नवीन लेखन...

मालगाडीचे डबे (वाघिणी)

‘मालगाडी वाहतूक’ हे रेल्वेचं सर्वांत जास्त उत्पन्न असलेलं खातं आहे. सामानाच्या गरजेनुसार मालगाडीचे डबे तयार करणं हे महाजिकरीचं काम असतं. डबे बनवल्यानंतर प्रत्येक विभागाचे डबे एकाच मालगाडीला जोडले जातात व काही महिन्यानंतर त्यांची तांत्रिक क्षमता उत्तम साधण्यासाठी ते डबे पुन्हा आपापल्या विभागाकडे पाठविले जातात. मालगाडीचे डबे खालील गोष्टी वाहून नेत असतात:

  • धान्याची पोती
  • मिठागरातील मीठ
  • लाकूड, लोखंड, त-हेत-हेच्या वायर्स
  • गायी, म्हशी, घोडे, तसेच सर्कशीतील प्राणी (या डब्यांत मलमूत्र वाहून जाण्यासाठी व्यवस्थित सोय केलेली असते. गुरांना चारा, दाणापाणी यांचाही पुरवठा करण्याची व्यवस्था असते.)
  • वाळू, कोळसा, खनिज पदार्थ, पेट्रोल, विविध रसायनं, रेफ्रिजरेटर, दुधाचा पुरवठा करणारे टँकर्स, मोठमोठी मशिनरी घेऊन जाणारे कंटेनर्स.
  • मोटारी, दुचाकी, ट्रक, तोफा, टॅक्स्, वगैरे युद्धसामान.
  • कोरडा दुष्काळ पडला, तर अशा गावांना पाणी पुरविणारी टॅकर्सची संपूर्ण मालगाडी पाठविण्यात येते.
  • सन १९४० ते १९४५ मध्ये मुंबई शहराचा कचरा शहराबाहेर नेण्यास मालगाड्यांची सोय होती.

आज देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भरभराटीत मालगाडीच्या डब्यांमधून होणाऱ्या वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा सिंहाचा वाटा आहे. भारतातील कारखान्यांतून व कार्यशाळांतून अशा डबे बांधणीचा वेग सातत्याने वाढतो आहे.

-डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 178 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..