नवीन लेखन...

बनावट चलन शोधणारे यंत्र

आपण लहानपणी ‘येरे येरे पावसा.. तुला देतो पैसा, पैसा ‘झाला खोटा .. पाऊस आला मोठा’ हे गाणे ऐकले होते.आता अनेकदा पैसा खोटा असल्याचा अनुभव येतो.विशेष करून ५०० व १००० या चलनाच्या नोटा तर अनेकदा खोट्या निघू शकतात. रिझर्व बँक ऑफ इंडियाने असे खोटे चलन ओळखण्याबाबत मार्गदर्शन केले असले तरी सामान्य लोक चटकन त्या खोट्या नोटा ओळखू शकत नाहीत. त्यासाठी बाजारात ‘फेक करन्सी डिटेक्टर’ नावाचे यंत्र मिळते.

रिझर्व बँकेनेही त्यांच्या काही कार्यालयात अशी बनावट चलन ओळखणारी यंत्रे बसवली आहेत, ती तासाला ५० ते ६० हजार नोटांची तपासणी करतात. बनावट चलन ओळखणारी यंत्रे १५०० ते ४००० रुपयांपर्यंत इलेक्ट्रॉनिक दुकानात मिळतात. मेथोडेक्स सिस्टीम्स, गोदरेज, क्लिक, मॅक्ससेल, स्टँडर्ड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स, कोरस इंडिया अशा अनेक कंपन्यांनी ही यंत्रे बनवली आहेत. ग्राहकही लेसर टॉर्चच्या मदतीने चलनाचे निरीक्षण अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात पण त्यासाठी खऱ्या व खोट्या नोटेतील फरक माहीत असावा लागतो. कुठल्याही चलनाची निर्मिती करताना त्यात अशी वैशिष्ट्ये आणलेली असतात जी साधारणपणे बनावट नोटा छापताना आणता येणार नाहीत.

त्यात सिक्युरिटी स्ट्रीप, कलर चेंज इंक, मायक्रोरायटिंग, वॉटरमार्क यांचा समावेश असतो. पाश्चात्त्य देशात अशा बनावट नोटा ओळखण्यासाठी फेक करन्सी चेकर पेन वापरला जातो त्यात आयोडिनचे मिश्रण असते. त्यामुळे तो चलनावर टेकवल्यानंतर डाग पडला नाही तर चलन खरे आहे हे समजते जर डाग पडला तर चलन खोटे आहे हे कळते कारण खोटे चलन हे लाकडापासून बनवलेल्या कागदावर शक्यतो छापलेले असते. खरे चलन हे विशिष्ट प्रकारच्या कागदावर छापलेले असते.

आणखी दोन प्रकारची यंत्रे असतात त्यात युव्ही म्हणजे अल्ट्राव्हायोलेट डिटेक्शन व मॅगनेटिक डिटेक्शन अशा दोन पद्धती असतात. कुठल्याही चलनात अल्ट्राव्हायोलेट इंकचा वापर केलेला असतो, जेव्हा एखादी नोट अल्ट्राव्हायोलेट डिटेक्टरमध्ये येते तेव्हा तो जर प्रतिसाद मिळाला नाही तर नोट खरी समजावी.

जर ती कलर कॉपियरवर छापलेली खोटी नोट असेल तर तिची प्रतिमा तयार होते. अल्ट्राव्हायोलेट लाइटमुळे चलनाच्या पृष्ठभागावरील टोनरचे ठिपके अधिक स्पष्ट दिसतात. मॅग्नेटिक डिटेक्टरमध्ये चलनातील चुंबकीय शाईचे गुणधर्म लक्षात घेतले जातात. इन्फ्रारेड डिटेक्टरमध्ये चलनातील इन्फ्रारेड इंक (शाई) तपासली जाते. पण यात इन्फ्रारेड व मॅग्नेटिक डिटेक्टरला चकवा देता येतो; त्यामुळे या सर्व डिटेक्टरचे गुणधर्म असलेला डिटेक्टर आवश्यक आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..