विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

जेष्ठत्व हे श्रेष्ठत्व कसे ?

जेष्ठत्व हे श्रेष्ठत्व कसे ? ज्येष्ठ नागरिकाना श्रेष्ठ समजले जाते. व्यवहारी जगांत बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धापकाळ ह्या जीवन चक्रामधल्या विवीध अवस्था. त्यांमध्ये मान्यता पावलेला शेवटचा काळ, ज्याला ज्येष्ठ नागरिक संबोधीले गेले. केवढा मोठा सन्मान हा त्या वयाचा. ज्येष्ठ नागरिक एक महान आणि सर्वांत सन्मानाची उपाधी बनलेली आहे. ज्येष्ठ नागरिक हे वयानी श्रेष्ठ असतात. प्रचंड अनुभव हे आपल्या पाठीशी बाळगुन समाजात वावरतात. कुटूंब वत्सल असतात. जीवन व व्यवहार ह्या दोन प्रमुख मार्गावर अनेक पदे सांभाळलेली. प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय, अशा अनेक क्षेत्राचे अद्यावत ज्ञान मिळालेली असतात. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा योग्य फायदा समाजाच्या विकासांत व्हावा वा त्यांच्याकडून करुन घ्यावा ही अपेक्षा.
[…]

विश्वासातील शंका

विश्वासातील शंका एक लहानशी घटना परंतु अध्यात्म जगांत एक महान तत्वज्ञान सांगून जाते. श्री कृष्ण एकदा जेवण्यासाठी बसले होते. रुख्मिनी त्याना जेवन वाढीत होती. अचानक श्रीकृष्ण उठले व लगबगीने जावू लागले. ते घराच्या दारापर्यंत गेले. ते क्षणभर तेथेच थांबले. थोडावेळ थांबून परत आले. पुन्हा जेवण्याच्या पाटावर बसले. रुख्मिनीला हे सारे अघटीत वाटले. तीच्या लक्षांत श्रीकृष्णाच्या ह्या हालचालीचा अर्थ कळला नाही. तीने तसे विचारले. […]

वेल अक्षरगंधाची

बर्‍याच वेळा आपले अक्षर चांगले नसते आणि एखाद्या परीक्षेत अक्षराला जास्त मार्क असतात आणि तेथे आपण कमी पडतो. चांगले मार्क मिळत नाहीत आणि जे इप्सित साधायचे असते ते साधले जात नाही आणि आपण निराश होतो. सातत्य आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर सगळ्या गोष्टी सहज होतांना दिसतात. मुख्य म्हणजे देवावर, सदगुरुवर आणि स्वत:वर विश्वास पाहिजे. अक्षर मग ते कोठल्याही भाषेचे, लिपीचे असले तरी ते कसे काढावे, त्याचे तंत्रशुद्ध व शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावे किंवा सराव करावा.
[…]

मस्तकावर शिवलिंग व घंटाधारी रोम येथील द्विभूज गणेश (गुरु) मूर्ती

रोम येथील बार्जीयन मुझियम वेलोस्ट्रेज येथील मस्तकावर शिवलिंग व घंटाधारी द्विभूज गणेश (गुरु) मूर्ती रोम आणि भारतीय संस्कृती ह्यांच्या एकत्रीकरणाचा उत्कृष्ट नमुना आहे. शिव पुत्र, सुर्यपुत्र आणि विघ्नहर्ता म्हणून जगात प्रसिद्ध असलेला श्री गणेश येथे विद्यादायक गुरुस्वामी म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. येथे श्री गणेश गुरु म्हणून ओळखला जातो.
[…]

महाराजलीला मुद्रा श्री गणेश – कंबोडिया

ही गणेशमूर्ती १३ व्या शतकातील असून ती ब्राँझची बनविलेली आहे. मूर्तीवर विविध अलंकार असून ते हिरव्या रंगात दाखविलेले आहेत. या गणेश मूर्तीला दोन हात असून अर्धवट वाकलेल्या स्थितीत बसलेली आहे. उजव्या हातात मोडलेला सुळा व डाव्या हातात ग्रंथ आहे. यातच मांगल्य व ज्ञानाचे दर्शन होते.
[…]

सूर्य विनायक – नेपाळ

भारतीय गणेश उत्पत्ती विषयी असलेली कल्पना डावलून नेपाळ संस्कृतीने आपले गणेश दर्शन घडविले आहे. गणेश हा शिवपुत्र न मानता तो स्वयंभू असून एका सूर्य किरणात त्याचे दर्शन आले आहे असे मानून सूर्य-विनायक हे अधिष्ठान दिले आहे. जगातील इतर राष्ट्रात सुर्यपुत्र हा मान्य असलेला संकेतही नेपाळ संस्कृतीला मान्य असलेला दिसत नाही. ह्या सूर्य विनायकाचे मंदिर काठमांडू पासून आठ मैलावर भाटगांव येथे आहे. ते भव्य आहे. नेपाळच्या चित्रांकित नृत्यगणपतीच्या सभोवती चार गणपती असतात. त्यातील भव्य व मुख्य देवता सूर्य विनायक होय.
[…]

महापियेन – श्री गणेश – ब्रम्हदेश

ब्रम्हदेशातील नदी किनारी वसलेल्या प्रदेशातील मोनलोक म्हणून ओळखला जाणारा हा गणेश “व्यापारी विघ्नहर्ता” म्हणून प्रसिद्ध आहे. ही मूर्ती ६व्या शतकातील असावी. श्याम वंशाच्या कोणा आयुथीयान कारागिराने ही बनविलेली असावी. ह्या गणेशाला महापियेन अशी संज्ञा आहे.
[…]

“दैनिक प्रत्यक्ष” आमुचे!

दैनिक प्रत्यक्ष हे वृत्तपत्र श्री अनिरुद्ध बापू यांनी सन २००५च्या दत्तजयंतीच्या दिवशी प्रसिद्ध केले. हे दैनिक १२ पानांचे असून त्याची किंमत रु.२.५० आहे. दैनिक प्रत्यक्ष सर्व वृत्तपत्रांचे स्टोल तसेच रेल्वे स्टोलवरही उपलब्ध आहे. तसेच घरोघरी येणाऱ्या अन्य वृत्तपत्रा प्रमाणे ही मिळते. प्रत्यक्ष दैनिकात परमपूज्य सदगुरु बापू यांनी लिहिलेले अग्रलेख व विविध विषयांवरील इतर लेखकांनी लिहिलेले लेखही वाचकांस वाचावयास मिळतील. पान चार आणि पाचवर आंतरराष्ट्रीय सदरात विविध माहिती आहे जी इतर वृत्तपत्रात अभावानेच वाचायला मिळते. […]

1 153 154 155 156 157 180
error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....