नवीन लेखन...

ट्रेन टू पाकिस्तान

साधारण १९१० ते १९१५ च्या सुमारास ब्रिटनचे थोर राजकारणी पुरुष विन्स्टन चर्चिल बंगलोर येथे सैन्य दलात काम करीत होते. येथून त्यांची बदली पेशावर येथे झाली . तेव्हा बंगलोर स्थानकावर रेल्वे तिकीट काढण्याकरता ते गेले असता भाड्याचा आकडा पाहून ते चक्रावलेच. एवढे भाडे इंग्लंडमध्ये कधीच दिलेले नव्हते. ते उद्गारले Now I have realised how vast is British empire.

आपल्या राज्याची घमेंड होतीच पण त्या काळात बंगलोरपासून पेशावरपर्यंत गाडीने जाता येत होते हे तितकेच कौतुकास्पद आहे.

१९४६ पर्यंत माझे वडील मुंबई पेशावर एक्सप्रेसने ३ रात्रीचा प्रवास करत असत. फाळणीपासून या भागातील रेल्वेची वाताहात झाली. रेल्वे इंजिन आणि डब्यांनी आर्त किंकाळ्या ऐकल्या. हजारो प्रेतांची ने-आण केली. अशा रक्तरंजित इतिहासावर अनेक पुस्तके लिहिली गेली. सिनेमे निघाले . त्यातील खुशवंत सिंग यांचे ट्रेन टू पाकिस्तान अनुवाद अनिल किणीकर पुस्तक मनाला चटका लावणारे मला फारच भावले होते पूर्णविराम पुस्तक वाचताना मी जणू त्या रेल्वेस्थानकावर उभा होतो इतके ऋदयस्पर्शी वर्णन आहे. जे मला भावले ते थोडक्यात मांडत आहे .

स्वातंत्र्यपूर्व काळात दिल्ली-लाहोर एक्सप्रेस एक अतिशय लोकप्रिय गाडी होती. खचाखच प्रवाशांनी भरलेली ही गाडी हिंदू मुस्लिम समाजाच्या एकोप्याचे प्रतीक होते. या मार्गावर भारत व आताच्या पाक सरहद्दीवरील एक छोटे स्टेशन होते मनो माजरा. त्याला लागून टुमदार खेडे होते.स्टेशनवर दिवसभरात दोन वा तीन गाड्या थांबत, मध्येच कधीतरी लांबच लांब मालगाडी जात असे. बाकी स्टेशनवर शुकशुकाट असे . दिल्लीवरून स्टेशन येण्यापुर्वी एक छोटी नदी, त्यावर रेल्वेचा पूल बाजुला दाट झाडी , गाडी स्टेशनात शिरण्यापूर्वी इंजिनची कर्कश्श सिटीदूरवरून ऐकू येत असे. आवाज येताच सुस्त पडलेल्या खेड्यात भराभर हालचाल व पाच पन्नास खेड्यातील माणसे स्टेशनवर जमा होत . काही मिनिटे ट्रंका, पोती चढवली जात, काही बोजे उतरवले जात.धुर ओकत गाडी लाहोर कडे रवाना होत असे.मध्यरात्री मालगाडीच्या डब्यांच्यारुळांवरील घर्षणाने कर्कश्य आवाज आसमंतात घुमत असे. खेड्यातील लोक चुळबुळत, पण स्टेशन रिकामेच असे.भल्या पहाटे लाहोर येणारी एक्सप्रेस दिमाखात स्टेशनात शिरे, खेड्यातील सर्व व्यवहार गाडी येण्याची निगडित होते. गावात एक छोटे गुरुद्वार होते , संत मंडळींची सतत वर्दळ असे.काही वेळा चोर डाकू हीआपले पाणी दाखवून जात. तरी सर्व मंडळी गुण्यागोविंदाने आनंदात राहात होती . भारत-पाकिस्तान अशी फाळणी झाली पूर्णविराम दोन्ही देशातील लोकांची माथी एकदम भडकली पूर्णविराम हाहाकार माजला पूर्णविराम लाहोर दिल्ली एक्सप्रेस आपले काम नियमित बसविण्याचा प्रयत्न करीत होती पूर्णविराम अनेक अडचणींमुळे गाड्या ३६-३६  तास उशिरा धावत होत्या.गाड्यांच्या टपावरहजारो प्रवासी बसून प्रवास करीत होते. वातावरणात भीषण सन्नाटा होता . एका मध्यरात्री लाहोर ऊन येणारी एक्सप्रेस गाडी काळोखात स्टेशनात शिरत होती पूर्णविराम सगळीकडे काळोखाचे साम्राज्य, बऱ्याच डब्यात भन्नाट सन्नाटा, पुरुष बायका लहान मुलांच्या प्रेतांनी डबे खचाखच भरलेले होते.काही प्रवासी मृतवत अवस्थेत बाकांवर कण्हत होते.डबा डब्यातून रक्ताचे पाट वाहत होते. गावकऱ्यांना वर्दी देण्यात आली .भराभर प्रेते स्टेशनबाहेरील मैदानात आणण्यात आली. एकत्रित भडाग्नी देण्यात आला .इंजिनची शिटी वाजली. गाडी दिल्लीकडे रवाना झाली .

दुसरे दिवशी दिल्ली हुन निघालेली लाहोर एक्स्प्रेस स्टेशनात शिरत होती.इंजिनवर मोठा फलक होतापाकिस्तानला भारताची भेट हजारो मुस्लिम बांधवांची प्रेते नव्या डब्यात पसरलेली होती. स्टेशनवर शीख बांधव सत् अकालचा नारा देत होते.गाडीने सिटी दिली आणि लाहोर कडे प्रयाण केले. हिशोब पुरा झाला होता . इंजिन आणि डबे पापाचा कलंक देण्यासाठी यार्डात रवाना झाले होते पूर्णविराम दिल्ली-लाहोर एक्सप्रेस परत कधीच धावणार नव्हती.

हृदयाचा थरकाप करणारी एका स्टेशन होती गुंफलेली सत्य कथा वाचताना मन गोठते, मती गुंग होते. गात्रे शिथिल होतात आपण दुःखाच्या प्रलयात वाहून जातो .

६० वर्षांनंतर दिल्ली-लाहोर समझोता एक्सप्रेस सुरू झाली आहे तिचे भवितव्य काळच ठरविणार आहे.

— डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..