नवीन लेखन...

महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी

महाराजा सयाजीराव यांचे बडोदा राज्य आणि महात्मा गांधीजी यांचे जन्मगाव एकाच म्हणजे गुजरात राज्यात येते. महात्मा गांधीजी आणि महाराजा सयाजीराव यांचा स्नेह दृढ होता.

महात्मा गांधींनी 12 मार्च 1930 ते 6 एप्रिल 1930 या काळात दांडी यात्रेचे आयोजन केले. इंग्रजांनी सयाजीराव महाराजांना आदेश दिला, गांधींची दांडी यात्रा बडोदा राज्यातून जाणार आहे, त्यांना अटक करा. सयाजीराव महाराजांनी अटक केली नाही. इंग्रजांनी कारण विचारले असता, सयाजीराव महाराज म्हणाले, ‘अटक करण्यासारखे गांधीजी काहीही बोलले नाहीत किंवा काही कृती केली नाही.’ पुढे गांधीजींनी लक्ष्मीविलास राजवाड्यात महाराजांची भेट घेतली. त्यावेळी सयाजीराव महाराजांसमोर बसण्यास नकार दिला. कारण सयाजीराव महाराज गांधीजींपेक्षा वयाने मोठे होते. आपण सर्वजण गांधीजींना बापू म्हणतो;परंतु गांधीजी सयाजीराव महाराजांना बापू म्हणत. भेटीवेळी दोघांनी एकमेकांचा सन्मान म्हणून खाली बसून गप्पा मारल्या. एकमेकांना परस्परांशी नितांत आदर होता.
महात्मा गांधीजी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात निर्माण झालेल्या विसंवादावेळी सयाजीराव महाराजांनी मध्यस्थी करण्याचा खूप प्रयत्न केला. महाराज त्यावेळी परदेशात होते.

महात्मा गांधीजींना सयाजीराव महाराजांच्या अस्पृश्य उद्धार कार्याबद्दल खूप आदर होता. म्हणून त्यांनी येरवडा जेलमधून 8 मार्च 1933 रोजी पत्र पाठवले. पत्रात लिहिले, “There can be no doubt that His Highness the Maharaja Saheb Gaekwar sayajirao of Baroda deserves the warmest Congratulations of us all for his treatment of Harijans and his withdrawing all State recognition of untouchability.” – Mahatma Gandhi.

डॉ. राजेंद्र मगर

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..