नवीन लेखन...
Avatar
About क्षितिज दाते , ठाणे
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

जीव

गृहसंकुलाच्या आवारात चालता चालता चिंटूच्या आजोबांचा पाय सटकला आणि ते एकदम खालीच बसले. तिथेच फिरणारे काही शेजारीपाजारी लगेच आले आणि त्यांना बाजूच्या बाकावर बसवलं. हे सगळं बघून जवळच मित्रांसोबत खेळणारा लहानगा चिंटू धावत आला. […]

फोनाप्पा

आपल्या दैवताशी इतका वेळ अनपेक्षित संभाषण. आप्पांना हे सगळं स्वप्नवत वाटत होतं. या सुखद धक्क्यामुळे आप्पा एकदम निःशब्द झाले होते. तरीही धीर करून म्हणाले “मै क्या बोलू समझ मे नही आ रहा. मै आपको हमारे आंजर्ले गाव मे आनेका निमंत्रण देता हू. यहां का निसर्ग और समुद्र आपको जरूर अच्छा लगेगा. […]

आजी आजोबांचा व्हॅलेंटाईन वीक”

एक होती साधीभोळी आजी , पण आजोबा होते कहर ! काहीतरी वेगळं करण्याची, आजोबांना मध्येच आली लहर !! “यावेळेस आपण करूया का गं, प्रेमाचा आठवडा साजरा ?” लाजत मुरडत हो म्हणत , आजीने लगेच माळला गजरा !! “रोझ डे” चा गुलाबी दिवस , केला गोडाधोडाचा भडीमार ! एकमेकांना भरवला गुलकंद , मग रोझ सरबत थंडगार !! […]

“थंडी .. मुंबईची ”

प्रिय थंडी ……. काय गं ss आलीस का एकदाची ? वाटच बघत होतो तुझी केव्हापासून …. तुझा सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो …. त्यासाठी वाट मात्र खूप बघायला लावतेस तू …. नेहमीचंच झालंय आता हे तुझं …. पण काही हरकत नाही…. अखेर आली आहेस ना ss …. आता मात्र प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त तुझ्यासोबतच घालवायचाय…. गार […]

जादू

आपल्या एकुलत्या एक लेकीचा पाचवा वाढदिवस त्याला अगदी जंगी साजरा करायचा होता. एका हॉल मध्ये सगळ्याचं कंत्राटच दिलं होतं. रंगीबेरंगी फुगे, कार्टूनची सजावट, एका कोपऱ्यात टॅटू काढणारा, एक जण वेगवेगळे मास्क वाटणारा वगैरे वगैरे जय्यत तयारी केली होती. हळूहळू पाहुणे येऊ लागले. भेटीगाठी-गप्पा सुरू झाल्या. थोड्यावेळाने बहुतांश निमंत्रित आले आणि त्याने तिथल्या व्यवस्थापन करणाऱ्याला कार्यक्रम सुरू […]

ब्लाइंड स्पॉट

आज आमच्या आईच्या कौतुक सोहळ्यासाठी तुम्ही आवर्जून आलात त्यासाठी सगळ्यांचे खूप आभार. तशी ती इथल्या प्रत्येकाची बहीण, मामी, मावशी, आत्या , मैत्रीण अशी कोणी ना कोणीतरी आहेच. तिच्यावरच्या प्रेमापोटीच तर तुम्ही इतक्या आयत्या वेळेस कळवून सुद्धा आला आहात पण तरीही सगळ्यांना प्रश्न पडला असेलच की आज हे तिचं कौतुक नेमकं कशासाठी आहे ??? …. ती काही कोणी मोठी उद्योजिका किंवा मोठ्या हुद्दयावर वगैरे नाही. […]

आशीर्वाद

लहान लहान म्हणता म्हणता लेकरू कॉलेजकुमार झाला आणि सहाजिकच बऱ्याच गोष्टी बदलल्या. त्यातलाच एक बदल म्हणजे अभ्यासाची पुस्तकं घेण्याचं दुकान. शालेय पुस्तकं पाठ्यपुस्तक मंडळाची. सगळी अगदी ठरलेली. […]

रिडेव्हलपमेन्ट

“ अहो ss .. ही तुमची औषधं, घडयाळ वगैरे या वरच्या खणात ठेवतेय बरं का ss !!” .. “ हो हो .. चालेल!”. पुनर्विकास झालेल्या इमारतीत नुकतेच रहायला आलेल्या ज्येष्ठ नागरिक जोडप्याचा संवाद. “ .. आणि या आतल्या दिवाणावर ही निळी चादर घालू का हो ? “ अगं .. आता तुला जसं हवं तसं सजव हे […]

आशावाद

कॉलेजातल्या पहिल्या दिवशी …… ती दिसता वर्गात पाहताक्षणी गेला भाळून …… पडला प्रेमात आठवड्यातून एकदा तरी …… लिहायचा पत्र तरी उत्तर नाही नकार नाही …… अस्पष्ट हे चित्र इतक्या चिठ्ठ्या लिहून काही …… मिळेना दाद होकाराची वाट पाहिली …… दुर्दम्य आशावाद अन् वर्षामागुनी सरली वर्षे …… संपले कॉलेज शेवटच्या दिशी तिजला पाहुन …… धस्स काळीज अखेर […]

अथांग…..

त्याची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. तो बालहट्ट पुरवत मुलांचे वेगवेगळ्या पोझेस मधले फोटो काढण्यात दंग होता. मध्येच आपल्या कॅमेऱ्यात मावळतीचा सूर्य आणि मुंबईचं देखणं रूप टिपत होता. […]

1 2 3 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..