नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

लबाड पुरूष

तू ! तू तुझं पावित्र्यही जपलेस आणि मर्यादाही पाळल्यास! तुझं जीवन हे एका तपस्वी माणसाच जीवन आहे. तुला हंव ते ते तू साध्य करून घेऊ शकतोस पण तू स्वतःच्या गरजांना मर्यादा घातलीस ! तुझ्यावर प्रेम असणार्यात सर्वांच्या आयुष्याच सोनं झालं. त्यांच्या सुखा समाधानासाठी तू नेहमीच देवाकडे प्रार्थना केलीस. तू सर्वसामान्य माणूस नाहीस हे तुलाहीमाहित आहे आणि मलाही .प्रतिभासह तू जो प्रवास केलास त्यामागे निश्चितच काहीतरी कारण होतं.
[…]

चोरी झाल्याचा आनंद

सुनीलने माझ्या चेहऱ्यावरचे भाव पटकन ओळखले. पक्का बाबू असल्या मुळे मुर्गा पटकन कसा कापला पाहिजे ह्या कलेत तो पारंगत होताच, लगेच म्हणाला, तो इस ख़ुशी के मौके पर एक-एक कप काफी हो जाय. अश्या रीतीने साउथ ब्लॉकच्या काफी हाउस मध्ये कॉफी पीत-पीत चोरी झाल्याचा आनंद आम्ही साजरा केला.
[…]

तीन पिढ्या

पहिली पिढी, दुसरी पिढी आणि तिसरी पिढी. पहिल्या पिढीला दुसर्या पिढीकडून अपेक्षा होत्या आणि दुसर्या पिढीला तिसर्या पिढीकडून अपेक्षा आहेत. पण पहिल्या पिढीला तिसर्या पिढीकडून काहीच अपेक्षा नसतात त्यामुळे पहिली पिढी तिसर्या पिढीला घडविण्याच्या दुसर्या पिढीच्या कार्यात मदत कमी आणि अडचणीच अधिक निर्माण करते. या सगळ्यात दुसर्या पिढीचीच गळ्चेपी होते.
[…]

मोबाईल वाली ती

(दिल्लीच्या एक मेट्रो स्टेशन वर मोबईल वर बोलता-बोलता एक मुलगी अशीच ट्रेन खाली आली होती…
[…]

अविवाहित मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी…

अविवाहित मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी.. असा फतवा बिहारमधील एका गावपंचायतीने काढला होता पण त्या विरोधात कोणीही तक्रार केल्याची माहीती नाही याचा अर्थ हा निर्णय गावकर्‍यांच्या संमतीनेच घेण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे शहरात राहणार्‍यां आपल्याला जेंव्हा या फतव्या बद्दल कळ्ते तेंव्हा आपण आपला देश अजूनही किती बुरसटलेल्या विचारसरणीचा आहे असा विचार अगदी सहज करून […]

अपेक्षांच्या ओझ्याखाली

एखाद्या मुलीची प्रेमप्रकरणे, लग्नापूर्वी त्यातील एखाद्याशी आलेले तिचे शारीरिक संबंध आणि एकूणच तिचा प्रेमाकडे खेळ म्ह्णून पाहण्याचा स्वभाव तिच्या होणार्या् नवर्या पासून त्या मुलीने आणि तिच्या पालकांनी जाणिव पूर्वक लपविणे हा गुन्हा नाही का ? असल्यास त्यासाठी कायद्यात काही शिक्षेची तरतूद आहे की नाही ? या भानगडीत न पडता आपण या गोष्टीकडे जरा डोळसपणे पाहण्याचा प्रयत्न करायला हवा ! पूर्वी बर्या चदा मुलच प्रेमाच्या बाबतीत मुलींची फसवणूक करायचे पण आता त्यात मुलीही मागे राहिलेल्या नाहीत. मांजर कशी उंदराला खेळवते तशा काही मुली मुलांना खेळ्वतात, त्यांच मानसिक खच्चीकरण करून त्यांना व्यसनाधिन बनवितात हे सत्य आहे पचायला किती ही जड असल तरी. […]

आम आदमी पार्टी – एक पर्याय

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत झालेला आम आदमी पार्टीचा विजय आणि आता दिल्लीच्या सत्तेच्या दिशेने चाललेली त्यांची वाटचाल याबद्दल राजकारणी, समाजकारणी आणि विद्वान मंडळी यांना काय वाटत हा विषय थोडावेळ बाजुला सारून आता समोरच दिसणार्‍या लोकसभेच्या आणि महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांचा यांचा विचार करता महाराष्ट्रतील एका सर्वसामान्य मतदाराच्या नजरेतून या निवडणुकीकडे पाहिले असता सर्वसामान्य मतदाराच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण होत असणार की मी ही महाराष्ट्रात आम आदमी पार्टी सारख्या पर्यायाच्या शोधात नाही ना की आम आदमी पार्टी हाच माझ्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकेल ?
[…]

लग्न आणि आपला समाज

काही दिवसापूर्वी एक लग्नपत्रिका माझ्या पाहण्यात आली. त्या लग्नपत्रिकेत वधू-वरांच्या नावासमोर कंसात त्यांच शिक्षणही लिहलेल होत. दोघांचही शिक्षण सारखंच होत मला वाटत त्यांच वय, समाजातील आर्थिक स्तर, जात-धर्म, रंग,उंची शारिरीक बांधा ही सारखाच असावा त्याचबरोबर त्यांच्या आवडी-निवडी आणि व्यसनेही सारखी असावीत येथे व्यसने हा शब्द मी दारू वगैरे पिण्यासंदर्भात वापरलेला नाही. सांगायच तात्पर्य इतक लग्न ठरण्यापासून ते होईपर्यत समानतेला फारच मह्त्व आहे आपल्या समाजात म्ह्णूनच तर आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या तरूणाशी लग्न करण्याचा निर्णय एखाद्या तरूणीने घेतल्यास लोक नाक मुरडतात. 
[…]

दिवाळी अंक आणि मी – प्रवास बारा वर्षांचा

दिवाळी अंकासाठी मी गेली 12 वर्षे सतत लिखाण करतोय पण मोजकच. 2002 सालच्या माझं कोकण दिवाळी अंकात माझी ‘माऊली’ ही तिसरी कथा प्रकाशित झाली. त्यापुर्वी नवाकाळ मध्ये माझ्या दोन कथा प्रकाशित झाल्या होत्या. माझ कोकण दिवाळी अंकासाठी आई या विषयावर साहित्य मागविण्यात आले होते त्यामुळे आईला केंद्रस्थानी ठेवून मी ही प्रेम कथा लिह्ली होती.
[…]

1 150 151 152 153 154 187
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..