव्हता. जो कोणी विचारायला येईल त्यालाच बॅटरीच्या प्रकाशझोतात बसण्याची जागा दाखवणारा.

हळू, पाय घसरेल. आता काय राहिलय, जाणारा बोलतो. बसलेले गालात हसतात. येणारे चालूच. कुठंही बसतात. कडेच्या सिटा पकडणारे कमीच.

पडद्यावरच्या प्रकाशात अंधार कमी होतो. कुठल्या तरी चित्रपटाचा ट्रेलर. संथ लयीतलं संगीत. पाय पुढे सोडून खुर्चीत रेलून बसाव. खुर्ची कचकचते.

काय? काही नाही.

संगीत थांबतं. चित्रपट सुरु झालेला. केव्हा सुरु झालेला समजलंही नाही.

एकदम डोळयांत भरुन राहणारी आकाशाची निळाई. दूरवर पसरलेला हिरवेगारपणा- आकाश कापणारी क्षितिजावळची टेकडयांची रांग, जांभळी फुलं, गवतपान.

दूरवर कुणीतरी टाहो फोडल्याचा आवाज. नवजात बालकाला पोटाशी कवटाळणारी आई. धाड धाड कनठळया बसवणारे बुटांचे आवाज करत आलेले शिपाई. मुलाला कुशीत लवण्याचा अधिक प्रयत्न. आईचा चेहरा पुसट होत जातो. लक्षात राहतं ते आक्रसलेल्या भुवयांचे नवजात अर्भक, न रडणारं, बुटांचा आवाज ऐकत स्तंभित झालेलं, नुकतंच जन्मलेलं बालक इतकं बोलकं असू शकतं? कुणास ठाऊक, कॅमेऱ्याची करामत असावी. टोपलीत ठेवून ते मूल अलगद छोटया ओहोळात सोडलं जातं. वाहत वाहत पुढे पुढे जात राहलं. आजूबाजूचा प्रदेश बदलत जातो.

ती टोपली लागते एका बेटावर. तीन फूट उंचीच्या लोकांच्या प्रदेशात. विजेच भीषण तांडव. वादळवारा-अलगद टोपलीतून ते बुटक्याच्या हाती लागतं. ते त्याला उचलून घेतात. त्याबरोबर मूल भेकाड पसरतं.

दिवे जातात. काळाकुट्ट अंधार.

ए मॅचिस जलाव? लाईट लाईट, बोंबाबोंब.

डोअरकीपरचा पत्ता नाही.

खटाखट दरवाजे उघडले जातात. तेवढाच उजेड आत येतो. अंधुक – चोरपावलाने.

मिनिटापूर्वी छान वाटणारं चित्रपटगृह दिवे जाताच भयावह वाटायला लागतं. आरडाओरड चालूच. उकडायला लागतं. पंखा चलाव, कुणीतरी ओरडतं. वीज गेल्यावर पंखा कसा चालणार. आधीच लोक कमी. त्यात कुणाला चित्रपटात फारसा रस दिसत नाही. निम्म्याच्यावर लोकाना नावही माहिती नसेल आणि ते भेकाड पसरणार मूल आणि विद्रूप दिसणारी बुटकी माणसं. हीरो नाही- हीरॉइन नाही- गाणी नाहीत- मारामारी नाही. प्रेक्षकांना जास्त महत्व एसीच दिसतंय. लोक आत-बाहेर करत राहतात. दिवे जात नाहीत, आजच कसे गेले?

कानठळया बसवणारी कुठली तरी पाश्चात्य संगीताची रेकॉर्ड बॅटरीवर चालणाऱ्या लाऊडस्पीकरवर लावली जाते. लोकाना वाटतं दिवे आलेत. ते आत येतात. परत बाहेर जातात. पाऊण तास निघून जातो.

लाईट नाही, पैस परत करा, कुणीतरी डोअरकीपर बरोबर हुज्जत घालतं. तो शांतपणे पाटीकडे बोट दाखवतो.

दोन तास वीज गेली तरच पैसे परत मिळतील. विचारणारा वैतागून बाहेर जातो. पॉवर कटच काय, व्हिडीओ, स्टार टीव्ही, केबलमुळे चित्रपटगृहात अंधार पसरलाय.

पिक्चर बघायला कोण थेटरात येत नाही. आता लाईट गेली तर पैसे परत मागणार. खायच काय आम्ही? डोअर कीपर कुणाला तरी आवली कैफियत सांगत होता. चित्रपटगृहाचा धंदा किती तोटयात चाललाय हे त्याच्या चेहऱ्याकडे बघूनच समजत होत. व्ही.टी. स्टेशनसमोरच्या चित्रपटगृहांची ही अवस्था. तर इतर चित्रपटगृहांचे काय हाल असतील. काही वेळा शो रद्द करावे लागतात.

माझ्या गाडीची वेळ झाली होती. त्या भोकाड पसरणाऱ्या मुलाला आणि भवितव्याची चिंता करणाऱ्या डोअरकीपरला मागे सोडून मी माझ्या प्रवासाला लागलो.

———————————————————————————

-प्रकाश बाळ जोशी

आज दिनांक 17 फेब्रुवारी 1994

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 35 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..