नवीन लेखन...
Avatar
About सुरेश वांदिले
श्री. सुरेश वांदिले हे महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क विभागात संचालकपदावर आहेत. महाराष्ट्र शासनाच्या “लोकराज्य” या मासिकाचे ते संपादक आहेत.

मुर्खाचं नंदनवन कुठं बरं आहे?

माणसाच्या मूर्खपणावर आईनस्टाईन सरांचा किती विश्वास होता बघा. हे सर म्हणजे एकदम बाप माणूस हे आपणास ठाऊक आहेच. सगळया मानवांपेक्षा या सरांचा मेंदू अधिक विकसित झाल्याचं नंतर सिध्द झालं.इतर मानवांपेक्षा हुषारीच्या बाबतीत अनेक पावलं समोर असलेलं सर असं म्हणतात म्हणजे ते सत्यच असलं पाहिजे,नाही का? […]

साठी बुध्दी..

महाराज आणि प्रधानजी उपवनात नित्याप्रमाणे फिरायला निघाले. थोडे अंतर चालून झाल्यावर प्रधानजीला महाराज विचारत झाले, प्रधानजी साठीझाली की काय होतं हो.. […]

‘ध’ चा ‘मा’

कोण आहे रे तिकडे,महाराजांनी आवाज दिला.सेवक दौडतच आला. महाराज आज्ञा असावी. अरे, प्रधानांना ताबडतोब इकडे उचलून आण. महाराज गरजले. उचलून ? मी नाही समजलो महाराज, सेवक भीत भीत म्हणाला. गधड्या मला म्हणायचं होतं ताबडतोब त्यांना बोलावून आण. जसे असतील तसे.
टॉवेलात असतील तरी चालतील कां तुम्हांस.. […]

विदर्भ एक्सप्रेसात उंदिर..निंद हराम

उंदरासारखा सारखा उंदिर (तो त्याचाच सारखा असणार,तो काही अर्नाल्ड स्वात्जबर्ग पहेलवानासारखा कसा असेल?) परवा विदर्भ – गोंदिया सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील अभिजनांना त्यांच्या डब्यात दिसला काय नि एकच हलकल्लोळ माजला काय? हा इथे आलाच कुठून आणि कसा हा पहिला सवाल दणक्यात अभिजनमुखी आला नि आरडाओरड सुरु झाली.विदर्भ – गोंदिया सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये या उंदराने येऊ नये असे फर्मान रेल्वेबोर्डाने […]

माईकचा शोध लागला नसता तर काय झाले असते?

माईकचा शोध लागला नसता तर काय झाले असते? तसे काहीच झाले नसते. माईक नव्हता तेव्हा सभा, बैठक होतच होत्या की! महाभारताच्या युध्दात माईक नसतानाही इकडचे सेनापती आणि तिकडचे सेनापती आपआपल्या बाजूंच्या सैनिकांना इन्स्ट्रक्शन देतच होते की! त्यामुळे माईकचा शोध लागला नसता तरी काहीच फरक झाला नसता..
[…]

महाराज सुध्दा बायकोस भ्यायचे..

सकाळी सकाळी प्रधानजीकडे महाराज धावतच पोहचले.हे दृष्य उभ्या आयुष्यात प्रधानजींनी बघितले नव्हते.कारण धावायची पाळी त्यांचीच असायची.राजाकडे सगळयांनी धावायचे.राजाने नव्हे.त्यामुळे महाराज दिसताच प्रधानजींनी नैऋत्य दिशेकडे बघितले.आज सूर्य तिकडून तर निघाला नाही ना,याची खात्री करुन घेतली.
[…]

राजपुत्राचा नातेवाईक..फुकटातला आनंद..

ब्रिटनचे राजपूत्र चार्लस यांचा लेक प्रिन्स विल्यम हा भारतीय वंशाचा असल्याचा शोध डीएनए संशोधकांनी लावल्याचे वृत्त आले आणि आमच्या घरी आनंदोत्सव सुरु झाला.आमच्या सौभाग्यवतीनं सगळया कॉलनीस पेढे वाटले.संतोषी मातेच्या मंदिरात जाऊन नारळ फोडला.तिच्या चेहऱ्यावरचे तेज नुसते ओसंडून वाहत होते. […]

घरची भजी आणि हॉटेलची भजी-एक शोध-एक अन्वयार्थ

अशी कुरकुरित भजी आपल्या बायकांना कां करता येत नसावे हो, रावसाहेबांनी भाऊसाहेबांना विचारलं. कुरकुरित भजी हॉटेलातच. घरी फक्त बायकोचं बोलणं तेव्हढं कुरकुरित.मॉलमध्ये फक्त कुरकुरे चिप्स.
[…]

मार्क व्टेन आणि श्रीशांत

विनोदी लेखनासाठी सुप्रसिध्द असलेले आणि तिरकस रिमार्कसाठी कुप्रसिध्द असलेले मार्क व्टेन एकदा सहज म्हणून गेले, काही पुस्तकं अशी असतात की जी लेखकास शब्दबद्द होऊ देण्यास तीव्र नकारघंटा वाजवतात. त्यांच्या पाठिमागे प्रेयसीच्या पाठिमागे लागणार नाही इतका लेखक लागतो, मनधरणी करतो,पण ही पुस्तकं ढिम्म हलत नाही. गदागदा हलवली तरी डुलत नाहीत, किती खरं बोलले नाहीत का हे व्टेन महोदय. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..