नवीन लेखन...

ओवणे, पटवणे, गाठवणे


अजूनही काही व्यवसाय पूर्ववत सुरू झाले नाहीत. म्हणून त्रास होतो. झाले असे की माझे मंगळसूत्र. आठ दिवसांनी मिळाले. आणि मी माझ्या काळात गेले. मंगळसूत्र मण्यांच्या आकारानुसार दोर वळली जायची. दोन पदरी साठी चार दोऱ्या व लांबी पण ठरलेली. पायाच्या पिढंरीवर पाणी लावून दोर वळली की मग चारपदरी दोर आणि ते सगळे एकत्रित करून दोन सोन्याचे मणी नंतर दोन सोन्याच्या वाट्या मध्ये एक मणी परत दोन वाट्या असे ओवून झाले की मग तीन पदर पायाच्या अंगठ्याला पीळ देऊन अडकवून एक पदरी दोऱ्या काळे मणी ओवून मग असे आळीपाळीने चार पदर ओवून झाले की देवा समोर पाट मांडून घरातील एखाद्या मोठय़ा सवाष्णी कडून त्या मंगळसूत्राला हळदीकुंकू लावून बांधून घेवून झाले की देवाच्या व त्या बाईच्या पाया पडायला लागायचे. पण जर कधी कधी अचानक असे झाले तर ते मंगळसूत्र पदरात बांधून जेवण वगैरे केले जायचे. मग ओवून घालणे. आता ओवणे हे करतांना प्रत्येक मणी काळजी पूर्वक ओवायचे असते दोन घरं जोडली जातात म्हणून तिला सर्व नातेवाईक. गणगोत इष्ट मीत्र मैत्रीणी आला गेला या सर्वांचे आगतस्वागत करणे. नाती बांधून ठेवणे. घरातील चार माणसं चार स्वभावाची त्यांना सांभाळून घेणे. आणि गळ्यात असलेले हे मंगळसूत्र हेच आणि बरेच काही शिकवत असते. पावलोपावली जाणिव करुन देते. आणि म्हणून तिच्या कडे कुणीही वाकडी वाईट नजरेने बघू शकत नाही. आयुष्याचा जोडीदार साथीदार या दोन वाट्या व चार पदरातील मणी याची साक्ष देतात.

ती संसाराची सूत्रधार आहे तिला घाईघाईत निर्णय घेता येत नाहीत . त्यामुळे एखादा मणी घरंगळत गेला की मुष्कील….

काळ बदलला आयते दोर मिळू लागले. ते एकमेकांना जोडून नुसतेच मणी सरकवत रहायचे. आणि मागे गाठ वगैरे बांधायची नाही. कारण गाठ बांधणे सोडणे अशी झंझट नाही. आणि लांबी पोटा पर्यंत असते म्हणून कधीही घालता काढता येते. यालाच पटवणे म्हणतात. बरोबर आहे ना ते पैसे घेऊन मंगळसूत्राबरोबर आपल्याही पटवतात.

आता तर काय आबादीआबाद आहे. लग्नातच घसघशीत वजनदार म्हणजे सोन्याचे घसघशीत मोठे आणि लांब मंगळसूत्र प्रसंगी घालायला. आणि रोज वापरायचे छोटेसे मंगळसूत्र. वाट्या वगैरे बंधनकारक नाही. थोडे मणी. आणि त्याला काही तरी आवडीप्रमाणे छोटेसे काही तरी. शिवाय ते ही सतत घालणे आवश्यक नाही. मध्यंतरी जान्हवी मंगळसूत्र असा एक प्रकार ऐकून होते. हेच नव्हे तर अनेक प्रकार आहेत म्हणे…..

कृपया मला कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही पण या मागची भावना कुठे गेली आहे ती समजत नाही. कारणे माहिती नाहीत पण दोन घराणी. दोन व्यक्ती. सुख दुख. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या एकत्रितपणे येऊन आपला संसार सुखाचा केला पाहिजे ही भावना आहे. आर्थिक परिस्थिती मुळे गाठवणे जमत नसेल तरी मोलमजुरी करून चार पैसे मागे टाकून दोन सोन्याच्या वाट्या व किमान दोन तरी मणी करतात पण खोटे मंगळसूत्र घालणे चांगले नाही कारण ते मंगलसूत्र आहे नात्यांना बांधून ठेवणारे आणि बक्कळ पैसा असूनही…. शेवटी काय तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तसेच काही सुरक्षितता म्हणून मंगळसूत्र घालतात…

ओवणे ते गाठवणे हा इतिहास आहे पण मला मात्र आठ दिवस थांबून ते पटवून मिळाले म्हणून हे सगळे आठवले….

— सौ. कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..