नवीन लेखन...

एकांकिंका : मला काय त्याचे? (भाग ३)

भाग २ पासून…

विनायक – काम… फालतू प्रश्न विचारणे, खोटया बातम्या तयार करणे, हे जर काम असेल तर धन्यच आहे.

मोहन – मी पैशांसाठी काम करतो. समाजसेवा करण्याची मला खोड नाही आणि माझ्या कामावर माझी निष्ठा आहे.

विनायक – एवढी निष्ठा जर आपण देशावर दाखवली तर बरं होईल.

मोहन – मला वाटतं आपण इथे तुझ्या नाटकाबद्दल चर्चा करायला आलो आहोत. विषय कुठेतरी भरकटतोय असं नाही का वाटत तुला?

विनायक – होय, मलाही असंच वाटतंय, पण याची सुरुवात तुच केलीस.

मोहन – ओके, माय मिस्टेक.

विनायक – दॅटस बेटर….. बरं.. बोलण्याच्या नादात मी विसरलोच की… तु चहा घेणार ना?

मोहन – नाही.. दारु घेणार, पाजतोस..

विनायक – हा हा हा…. मला वाटतं आपण नाटकाविषयीच बोलूया

मोहन – (हसत) ठीक आहे..

विनायक – आता बोल, तुला काय वाटतंय या नाटकाबद्दल.. एकंदर संहिता, संवाद, कथा कशी आहे?

मोहन – विनायक, तु एक चांगला लेखक आहेस त्याबद्दल वाद नाही. एक लेखक म्हणून तु हे नाटक उत्कृष्ट लिहिलं आहेस. पण ह्यात बरेचसे असे मुद्दे आहेत जे आजच्या समाजव्यवस्थेनुसार जहाल वाटतात. निर्वासितांवर अत्याचार झालेत पण ते त्याकाळी, आता तेच ते उगळून काय मिळणार? आणि सेक्यूलरिझमच्या ह्या युगात सतत धर्माचे डोस पाजणे म्हणजे जरा जास्तंच आहे.

विनायक – पहिला मुद्दा म्हणजे माझे विचार जहाल आहेत, हे मला मान्य आहे. मुळात मी माझे जहाल विचार लपविण्याचा कधी प्रयत्न सुद्धा केला नाही. कारण आपले जहाल विचार जर लोकांना बहाल केले तर सुराज्याचा महाल उभा राहू शकतो असं मला वाटतं. आणि निर्वासितांवर अत्याचार जरी त्या काळी झाले असले तरी त्यांना अजून न्याय मिळालेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे १९९० साली काश्मिरी पंडीतांना नेसत्या कपडयानिशी काश्मिरमधून हाकलून दिलं. “आम्हाला काश्मिर हवंय, काश्मिरी पंडीतांशिवाय आणि त्यांच्या बायकांसोबत”, अशा घेषणा देण्यात आल्या होत्या. त्यांनाही अजून न्याय मिळालेला नाही.

मोहन – (उपहासाने हसत) न्याय? न्याय मिळतोच कोणाला? गुन्ह्यांवर गुन्हे होत आहेत, बलात्कारावर बलात्कार होत आहेत, इथे न्याय मिळतोच कोणाला? अरे, त्या रामाच्या सीतेला अजून न्याय मिळाला नाही, तर आपलं काय?

विनायक – रामाने सीतेला सोडलं, रामाने सीतेला सोडलं हा एकच मंत्र आम्ही जपत आहोत. रामाने सीतेचा स्वीकार केला तर त्या युगातल्या लोकांना त्रास झाला आणि रामाने सीतेचा त्याग केला तर ह्या युगातल्या लोकांना त्रास होतोय. अरे मग रामाने करायचं काय? सीतेचा त्याग केल्यानंतर श्रीरामांनी परस्त्री सहवास धरला नाही. उलट रघूकुळातल्या पुरुषांच्या मनात सुद्धा परस्त्री येणार नाही असा आदर्श प्रभूरामचंद्रांनी घालून दिलाय, ह्याकडे कोण पाहत नाही. आणि न्यायाची भाषा न्यायाच्या दलालांनी करु नये.

मोहन – दलाल? तु मला दलाल म्हणालास? हाऊ डेअर यु?

विनायक – नाही… तुला नाही, ज्या यंत्रणेच्या आहारी तु गेला आहेस ना, त्या यंत्रणेला मी दलाल म्हणालो.

मोहन – होय… होय… मी या यंत्रणेच्या आहारी गेलोय. परिस्थितीच तशी होती.

विनायक – परिस्थिती माझीही फार अनुकूल नव्हती मित्रा. पण मी या यंत्रणेला बळी पडलो नाही.

मोहन – माझी परिस्थिती वेगळी होती.

विनायक – काय वेगळी होती?

मोहन – मला त्या आठवणी नकोत. त्या आठवणींची चाहूल जरी लागली तरी सहस्त्र सापांनी अंगाला विळखा घातल्यासारखे वाटते. सो प्लीज.. मला तो विषय नकोय.

विनायक – ओके… ओके… आपण निर्वासितांबद्दल बोलत होतो.

मोहन – होय निर्वासितांबद्दल.. पण मला वाटतं खरंतर आपले विचार निर्वासित असतात, बेघर झाल्याप्रमाणे सैरावैरा धावत असतात… विनायक तुला आवठतंय का? मुंबईत ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाला होता, तेव्हा आपण दोघांनी त्या ठिकाणी जाऊन पिडीतांना सहाय्य केले होते.

क्रमशः
पुढील भाग लवकरच…

— श्री.जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Avatar
About जयेश शत्रुघ्न मेस्त्री 12 Articles
हिंदूत्त्व या विषयावर परखडपणे लिहिणारे श्री जयेश मेस्त्री हे व्यवसायाने विमा (एल. आय. सी )आणि गुंतवणूक एजंट आहेत. ते हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..