नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

“ते ची प्रिया” – प्रिया तेंडुलकरांचं व्यक्तीमत्त्व उलगडणारं पुस्तक

“ते ची प्रिया” या ललिता ताम्हाणे लिखित आत्मचरित्राच्या माध्यमातून अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचा नवीन प्रवास तसंच त्यांनी कला क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दलचा अगदी हळूवारपणे ठाव घेण्यात आलेला आहे. या पुस्तकाचा वेध घेऊन त्यांच्या स्मृतींना वाहिलेली मन:पूर्वक शब्दांजली. 

[…]

हा तर खरा बौद्धिक व्यायाम

नियमितपणे सकाळी फिरावयास जाणे हे ठरून गेलेले होते. निवृतीच्या काळात अत्यंत सोपा व चांगला शरीराच्या सर्व अवयवांना पोषक असा हा …..
[…]

लक्षदीप हे रुपेरी पडद्यावरी ….

“मानवी भाव भावनांचं रहाणीमानाचं आणि समाजाचं प्रतिबिंब आपल्याला चित्रपटामधून उमटलेलं दिसतं. सणासुदींची परंपरा, व्रत वैकल्ये यांसारखे विषय हिंदी व प्रादेशिक चित्रपटांना अपवाद नव्हते; मग दिवाळी सारखा “राजेशाही सण” तरी कसा चित्रपटांपासून लांब असेल.. […]

माईकचा शोध लागला नसता तर काय झाले असते?

माईकचा शोध लागला नसता तर काय झाले असते? तसे काहीच झाले नसते. माईक नव्हता तेव्हा सभा, बैठक होतच होत्या की! महाभारताच्या युध्दात माईक नसतानाही इकडचे सेनापती आणि तिकडचे सेनापती आपआपल्या बाजूंच्या सैनिकांना इन्स्ट्रक्शन देतच होते की! त्यामुळे माईकचा शोध लागला नसता तरी काहीच फरक झाला नसता..
[…]

महाराज सुध्दा बायकोस भ्यायचे..

सकाळी सकाळी प्रधानजीकडे महाराज धावतच पोहचले.हे दृष्य उभ्या आयुष्यात प्रधानजींनी बघितले नव्हते.कारण धावायची पाळी त्यांचीच असायची.राजाकडे सगळयांनी धावायचे.राजाने नव्हे.त्यामुळे महाराज दिसताच प्रधानजींनी नैऋत्य दिशेकडे बघितले.आज सूर्य तिकडून तर निघाला नाही ना,याची खात्री करुन घेतली.
[…]

“एकत्र कुटुंबाची गोष्ट”

मुलांची वाढत्या वयातील जडणघडण व त्यांच्यावर होणारे सकारात्मक संस्कार हे एकत्र कुटुंबाच्या घरात होताना दिसतात. लहानग्या सदस्यांच्या शंकांचे निराकारण एकत्र कुटुंबातील जेष्ठ सदस्याकडून होते, आता मात्र, विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात असल्याने मुलांना आपल्या भावनांचा निचरा होण्यास अडचण निर्माण होते तसेच त्यास वेळ लागतो किंवा बंधने येतात असे वाटते.
[…]

एक आठवण / ती

कालचीच गोष्ट, कृषी भवन वरून ती मेट्रोत चढली. क्षणभराकरता नजरा भिडल्या. तब्बल तीस वर्षानंतर ती दिसली होती. रूप रंग बदलले असले तरी ही तिने मला ओळखले. एक मंद स्मित तिच्या चेहऱ्या वर उमटले. पण दुसऱ्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, असे वाटले, वसंत ते शिशिराचा प्रवास क्षणातच घडलाकालचीच गोष्ट, कृषी भवन वरून ती मेट्रोत चढली. क्षणभराकरता नजरा भिडल्या. 
[…]

समाधानाचे मूळ

१९९६ साली मी जव्हार गांवच्या सरकारी रुग्णालयात प्रमुख वैद्यकीय अधिकारी होतो. हाताखाली बराच कर्मचारी व अधिकारी वर्ग होता.
[…]

आठवण चाळवणारे अनामिक !

ज्यांनी माझ्या स्मरणात आठवणीचे कायमचे घर केलेले आहे. तीच छबी जागृत झाल्याचे जाणवले. दूर बसून मी त्यांना बराच वेळपर्यंत न्याहाळले. कांही वेळाने ते उठले. चालू लागले. काय आश्चर्य त्यांच्या चालण्याची पद्धत देखील हुबेहूब तशीच. ज्यांनी माझ्या वडिलांना बघितले असेल असा कुणीही माझ्याशी सहमत होईल की त्या अनामिक व्यक्तीची शरीर संपदा माझ्या वडिलांशी मिळती जुळती होती.
[…]

साहित्य संमेलनासंदर्भात साहित्यिक संजय सोनवणी यांची भूमिका

मी सासवड येथे भरणार असलेल्या ८७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा आहे हे आपणास विदित असेलच. त्यामागील भूमिका आपणाप्रत पोहोचवावी या हेतुने हे पत्र आपणास लिहित आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी मनाचा खरा उद्गार बनायला हवे. ते साहित्य-संस्कृतीच्या मुलगामी चिंतनाचे, दिशादर्शक आणि जाणीवा प्रगल्भ करणारे आशयघन उद्गार बनावे ही माझी भावना आहे.
[…]

1 151 152 153 154 155 187
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..