अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे साङ्ख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी सांख्ययोग नावाचा दुसरा अध्याय सञ्जय उवाच । तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् । विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥१॥ अश्रूंनी डोळे डबडबलेले आणि मन खिन्न अशा अर्जुना पाहुनि वदते झाले मधुसूदन १ श्रीभगवानुवाच । कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् । अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन […]
सिनेमात काम करायचं -मुंबई. नोकरी मिळत नाही- मुंबई. घरी त्रास आहे- मुंबई परिक्षेत नापास झाला-मुंबई : मुंबई : अशा अनेकविध कारणांमुळे घरी न सांगता मुंबईकडे धाव घेणारे अनेक आहेत. स्वत:हून दडून बसलेल्या अशा माणसांना शोधून काढणं पोलीसच काय कुणालाच शक्य नाही. […]
जन्म स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे १९४७ पूर्वी झाला आहे आणि त्यांचे साहित्यही त्याच काळात प्रसिद्ध झालेले आहे असा एक गट आणि ज्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात झाला, परंतु त्यांचे साहित्य १९४७ नंतर म्हणजे स्वातंत्र्योत्तर प्रकाशित झाले, हा दुसरा गट. या दोघांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करताना बरीच साहित्यिक मंडळी दिवंगत झालेली आढळली. त्यामुळे त्यांच्याशी नाते जोडायचे, इतरत्र प्रकाशित असलेले साहित्यसंदर्भ धुंडाळणे अथवा त्यांच्याशी संबंधित असणारे बुजुर्ग शोधून त्यांच्याकडून आठवणींचे कवडसे हातात येतात का त्याचा प्रयत्न करणे, हाच मार्ग शिल्लक होता. […]
माणूस भाऊच्या धक्क्यावर उतरो, व्हीटी स्टेशनला उतरो, बॉम्बे सेंट्रलला उतरो, नाही तर सांताक्रुझ विमानतळावर उतरो. त्याच्या पाठीवर त्याच बि-हाड असतं, डोळयात स्वप्नं असतात आणि मनात एक खूणगाठ बांधलेली असते. नाव आणि पैसा मिळवून गावी परत जायचं. […]
शिलाहार व बिंब राजवटीत ठाण्यात साठ मंदिरे व साठ तलाव बांधण्यात आले होते. पण पोर्तुगीजांनी ही सर्व मंदिरे जमीनदोस्त केली. आज इमारतीचा पाया खोदताना या मंदिरांचे अवशेष, कोरीव स्तंभ, वा मूर्तीच्या स्वरूपात पहावयास मिळतात. तलाव साफ करतानाही काही अप्रतिम मूर्ती मिळाल्या आहेत. […]
जीवनाच्या अनेक संचिता पैकी लताचं असणं हे एक संचित आहे. आपल्या अवती भोवती अनेक समृद्ध व्यक्तिमत्वें असतात, स्वर असतात, त्यांच्यामुळे आपलं जीवन समृद्ध होत असतं. मोठ्या माणसांच असणं डोक्यावर छत्र असतं. लतांची गाणी अनेकांच्या दृष्टीने मुदत ठेव आहे, जिच्यामुळे त्यांचं आयुष्य सुखद आहे. सौंदर्य आणि स्वर आपल्या आवाक्यात जरी नसले तरी पाहण्यात व ऐकण्यात ते आपलेच […]
पूर्वी कधीतरी मुंबई सात बेटांची असेल. आज ती बेटं एकमेकांना सांधण्यात आली आहेत. मात्र आज मुंबई नावाच्या शहरात अनेक छोटी-मोठी बेटं तयार झाली आहेत. इथं राहणारा प्रत्येक माणूस एक स्वतंत्र बेटच आहे. […]
समाजातील एखाद्या महनीय थोर पुरुषाच्या जीवनकार्यासंबंधी दुसराच कुणीतरी जे लिहितो त्या लेखनास चरित्रे असे म्हणतात. आपल्या असामान्य कार्यकर्तृत्वाने महत्पदास पोहोचलेली महान व्यक्ती स्वत:च्या संपूर्ण आयुष्याबद्दल स्वतःच सारे काही सांगते वा लिहिते तेव्हा ते बनते आत्मकथन म्हणजेच आत्मचरित्र.
गेल्या पन्नास वर्षांत वेळोवेळी प्रसिद्ध झालेली आत्मचरित्रे संख्येने जशी बिपुल तशीच त्यातली काही वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहेत. […]
या चेहऱ्यांच्या सतत हेलकावणाऱ्या लाटेत गुदमरुन आपला चेहराही आपल्या लक्षात राहत नाही. गर्दीत भान हरवलेला चेहरा आपलं साम्य इतर चेहऱ्यात कुणी जिवाभावाचा माणूस भेटतो का पाहत असतो कारण इथं कुणाला कुणासाठी वेळ असतो ? […]
मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ पंडित बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित केले. ठाण्यात मात्र पहिले वृत्तपत्र २२ जुलै १८६६ रोजी निघाले. त्या वृत्तपत्राचे नाव होते ‘अरुणोदय.’ हे वृत्तपत्र काशिनाथ विष्णू फडके यांनी काढले. त्यांनी जांभळीनाक्यावरील पोलिस चौकीजवळ आपला छापखाना टाकला. फडके यांचे हे वर्तमानपत्र ठाणे जिल्ह्यातील पहिले साप्ताहिक होय. […]