कर्म, धर्म करावे जरूर
शिदोरी जवळ असावी
बुद्धी जाता लोप तेव्हा
शिदोरी लेप म्हणोनि लावावी
अर्थ-
दैनंदिन आयुष्यात आपण वेगवेगळ्या प्रकारची कामे करत असतो. कोण नोकरी करतो, कोण व्यवसाय, तर कोण धर्माची कामे देखील करतो. यावेळी आपण वेगवेगळ्या परिस्थितींत जगत असतो, निरनिराळ्या गोष्टींना सामोरे जात असतो अश्या वेळी एक शिदोरी आपल्या जवळ नेहमीच असते ती वापरावी.
ही शिदोरी म्हणजे आपल्या शरीरात असलेले आपले परममित्र असे आपले संयम, शब्द, तत्व यांचा संगम असलेले आपले मन. मनाला मोकळं करणं (चांगल्या शब्दात) , मनाला संयमी बनवणं, मनाला शांत करणं हे आपल्याच हातात असतं आणि ते जेव्हा जमतं तेव्हा कुठल्याही परिस्थितीत आपण विजय प्राप्त करूच शकतो. यासाठी समर्थांनी मनाच्या श्लोकांचा सागर आपल्या समोर निर्माण केला आहे, त्यातून आपण घेऊ तितके आपल्यासाठी हितकारकच.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply