नवीन लेखन...
Avatar
About क्षितिज दाते , ठाणे
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

बारक्या

आपली आलीशान गाडी सर्व्हिसिंगला टाकून आपल्या ८-१० वर्षांच्या मुलासोबत तो सर्व्हिस सेंटर च्या बाहेर पडला . समोरच असलेल्या रिक्षा स्टँडवर एकंच रिक्षा उभी .. तो लगबगीने आत शिरला .. आपल्या मुलाचा हात धरून त्याला आत घेऊ लागला ..तेवढ्यात ते काहीसे वयस्कर रिक्षाचालक म्हणाले .. “ दादा …. त्या “बारक्या”ला आतमधल्या साईडला बसवा .. तिकडे पॅक पट्टी आहे न्.. तेवढीच शेफ्टी !! […]

उम्मीद पर दुनिया कायम है

आता हे गेल्यावर्षीचं कोरोना प्रकरण बघा ना !!.. बिचारी इतकी निर्दोष माणसं मारली गेली .. इतके संसार उद्ध्वस्त झाले .. अगदी जगभर .. पण तुम्ही-आम्ही अजून जगतो आहोतच ना ? धक्क्याने गेलो नाही .. कारण हीच “उम्मीद” […]

खारीचा वाटा

मी व्यवसायात उतरण्यात किंवा बेकरी सुरू करण्यात त्याचा अप्रत्यक्ष “सिंहाचा वाटा” असला तरी गेल्या दहा वर्षात या कंपनीची जी भरभराट झाली आहे त्यात मात्र माझ्या मित्राचा “प्रत्यक्षपणे” आणि अगदी “शब्दशः”.. .. “खारीचा वाटा“ आहे .. हाहा ss .. !! ….पौराणिक काळापासून चालत आलेला “खारीचा वाटा“ हा शब्दप्रयोग सगळ्यांनी पूर्वी अनेकदा ऐकलाय .. पण आमच्या सुरेशचा ; आजच्या आधुनिक युगातला हा “खारीचा वाटा“ नक्कीच वेगळा आणि तितकाच समर्पक आहे ना मंडळी ?? […]

एक डल्गोना कॉफी अशीही

चमच्यानी ढवळत ढवळत एकीकडे तो व्यक्त होत होता . आपसूकच “मम” म्हंटल्यासारखा तिचा हात त्याच्या हाताकडे वळला ….. दोघांनीही एकत्र ढवळत….कॉफीच्या दोन्ही थरांची सरमिसळ करत , दोन्ही नात्यांना एकसंध , “एकजीव” केलं होतं …. अगदी नकळतपणे !!! ………दोन्ही नाती एकत्र होत एक नवीन नातं तयार झालं होतं “मैत्रीपूर्ण नवरा-बायकोचं नातं “ […]

कळतंच नाही आजकाल

कळतंच नाही आजकाल काय झालोय आपण, कसे झालोय आपण !! तेच तेच रहाटगाडगं ढकलत “रटाळ” झालोय आपण !! […]

सुटका

काही दिवसांनी समोरच्या सोसायटीत एक अ‍ॅम्ब्युलन्स आली .. कोणीतरी दोघे उतरले .. बिल्डिंगमधल्या बाकीच्यानी त्यांच्या त्यांच्या खिडकीतून टाळ्या वाजवल्या .. आनंदानी कसल्याश्या घोषणा दिल्याचे आवाज ऐकू आले. […]

ऋषी कपूर …. 102 Not Out

तत्कालीन प्रेक्षक वर्गाला एका चॉकलेट हिरोची “खोज” होतीच . “ये ईश्क नही आसान“ असं वाटणाऱ्या मंडळीना तर त्यांनी चक्क “प्रेम रोग” दिला आणि त्यांच्या चाहत्यांचा एक “नया दौर” सुरु झाला . […]

हा खेळ स्माईल्यांचा

आपल्या दिनचर्येतल्या अनेक गोष्टींमध्ये सोशल मीडियाचा समावेश झाला आणि अल्पावधीतच त्यानी आपल्या बऱ्याचश्या वेळेवर ताबा मिळवला. कधी टाईमपाससाठी तर कधी कामासाठी म्हणून chatting करणं ही एक गरज होऊ लागली आणि आपला संबंध आला तो chatting चा अविभाज्य घटक असलेल्या ..“स्माईली” या प्रकाराशी. […]

आरसा (कथा)

सलून मधला प्रसंग आहे …..मी सलून मध्ये बसलो असताना बहुधा तिथेच आजूबाजूला राहणारा एक ५-७ वर्षांचा लहान मुलगा आत शिरला … मागोमाग त्याची आई आली आणि सलून मध्ये काम करणाऱ्या माणसाला आणि आपल्या मुलाला आळीपाळीने सूचना देऊ लागली .. .. “अहो , याचे केस कापून झाले न की त्याला फक्त बाजूच्या बिल्डींग च्या गेट पर्यंत सोडा … […]

वीस-विशी (२०-२०)

सुरु होते सुरळीत । साऱ्या सृष्टीचे व्यवहार । आला अदृश्य विषाणू । माजविला हाहाःकार ।। १ ।। किती उपाय योजिले । दूर ठेवण्यासि त्यास । रोज डांबून ठेविले । घरी सकळ जनांस ।। २ ।। हात सतत धुतले । पाणी प्यायले कोमट । तरी सरता सरेना । विचारांचे जळमट ।। ३ ।। नको कसलाच धोका । […]

1 5 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..