नवीन लेखन...

यडा.. पणा

————–

श्री विक्रम शिवाजी बल्लाळ यांनी “मराठीसृष्टी”च्या फेसबुक पेजवर लिहिलेली ही कथा…


सातारा स्टँडवर सरवांची वर्दळ सुरू असल्यानं स्टँड बहरल व्हती,कॉलेज ची गावठी पोरं उगाचच उनाडक्या करीत इकडून तिकडं फिरत व्हतं..त्यासनी असं वाटत व्हतं जणू सगळ्या जगाची अक्कल त्यासनी आलीय…एक एका गावची एस टी येत व्हती तसं पोरा अन पोरींचा घोळका लगबगीनं गाडीकड धाव घेत एकमेकांसनी म्होर ढकलत जात व्हता.

उमेश नुकताच मुंबई वरन गावाला जायला स्टँड वर पोहचला व्हता,त्याच्या बर त्याची बायको सुमन व 3 वर्षांचा पोरगा विपुल असा परिवार व्हता,समोरच त्याला कॉलेज ची पोर पोरी दिसत व्हती,कुणी पोरीकडं बघत व्हतं,तर कुणी दंगा करत व्हतं, ही कॉलेजची व वेगळी दुनिया आता त्याला आपलीशी वाटत व्हती,त्यांच्याकड पाहून उमेश मनातच हसला,
त्या पोरांमधी त्याला तुषार,केतन व शिऱ्या दिसत व्हते.त्यांच्या आठवणी दिसत व्हत्या.

गावची एस.टी लागली उमेश त्याच्या परिवारासोबत एस.टी कड वळला खिडकीशेजारी बसल्यावर त्यानं स्टँडच्या बकड्याकड पाहिलं त्याला त्याच कॉलेजच दिस आठवू लागल अन नकळत त्यो त्या दिवसात बुडून गेला.
आता मनात त्यो बोलत व्हता मी पण असाच बाकड्यावर बसायचो…..

भुगावची एस टी लागली तसा गावच्या पोरा पोरींचा घोळका गाडीकडं वळला,ढकला ढकलीत सर्वी कशी बशी गाडीत चढलीत,उमेशन ही पण गाडी सोडली व्हती,सकाळपासन गाडी सोडायची त्याची तिसरी यळ व्हती.

उमेशचं बी.ए पूर्ण झालं व्हतं,11 वी पासन त्यो सातारला शिकला व्हता गावावरन गाडीनं कॉलेज,अन परत घरी असा त्येचा नित्य नियम व्हता,पहिला एस.टी चा पास त्यानं 150 रु चा काढला व्हता तर आता 400 रू पास झाला व्हता, उमेश ची आय मंगल 100 रु रोजन दारीवर भांगलाय जाऊन घरदार संभाळीत व्हती,तिला उन नव्हतं ना तान,पाऊस नव्हता ना थंडी,आय परमानच उमेशचा बाप सदा पण शेतात रोजनदारीवर काम करत व्हता.त्यासनी आत्ता उमेशच्या नोकरीची आस लागली व्हती.लहान पणापासन आय बापनं उमेशला काय बी कमी पडू दिलं नव्हतं.

गाडी सोडली अन उमेश स्टँड वर माधुरी कुठं दिसतीय का त्ये बघाया लागला पर आज त्येला माधुरी दिसली न्हवती आजचा ह्यो 18 वा दिस व्हता मधुरीबर काय पण संवाद नव्हता झाला,माधुरी त्येच्या शेजारच्या भूमगावची,त्येच्याच वर्गातली पोरगी तीन पण बी.ए पूर्ण केलं व्हतं,अत्ता या वर्षी एम.ए सुरू व्हतं,माधुरी एम.ए करतीय म्हणून उमेश पण एम.ए ला प्रवेश घेतला व्हता.त्याच तिच्यावर प्रेम व्हतं,शाळेत 5 वी पासन ह्ये एकाच वर्गात व्हतें,माधुरी जिथं जाईल तिथं उमेश तिच्या माग जात व्हता..!

पर आज उमेश लयच नाराज झाला व्हता,इतकं दिस झालं तरी माधुरी त्याच्यावर प्रेम करते का नाय ह्ये त्येला माहीत नव्हतं.हळूच त्यो स्टँड वरच्या बाकडयावर बसला अन मनातच विचार करायला लागला.

“लयच दिस गेलं,पर माधुरीच कायच कळना कसं व्हनार कुणास ठाव,आयला डोक दुखायला लागलं…”

माधुरीच्या पायी ह्यांन लय यळ अन नोकरीच्या संधी सोडल्या व्हत्या,त्याच्या बरच्या पोरांची पर हीच अवस्था व्हती ह्ये बहाद्दर स्वतःसाठण नाय तर पोरिंसाठण शिकत व्हतें.दररोज ची हीच काम, आय बाप शेतात राब राबून पैसेदेणार तवा एस.टी चा पास निघणार अन पोर शहरातल्या चौका चौकात मोकाट हिंडणार त्यांसनी ना घरची काळजी ना भविष्याची. उमेशन पण आजवर हेच केलं व्हतं,कॉलेज च्या नावाखाली एक वही घिऊन,कधी कॉलेज,कधी हा चौक तर कधी त्यो चौक,अस म्हणता म्हणता यंदा एम.ए पर्यंत पोहचला व्हता,म्होर काय करायचं हे त्येला माहीत नव्हतं पर माधुरी बर लग्न करायची स्वप्न त्यो दिवसा ढवळ्या रंगवत व्हता.

उमेश दिसायला सावळा व्हता,उंची मद्यम,पिळदार शरीर या मूळ त्यो उठावदार दिसायचा,राहणीमान तसं साधं व्हतं.गावच्या शाळेत उमेश अन त्याचे मित्र बोलत बसले व्हतें,सांयकाळचे 7 वाजले व्हतें,पर उमेश कायच बोलत नव्हता,त्याच्या कड बघत तुषार म्हणाला.

“लयच यडा लका तू,काय झालं ते तरी बोल,असा घुम्या गत का बसलयस.” “माधुरी दिसली नाय त्याला..”

हळूच शिऱ्या म्हणाला. हे ऐकून केतन रागातच म्हणाला.
“ये,आय घाल्या,डोक्यावर पडला का तू?”ती नाय दिसली म्हणून काय जीव देणार का?लका सुधर
तिला माहीत हाय का तुझं तिच्यावर प्रेम हाय ती..?आपल्याला नाय पटत तुझं… हे काय बरोबर नाय.
“आर पण उमेशच प्रेम हाय तिच्या वर.” शिऱ्या म्हणाला.

त्यावर लगेच केतन न खडा सवाल केला.
“तीच हाय का उमेशवर प्रेम…?”
उम्या आता काय आपुन 11 वीला हाय का?बी.ए पूर्ण झालं की,नोकरीच बघायला पाहिजे,का असाच पोरिंच्या माघ हिंडणार.”
केतनच्या बोलण्यानं सर्वी शांत बसलीत.खरं होत केतन च आता लय यळ गेला व्हता,काय तर करायची यळ व्हती.पण उमेशच्या मनात अजून माधुरीच व्हती ताडकन त्यो उठला अन म्हणाला.
“चला भूमगावला जाऊ माधुरीची माहिती काढू काय झालं ते.”
“ये,मार खायला लावणार का तू..?”

पण कसं बस त्यानं पोरांना तयार केलं,चोरट्यागत ह्ये भूमगावत गेलेच,तिथं त्यानी माधुरीची माहिती काढली,तवा त्यासनी कळाल माधुरी कुठल्यातरी पोराबर पळून गेली.अन तीन तिकडच लगीन केलं.

उमेशच्या भ्रमाचा भोपळा फुटला व्हता,त्याच्या प्रेमाचं घर बांधण्याआधीच पडलं व्हतं,आता तर त्यो चक्क जोरजोरात रडायला लागला अन म्हणाला.
“माझं प्रेम अधुर राहील,माझं प्रेम अधुर राहिलं.”

त्या वर्षीचा यळ उमेशन यडा.. पणातच घालवला अन एम.ए त्यांन मधूनच सोडलं होत.
भूमगावत एस.टी पोहचली,कॉलेज च जीवन आज उमेशच्या डोळ्यासमोर उभं राहिलं व्हतं,हातात बॅग अन विपुलाल खांद्यावर घेऊन त्यो घराकडं निघाला,त्याच्या चालण्यात उत्साह नव्हता,
“लयच यडा पणा केला कॉलेज जीवनात,नीट अभ्यास केला असता,सरकारी नोकरीच्या माग लागलो असतो,तर आता सुधारलो असतो.”

उमेश मुंबईला होता खरा पण खाजगी कंपनीत कामाला व्हता पगार कमी,स्वतःच पोट कसतरी भरत व्हतं,आय अजुन रानात राबत व्हती,बापच छत्र कवाच हरपलं व्हतं,गावातन आय धान्य पुरवीत व्हती..पर उमेश आयला दर महिन्याला पैसे दयायला पण असमर्थ व्हता.

पोराच्या डोक्यावरन उमेशन हात फिरविला,आता उमेश घरी पोहचला व्हता,उंबरा ओलंडताना त्याच्या मनात होत.

“मी जे केलं त्ये माझं पोरग नाय करणार,त्याला मी नीट शिकवीन,पण माझ्यासारख नाय..”

— विक्रम शिवाजी बल्लाळ

“मराठीसृष्टी”च्या फेसबुक पेजवरुन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..