नवीन लेखन...

प्लास्टिकपासूनचे धोके

व्यवहारात सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमध्ये लो डेन्सिटी पॉलिथिलिन (एलडीपीई), हाय डेन्सिटी पॉलिथिलिन पॉलिव्हीनाइल क्लोराईड, पॉलिकार्बोनेट पॉलिस्टायरीन (पीएस), पॉलियुरेथीन (पीयू), पॉलिलीप्रॉपीलीन (पीपी), पॉलिथिलीन-टेरेथेलेट (पेट) हे प्रकार येतात. अनेक पॉलिमरमध्ये कार्बन आणि हायड्रोजन असतो. पीव्हीसीमध्ये क्लोरीन असतो. नायलॉनमध्ये नायट्रोजन असतो.

टेफ्लॉनमध्ये फ्लोरिन असतो. पॉलिस्टर आणि पॉलिकार्बोनेटमध्ये ऑक्सिजन असतो. ज्या मोनोमरपासून पॉलिमर बनवतात त्यातील बरीच मोनोमर कर्करोगजन्य असतात.

पॉलिमर बनवताना त्यात वेगवेगळे गुणधर्म आणण्यासाठी इतर रसायने घालतात. उदा.
लवचीकपणा, विविध रंग इत्यादी. ही इतर रसायने पॉलिमराबरोबर पूर्णपणे एकरूप होत नसल्याने त्याचे काही धोके जाणवतात. भारतातील एकूण प्लास्टिकपैकी ५२ टक्के प्लास्टिक पॅकेजिंगसाठी वापरले जाते. याचाच अर्थ असा की ते एकदा वापरून फेकून दिले जाते आणि कचऱ्याच्या डब्याची धन करते. पण हे प्लास्टिक बऱ्याच वेळा पुन्हा वापरले जाते. असे झाले तरी प्लास्टिक ३ ते ४ वेळेपेक्षा जास्त वेळा वापरता

येत नाही. मोठ्या कंपन्या प्लास्टिकचा वापर पुन्हा करीत नाहीत आणि छोट्या कंपन्यांकडे फार चांगली सोय नसल्याने ही पुनर्चक्रित प्लास्टिक गुणवत्तेत कमी पडतात. अशी प्लास्टिक्स वापरून झाल्यावर रस्त्यांवर, रेल्वे रुळांच्या कडेकडेने, एस. टी. धावते त्या रस्त्यांवर पडून राहते. मग पावसाच्या पाण्याबरोबर या प्लास्टिकमधील रसायने जमिनीत झिरपून जमिनीखालच्या पाण्यात मिसळतात आणि तें पाणी प्रदूषित होते.

अनेक ठिकाणी प्लास्टिक जाळले जाते, त्यामुळे हवेचे प्रदूषण होते. प्लास्टिक पाण्यात फेकल्याने ते गाई-म्हशींच्या पोटात जाऊन त्यांच्या जीवावर उठते. पावसाळ्यात रस्त्यावर फेकलेले प्लास्टिक सांडपाण्याच्या नळात जाऊन बसते आणि रस्त्यावर पाणी तुंबून राहते. आपण प्लास्टिक वापरतो आणि त्यावर प्रक्रिया करताना हानिकारक वायू हवेत गेल्याने प्रदूषण होतेच, पण त्याचा कामगारांनाही उपद्रव होतो.

(आपण सध्या कुतूहलमधून दैनंदिन जीवनातील रसायनांची विविधांगी माहिती करून घेत आहोत. आपल्या शरीरातदेखील रासायनिक घडामोडी होत असतात. त्यातही हल्ली आपण डीएनए, जीन्स हे शब्द वरचेवर वाचत असतो. पण म्हणजे नेमकं काय ते आपण यापुढ भागांतून जाणून घेणार आहोत.)

-अ. पां. देशपांडे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..