गुड्स आणि सर्व्हिसेस करप्रणालीची चार वर्षं
वस्तू आणि सेवा कराची ‘ऐतिहासिक’ अंमलबजावणी सुरू झाली, त्यानिमित्त मध्यरात्री संसदेचे अधिवेशन बोलावले गेले आणि १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारताचा जो ‘नियतीशी करार’ झाला त्याप्रमाणे समारंभ करून २०१७ सालच्या १ जुलैला वस्तू आणि सेवा कर – गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स- ही नवीन कर प्रणाली आणली गेली. […]