वेरा लीचा जन्म 17 मार्च 1903 रोजी leeds इंग्लंड येथे झाला. तिचे मूळचे नाव वेरा ग्लास पण तिला लहानपणीच एच इगन लीग ह्या रेसकोर्सच्या घोड्याना ट्रेनिंग देणाऱ्या माणसाने दत्तक घेतले त्यामुळे ती वेरा लीग झाली. तिचे लहानपण मेसन लिफि ह्या घोड्यांच्या तबेलयांच्या आसपास गेले. लहानपणी तिला मोठे झाल्यावर जॉकी बनायचे होते. […]
आजच्या माणसाचे भाऊबंद असणारी निअँडरटाल ही जाती सुमारे चार लाख वर्षांपूर्वी निर्माण झाली आणि सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वी अस्तंगत झाली. आजचा माणूस – होमो सेपिअन्स – हा तीन लाख वर्षांपूर्वी जन्माला आला. या दोन्ही जाती दीर्घ काळ एकाच वेळी अस्तित्वात होत्या. अतिप्राचीन काळच्या या दोन जातींचा आहार नक्की कोणता होता, याबद्दल संशोधकांत मतांतरं आहेत. […]
आम्ही लहान असताना, 1999-2000 च्या सुमारास ‘प्रपंच’ हि मालिका लागायची अल्फा मराठी वर..आत्ताचं झी मराठी.. YouTube वर ‘प्रपंच’ चे काही भाग पाहिले आणि थेट 1999 मध्ये जाता आलं.. मोबाईल फोन नसलेला, घरोघरी कॉम्पुटर नसलेला तो काळ.. २०-२२ वर्षांचा काळ किती पटकन गेला.. छान आठवणी जाग्या झाल्या.. मात्र आता केवळ आठवणीच राहिल्या याचं वाईट सुद्धा वाटलं. […]
15 ऑगस्ट 1947 ला जेंव्हा भारत स्वतंत्र झाला तेंव्हा जर कोणी असे म्हटले असते की भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ब्रिटनचा पंतप्रधान हा भारतीय असेल तर त्या व्यक्तीला त्यावेळी वेड्यात काढले गेले असते. पण नियतीचा खेळ काही वेगळाच असतो. […]
“ अहो ss .. ही तुमची औषधं, घडयाळ वगैरे या वरच्या खणात ठेवतेय बरं का ss !!” .. “ हो हो .. चालेल!”. पुनर्विकास झालेल्या इमारतीत नुकतेच रहायला आलेल्या ज्येष्ठ नागरिक जोडप्याचा संवाद. “ .. आणि या आतल्या दिवाणावर ही निळी चादर घालू का हो ? “ अगं .. आता तुला जसं हवं तसं सजव हे […]
नेन्सी वेक हिचा जन्म न्यूझीलंड मध्ये वेलिनटन शहरात ३० ऑगस्ट १९१२ रोजी झाला. 1914 त्यांचे कुटुंब ऑस्ट्रेलिया च्या उत्तर सिडनी भागात स्थाईक झाले.वयाच्या १६ व्या वर्षी ती घरातून पळाली आणि नर्स म्हणून काम करू लागली.पुढे ती न्यूयार्क येथे गेली व नंतर लंडनला जाऊन पत्रकारितेचा कोर्स केला. […]
जलाशयासमोर गेले की तेथील शांतता मनात झिरपू लागते. दिवसभराचे कोलाहल मागे टाकीत तलावाशी संयत संवाद बरा वाटतो. मन स्थिर व्हायला शब्दांची गरज भासत नाही. तेथील संवादही अंतर्यामीच्या मौनात विरून जातात आणि स्वच्छ,नितळ वाटायला लागतं. […]
तिरुपती बालाजीची महत्त्ती : या लेखात आपण तिरुपती बालाजी मंदिर बद्दल माहिती पाहणार आहोत, तिरुपतीला भूलोकीचे वैकुंठ म्हणून ओळखले जाते, पृथ्वीवरील विष्णूचे निवासस्थान, तिरु म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती. तेलुगु, तमिळ भाषेत मला /मलई म्हणजे डोंगर पर्वत. बालाजी हे विष्णूचे अवतार मानले जातात ,डोंगरावर कपिलतीर्थ नावाचे सरोवर आहे. श्रद्धालु येथे भरपूर दान करतात आणि हे,मंदिर […]
आम्ही क्रिकेटशौकीन मित्रमंडळी पूर्वी एक आवडीचा खेळ अधूनमधून खेळत असू, तो म्हणजे आपल्या पसंतीचा एक सर्वोत्तम संघ निवडणे. उदाहरणार्थ – सगळ्यात उत्तम जागतिक संघ किंवा सर्वकालिन उत्तम भारतीय संघ किंवा एखाद्या दशकातील सर्वोत्कृष्ट संघ वा फक्त डावखुऱ्या खेळाडूंचा श्रेष्ठ संघ वगैरे वगैरे. सध्या डिजिटल च्या जमान्यात युवक मंडळी मोबाइल वर “ Dreams11”, “MPL”, “My11Circle” अश्या मोबाईल […]
भारतात टीव्ही सुरु झाला तेव्हापासून आजपर्यंत कमर्शियल जाहिरातींमधील दोन जाहिराती अविस्मरणीय ठरल्या. एक होती निरमा वाॅशिंग पावडरची व दुसरी एमडीएच मसालेची! या मसाल्याच्या जाहिरातीत जो फेटेवाला हसणारा वृद्ध दिसायचा, तो पहिल्यांदा माॅडेलिंग करणारा असेल असं वाटायचं. मात्र पाच दशकं झाली तरी उतारवयातही जाहिरातीत तोच दिसल्यावर खात्री झाली की, हाच ‘एमडीएच’ मसाल्याच्या कंपनीचा मालक आहे! […]