नवीन लेखन...

मोजमाप नाही ज्याचे (सुमंत उवाच – ४९)

मोजमाप नाही ज्याचे
ते काबूत येणे अशक्य
परी जे न करावयाचे
ते सांगूनी ठेवावे

मना सज्जना दूर
जाऊ नको रे
मना दुर्जनासी
गळाभेट नको रे

अर्थ

जे दिसत नाही त्याला काबूत कसे आणणार? जे हातात येऊ शकत नाही त्याला पकडून कसे ठेवणार? ज्याला औषध लावता येत नाही त्याला बरे कसे कळणार? अहो बरे कसे पेक्ष्या काय झालंय हे तरी कसे ताडणार? फार कठीण गोष्ट ही मनास मानाने जाणणे आणि मनाला मनाच्या मनाची गोष्ट पटवून देणे तेही अशक्य. गुंतागुंत वाटते फार या मनाला समजायला गेले की पण यावर एक उपाय आहे. “मनाचे श्लोक”

काय करायचे हे माहीत नसते तरी काय करायचे नाही हे माहीत असणे जास्त महत्वाचे असते. बरोबर काय हे जरी माहीत नसते तरी चुकीचे ते काय हे ठाऊक आहे मग झालं तर. यात जगण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. मागे माझा मित्र म्हणाला की मला ऑफिस मधल्या चालणाऱ्या पार्ट्या आवडत नाहीत, चुकीच्या वाटतात पण, जावं लागतं बॉस ची मर्जी ठेवायला. त्यावर मी म्हटलं की यात चुकीचं ते काय? तर म्हणाला की मनाला पटत नाहीत या गोष्टी, मग सगळ्यांना वाटत की मीही दारू पितो, व्यसन करतो. म्हटलं की तुझ्या मनाला जे पटत नाही पण तुला जे करावं लागतं याला गरज म्हणतात. पण तू तेथे जाऊन काही करत नाहीस मग चुकीचं वाटण्याची
काही आवश्यकता नाही तेथे. काय करायचे नाही हे माहीत असले की मग काय करायचे हे आपसूक कळते.

एक खराब आंबा अख्या पेटीला खराब करतोच हे जरी खरं असलं तरी कोकीळ आपल्या पिल्लाला कावळ्याच्या घरट्यात नेऊन सोडते ते त्याने जगावे म्हणून, कावळा बनावे म्हणून नाही. आपल्यातल्या चांगल्या मनाला आपण पकडून ठेवले की आपण भले चुकीच्या संगतीत असलो तरी आपलं आयुष्य चुकीच्या मार्गावर जात नाही.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..