नवीन लेखन...
Avatar
About क्षितिज दाते , ठाणे
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

सेकंड हँड

बंड्या! काहीसा अबोल, फारसा कोणात न मिसळणारा असा एक साधा भोळा, सामान्य मुलगा … तो तसा व्हायला कारणं देखील होती तशीच. दोन खोल्यांचं घर . कुटुंबं तसं खाऊन पिऊन सुखी असलं तरी परिस्थिती साधारण होती. बंड्याचा भाऊ त्याच्यापेक्षा जेमतेम अडीच वर्षांनी मोठा. त्यामुळे स्वाभाविकपणे लहानपणी बंड्याला दुपटी , टोपडी , खेळणी हे सगळं मोठ्या भावाचंच मिळालं. […]

अत्तर, म्हैसूरपाक आणि तुळस

दामू .. एक अजब रसायन .. खरं तर वृद्धाश्रमाच्या संस्थापकांच्या गावातला , “चारच बुकं” शिकलेला तरुण .. विसाव्या वर्षीच आई वडिलांचं छत्र हरपलं म्हणून त्या दयाळू संस्थापकांनी त्याला आश्रमात आणलं आणि तो तिथलाच होऊन गेला .. आत्ता असेल साधारण “चाळीशीच्या” आसपास …. स्वयंपाक घरातल्या आचाऱ्यापासून साफसफाई करणाऱ्या मावशीपर्यंत सगळ्यांना मदत करायचा .. बागकाम मन लावून करायचा .. आश्रमात येणाऱ्या सगळ्या आजी-आजोबांच्या मनाचा ठाव घेत लगेच आपलसं करणारा असा हा कायम हसतमुख आणि बोलघेवडा गडी.. […]

स्टॅम्प आजोबा

साधारण दर १५-२० दिवसांनी पत्र यायचं .. मन्या तर स्टॅम्प आजोबांची वाटच बघत असायचा .. कधी जरा उशीर झाला की जाता येता विचारायचा .. “स्टॅम्प आजोबा ss .. आलं का पत्र ???” .. साता समुद्रापार असलेल्या मुलाच्या आई वडिलांपेक्षा हाच पत्राची आतुरतेने वाट बघायचा … कारण तेवढेच नवनवीन स्टॅम्प त्याच्या कलेक्शन मध्ये यायचे आणि इतर मित्रांसामोर थोडा भाव सुद्धा खायला मिळायचा […]

आंब्याची पेटी

चार दिवसांची “दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत” किंवा “रथसप्तमीपर्यंत संक्रांत” साजरी करणारा “उत्सवप्रिय” असा मनुष्य प्राणी .. आणि या सणांच्या मंदियाळीतला बरेच दिवस म्हणजे साधारण दोन-अडीच महीने चालणारा सण म्हणजे “आंब्यांचा सण”. आंबे खाणं ही गोष्ट सुद्धा सोहळ्यासारखी साजरी करतो आपण .. म्हणून आंब्यांचा सुद्धा “सण” !!!……. हां ss .. आता त्याची सुरुवात ही प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार, आवडी-निवडी प्रमाणे […]

‘शेजार’ ….. (कथा)

आयताकृती फडके वाडा … आयताच्या एका बाजूला झाकलेली विहीर , पंप रूम आणि चाफ्याचं मोठं झाड .. उरलेल्या तीनही बाजूंना एक मजली चाळीसदृश घरं … अगदी बाजूबाजूला लागून … दोन्ही कोपऱ्यात लाकडी जीना …. मध्यभागी सगळं अंगण … अंगणात काही उगाच वाढलेली तर काही मुद्दाम लावलेली झाडं …. […]

ठिगळ (कथा)

आपल्या सभोवताली वेगवेगळ्या ठिकाणी , वेगवेगळ्या संदर्भातील आजुबाजूला घडणाऱ्या घटना किंवा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अशा अनेक अर्धवट,अपूर्ण राहिलेल्या गोष्टी असतात मग त्या “चांगल्या किंवा कधीकधी वाईट” ही असतात पण त्यांना पूर्णत्वास न्यायला लावावंच लागतं ……..असंच एखादं ….”ठिगळ” […]

नितळ (कथा)

एका “नितळ” मनानी दुसऱ्या अशाच एका “नितळ” मनाशी संवाद साधला .. त्याला अनुसरून केलेली ती तितकीच “नितळ” प्रतिक्षिप्त क्रिया .. समोरून दिलेला तितकाच “नितळ” प्रतिसाद .. इतकं साधं आणि सोपं आयुष्याचं गणित होतं ते !.. […]

1 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..