एक विनोदी लेखक, कवी म्हणून सुरु झालेला अत्रेंचा प्रवास, आक्रमक वक्ता, विडंबनकार, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, परीक्षक, चित्रपट पटकथा-संवाद लेखक आणि अखेर सयुंक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रेसर राजकारणी अश्या अनेक वळणावरून ४० वर्षे अविरत पणे सुरु राहिला. […]
माझा जन्माच्या वेळी …आपल्या मुलाला दुसरी पण मुलगीच झाली म्हणून रुसलेल्या यमुना आजीचा राग ,रुसवा .. तिच्या जवळ राहिल्यानंतर हळूहळू विरघळत गेला … आणि नंतर तिचं खूप प्रेम वाटयाला आलं …मी तिच्याबरोबर राहिले अन् तिला माझा लळाच लागला … बुरहानपूरच्या मोठया घरात आजीबरोबर घालवलेला काळ माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ …आम्हा नातवंडांचं बालपण अतिशय सुंदर सांभाळलं […]
आज सक्काळपासून पाऊस कोसळतोय नुसता … सगळीकडे थंडगार झालंय … बाहेर फक्त पावसाचा आवाज … त्यात हा सुट्टीचा आळसावणारा मूड ! सकाळी मस्तपैकी गरम गरम आल्याचा चहा आणि भजी झालीत .. दुपारीचं ही असंच काहीबाही … आता बसलेय .. निवांत .. आपलं आपल्या मधेच गुंगून जाणं अनुभवायला ! हया कोसळणाऱ्या पावसाला ना नुसतं बघत रहावंस वाटतं […]
कोणत्याही राष्ट्राचा कणा ही त्याची अर्थव्यस्था आणि संस्कृती ,ह्यातून तुम्हाला देशाची खरी ओळख मिळते. तर आज आपण निघुयात व्हिएतनाम च्या मुंबई बघायला…..हा असा जगातील एकमेव देश आहे कि जिथे तुम्ही उतरलात तरी तुम्हाला करोडपती झाल्याचा आभास होतो…जणू काही तुम्ही आताच कौन बनेगा करोडपती जिंकून आलात. […]
आरूला, आता काय सरप्राईज बघायला मिळणार याची खूप उत्सुकता लागून राहिली होती. नीलनं आपल्याला या सगळ्या प्लॅनबद्दल आधी का नाही सांगितलं याचं तिला आश्चर्य वाटत होतं. नीलला राजूबद्दल काय माहिती असेल? त्यानं हे आपल्याला का नाही सांगितलं? डॉक्टरसाहेबांनी उपचाराचा भाग म्हणून राजूला इथं का आणायला सांगितलं असेल? असे अनेक प्रश्न आरूच्या मनात रुंजी घालत होते. […]
कालचा दिवस संस्मरणीय! म्हणजे पहा न, फ्रांसमधे पँरीसला ब्रेकफास्ट, बेल्जीयममधे ब्रुसेल्सला लंच आणि हॉलंडमधे रोटरडँमला डिनर!! रोटरडँम, म्हणजेच हॉलंड किंवा नेदरलँडमधील, डच लोकांच्या शहरात येता येताच नदी, त्यावरील ब्रिज आणि बाहेरुन विशिष्ट बारीक बारीक टायलींग असलेल्या 8-10 मजली इमारती पाहून खूप छान वाटल; लंडन, पँरीस, ब्रुसेल्सहून डचांच वेगळेपण नक्कीच जाणवल. बहुतेक घरांना बाल्कनी किंवा टेरेस होत्या. […]
उत्तर कर्नाटकामधल्या एका लहानशा खेडेगावात आपल्या आजी आजोबांबरोवर रहाणारी ती दहा बारा वर्षाची छोटी परकरी पोर …. तिचे आजोबा निवृत्त शाळा शिक्षक .. घरी पुस्तकंच पुस्तकं आणि आजोबां प्रचंड व्यासंगी !मग काय … रोज रात्री जेवण झाल्यावर अंगणात बसून आकाशातल्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या साथीनं ती आजोबांकडून गोष्टी ऐकत असे . कधी रामायण ,महाभारत , इसापनिती कथासरितसागर , […]
शाळा सुटली होती. सर्व मुले वेगाने गेटकडे धावत सुटली होती. प्रत्येकाचे आई-बाबा मुलांना घ्यायला यायचे. ती मात्र ह्या सर्वच गोष्टी नुसतं पाहण्याचे काम करीत होती, तिच्या मनाला वाटणारी हुरहूर मात्र तिला नकळत रडवून जायची. आज कितीतरी दिवस झाले होते सुमनला तिची आई सोडून गेली त्याला. तिची आईच होती तिच्या आयुष्यात तिचे सर्वस्व… तिचे आई-बाबा आणि तिचा […]