नवीन लेखन...

कार्य सिद्धीस नेण्या झाले पलायन

कार्य सिद्धीस नेण्या झाले पलायन
मग जगावया लाभले नामस्मरण
परी उच्च होता दृष्टिकोन
मनी भक्कम समर्थांचा!!

अर्थ

गुंतून रहाणं गरजेचे असते का? अडकून बसणे किती महत्वाचे? कोण ठरवितो कधी गाठ सैल करावी बंधनांची? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर पहिलं एकंच आहे, कशाकरिता? हाही प्रश्नच पण ते उत्तर आहे आधी पडलेल्या प्रश्नांचे.

भविष्य उज्वल व्हावे असे वाटत असेल तर आधी भूतकाळातल्या दावणीला बांधलेले दोर पहिले सोडावे लागतात नाहीतर गळा आवळला जाऊन त्रास वाढण्याची शक्यता जास्त. इंग्रजीत एक वाक्य आहे ,” Doing right thing or bad thing doesn’t matters, What cost you Bear Matters ”

आपण जे करणार आहोत त्यासाठी काय किंमत मोजावी लागते यावर ती गोष्ट बरोबर की चूक हे ठरते.

समर्थांनी जेव्हा घर सोडण्याचा अतिशय कठीण आणि लहान तोंडी मोठा घास घेतला तो पुढे काय करायचे आहे हे आधीपासून ठरलेलं होत म्हणून शक्य झालं. मला व्यापार करायचा आहे म्हणून मी घरदार सोडत आहे किंवा परमुलुखात जाऊन चाकरी करायची आहे म्हणून मी घरातून बाहेर पडतोय असे कारण जर असते तर काही दिवसात नारायणाची घरवापसी झाली असती. पण कार्य सिद्धीस नेण्यास जे गरजेचे होते ते देशकार्य होते म्हणून मातोश्रींचा, थोरल्या बंधूंचा पर्यायाने स्वतःचा विरह पत्करणे गरजेचे आहे हे समर्थांना ठाऊक होते म्हणून ते सारे घडले.

म्हणून मनात राग, मत्सर, द्वेष अथवा डावलून टाकलेले पुढचे पाऊल हे स्वराज्याच्या विरोधात पडलेले पाऊल म्हणूनच गणले गेले. पण जर सर्वांचे हित, प्रेम, विश्वास टिकवून जर पाऊल पडले अन त्याला नामस्मरणाची साथ मिळाली तर स्वराज्य पुर्ती काही अशक्य नाही.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..