नवीन लेखन...

श्वास देती धडधड हृदयी (सुमंत उवाच – ८३)

श्वास देती धडधड हृदयी

हृदयी त्यांचे ऋण

प्राण जाता हृदया मधुनी

श्वास जगती वायू म्हणोन!!

अर्थ

हे सगळं कोणा मूळे सुरू आहे, याचा शोध घेत न बसता, आपल्यामुळे त्यातले काय कर्म साध्य होते याचा विचार करायला हवा. मी लिहायला बसतो, मला आधी सुचतं मग मी लिहायला बसतो असे फार कमी वेळा होते. त्याउलट मी लिहायला बसलो की आपोआप सुचते याचा अर्थ तो भगवंत, श्री समर्थांच्या रूपाने मला लिहायला प्रेरित करतो हे लक्षात असणे जसे गरजेचे तसेच मी इथपर्यंत पोचायला काहीतरी माझ्यात गुण आहेत तेही तितकेच मान्य करणे गरजेचे आहे.

जग केवळ कोणा एका मूळे चालत नाही. एखादं नातं केवळ कोणा एका व्यक्ती मूळे चालत नाही, तसेच व्यवहार हा सुद्धा केवळ कोणा एका मुळे होत नाही तर या सर्वांना दोन्ही टोकाला कोणी असतं म्हणून त्याला पूर्णत्व येतं. श्वासांमुळे हृदयाला प्राणवायू मिळतो म्हणून त्यांचे ऋण मानायचे का हृदयाने? पण मग तसे मानले तर जेव्हा हृदय थांबतं त्यानंतर श्वासांना केवळ हवेचे स्वरूप प्राप्त होऊन रहाते म्हणजे मग कमी कोण पडतं? यात कमी आणि जास्त कोणीच नाही. श्वासोच्छ्वास आणि हृद्ययातली धडधड या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांना एकमेकां शिवाय पूर्णत्व येऊ शकत नाही.

म्हणून जगताना, कोणतेही कर्म करताना, कोणतेही नाते टिकवताना, कसलाही व्यवहार करताना केवळ माझ्यामुळे हे सारे आहे हा समज खोडून टाकावा. आपण आहोत म्हणून सारे आहे म्हणण्या ऐवजी बाकीचे आहेत म्हणून आपण पूर्ण आहोत हे समजून चालले की जगणे सोप्पे आणि सुखकर होते.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 137 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..