त्यावेळी मी केवळ ५ वर्षांचा होतो. माझी आई थकलेल्या हातांनी मला जेवण भरवत होती “हा घास काऊचा, हा घास चिऊचा, हा घास….”… आणि अचानक वादळ यावं असं कुणीतरी आलं नि मला गर्रकन भिरकावून दिलं. क्षणभर कळलंच नाही काय झालं? मी रडत होतो हुंदके देत होतो. डोक्यातून घळाघळा रक्त वाहत होतं. मला काहीच कळत नव्हतं, काही कळण्यासारखं ते वय नव्हतं. चार-पाच जण माझ्या आईला काहीतरी करत होते. मी मात्र काहीच करु शकलो नाही. केवळ आई आई म्हणून विव्हळत होतो. कळायला लागलं तेव्हा कळलं की माझ्या आईवर धर्मांधांनी बलात्कार केला होता. आईईईई आईईईई (मोठ्याने रडतो)… […]
भाऊसाहेबांची पदोन्नती रावसाहेब म्हणून झाली. त्यामुळे स्वाभाविकच त्यांना आकाश ठेंगणे झाले.धोनीने पहिला हेलिकॉप्टर शॉट मारल्यावर त्याला जसा आनंद झाला असेल तसाच रावसाहेबांना झाला. त्यांना मोठे ऑफिस भेटले. […]
कॅटी,राणी नसेलही पण ती वर्षभरापूर्वी टॅाम क्रुझ नामे हॉलिवूड सुपरस्टारची महाराणी होतीच की.टॉम क्रुझची लोकप्रियता ही अमिर-शाहररुख-सलमान खान,ह्रतिक रोषण,अजय देवगण आणि अक्षयकुमार यांच्या एकत्रित लोकप्रियतेपेक्षा किमान 10 पट मेाठी आहे. […]
रेल्वेने औरंगाबादला जाण्यासाठी उभा होतो. एक भिकारीन, अंदाजे दोन वर्षाच्या लहानग्या मुलाला कडेवरती घेऊन, भिक मागत होती. मजजवळ ती आली. मुलगा खूपच रोड अशक्त व नजरेत भरेल इतका कुपोषित होता. निस्तेज व अस्वच्छ चेहऱ्यामुळे माशा बसलेल्या होत्या. मुलाची काहीच हालचाल दिसत नव्हती. त्या मुलाकडे बघून मला त्याची सहानुभूती वाटली. मी पाच रुपयाचे नाणे तिच्या हाती दिले. […]
मी खोकल्यावरील गोळ्या घेण्यासाठी एका औषधाच्या दुकानात गेलो. दुकानदाराला म्हणालो मला 2 गोळ्या दे ! त्याने मला 5 गोळ्यांच पाकीट दिल आणि पैसे सुट्टे नसल्याच कारण पुढे केलं. मी त्या गोळ्या घेणच नाकारल आणि निघून आलो. मला दोन गोळ्यांची गरज असताना मी पाच गोळ्या विकत घ्याव्याच का ? […]
वृक्षांच्या रक्षणासाठी वृक्षांवर देवतांचे निवास स्थान आहे, ही परिकल्पना लोकांच्या मनात रुजविण्यचा प्रयत्न आपल्या प्राचीन ऋषिंनी केला. वट वृक्षावर –ब्रह्मा, विष्णु आणि कुबेर…. […]
डोंगर दर्याच्या खोर्यात अत्यंत दिमाखाने उभे असलेले बाभुळगांव सार्या महाराष्ट्राचा एक गौरव असलेले एक आदर्श गांव! गावाच्या चारही दिशांनी निसर्ग सौंदर्य होत, झुलझुळ वहाणारी सरीता तिच्या जवळ असलेल घाटांच सौंदर्य जवळच उभे असलेले प्राचीन असे हेमाडपंती धाटणिचे श्रीशंकराचे मंदिर हे सारे खरेतर त्यागावाचे एक भूषण होते. घाटाचे पायर्याचे आधार घेऊन उभे असलेले तुळशिवृंदावन नदीची शोभा द्विगुणीत करीत होते. […]