पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

शांततेचा लंबक इकडून तिकड

थोडक्यात- मानवाच्या प्रत्येक जखमेवर, दु:खावर काळच मात करू शकतो. त्यावर तोच उपाय आहे. काळाच्या ओघात हा आघातही दूर होईल. आता मी जे या खेपेला सांगितले, त्याचे तूही रोज मनन करशील. हे दोस्त, उदास… निराश नको होऊस! […]

अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात

अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात यावर मी जास्त टीका टिप्पणी करू इच्छित नाही. हे काम आपल्यावरच सोपवतो. अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात अशी मागणी केली तर तो परत बटबटीत पणा भडक पणा वाटेल . […]

बजेटची गोष्ट

अलीकडच्या काळात अर्थसंकल्प फेब्रुवारीत सादर करण्यास सुरुवात झाली. मात्र, बजेटचा थोडा मागे जाऊन इतिहास रंजक आहे. भारतीय अर्थसंकल्पाबाबतची ही मोजकी पण संग्रही ठेवावी अशी माहिती.
[…]

सामान्य नागरिकांचा प्रशासनामधील सहभाग

आज आपल्या राज्यामध्ये मध्ये जर राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष सारखेच नाकर्ते असतील तर केवळ “सिस्टीम” ला नावे ठेवून आणि “हे असेच चालणार ” असे सुस्कारे सोडून महाराष्ट्रा ची नक्कीच प्रगती होणार नाही.कुठेतरी आपण कार्यरत झाल्याशिवाय हे राज्य सुधारणार नाही.रस्त्या वर उतरून एक मेकांची डोकी फोडणे आणि मग जेल च्या वारया करणे याने काहीही सध्या होत नाही.घरबसल्या केवळ १० रुपये आणि थोडासा वेळ दिला तर सामान्य माणूस सुद्धा सामाजिक कार्य करू शकतो.तेव्हा मी महाराष्ट्रा तील जनतेला विनंती करीन कि माहितीचा अधिकार कायदा जाणून घ्या,त्याचा भरपूर वापर करा […]

कलाकार

त्या भर उन्हात कर्जतच्या बाजारपेठेनं एका अस्सल कलावंताचा अभूतपूर्व असा उत्स्फूर्त आविष्कार पाहिला. त्या कलावंताला नव्हतं भान बाजारपेठेचं, तिथल्या गर्दीचं, नव्हतं भान कशाचं! तो नव्हता यशवंत दत्त, तर त्या क्षणी तो होता – अप्पासाहेब बेलवलकर, नटसम्राट! […]

संगणकातल्या पसार्‍याची आवराआवर

हे नवीनच शिर्षक वाचून आश्चर्य वाटलं? खरं आहे. संगणकावर काही पसारा असू शकतो याचं भानच आपल्याला बऱयाचदा नसतं. एकदा का संगणक घरी आला की त्याच्यावर पाहिजे तेवढी माहिती ठेवायची आपल्याला घाई होते. कधीतरी-कुठेतरी, कोणाकडून ऐकलेले शेकडो प्रोग्रॅम्स – बहुधा ज्याच्याकडून संगणक घेतलाय त्याच्याकडूनच – आपल्या संगणकावर घालून घेतले जातात. यात आपल्या गरजेचे किती आणि अनावश्यक किती याचा आपण विचारच करत नाही. […]

पाकिस्तानचे अफ-ताल-काश्मिर धोरण

सशस्त्र कट्टर जिहादींच्या मोठ्या प्रमाणावर होणार्या घुसखोरीमुळे तसेच पश्तुनी भाषेत बोलणार्या कट्टर तालिबानी जिहादींकडून मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मिरमध्ये घातपात घडवून आणण्याची शक्यता वाढली आहे. या दोन्ही कारणांमुळे भारतीय नियंत्रण रेषेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. यामुळे सुरक्षादलांनी व १ पॅरा स्पेशल फोरर्सेस यांनी आक्रमक हालचाली करून घुसखोरी रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
[…]

1 85 86 87