विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

कटीपतंग, चॉईस इज युअर्स !

पतंग उडविण्याचा इतिहास ३००० वर्षाहून जास्त आहे. चीनमध्ये बांबू आणि सिल्कच्या कपड्या पासून पतंग बनवीत असतं. चीनमध्ये पतंग उडवीण्याला धार्मिक व पौराणिक महत्व होते. पतंगाच्या मांजाला वैज्ञानिक उपकरणे बांधून हवामानाचे अनेक अंदाज घेतले जात असतं. अमेरिकन शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँन्क्लीन याने पतंगाच्या साह्याने वातावरणातील (पावसाळी ढगातील) विद्युत शक्तीचा शोध लावण्यासाठी उपयोग केला. लॉरेन्स हर्ग्वे यांनी पतंगाचा उपयोग वाहतुकीसाठी केला असे म्हंटले जाते. ७ नोव्हेंबर १९०३ साली स्यॅमुअल फ्रँन्क्लीन कोडी यांनी इग्लिश खाडी पार करतांना होडीला खेचण्यासाठी पतंगांचा उपयोग केला होता. पूर्वीच्या काळी पतंगांचा मांजाला काही उपकरणे बांधून खूप उंचावरून शत्रूवर नजर ठेवण्यासाठीही मिलिटरीत त्याचा उपयोग केला जात असे. दुसऱ्या महायुद्धात (१९३९-४५) मध्ये पतंगांचा गनरी टार्गेट म्हणून उपयोग केला गेला होता. प्रत्येक देशामध्ये त्याचे महत्व वेगवेगळे आहे.
[…]

घरगुती समारंभ साजरे करताना याचा विचार व्हावा…!

महागाई कमी व्हावी म्हणून रिझर्वबँकेने नामी युक्ती शोधून काढली. बँकांच्या सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याजांचे दर एक-दोन वेळा नाही तर चक्क १३ वेळा वाढविले तरीही महागाई काही अजून आटोक्यात येत नाही उलट त्याने विकासाची गती मात्र मंदावली. दैनंदिन जीवनात सातत्याने भेडसावणाऱ्या अडीअडचणींचे विशेषता महागाईचे गणित सोडवायचे असेल तर त्यासाठी चिंतन, शोध व अभ्यास करणे गरजेचे आहे.
[…]

किंकर्तव्यमूढम् !

मुंबईत तरी रस्त्यातून चालताना फुटपाथ शोधणे हा एक संशोधनाचा विषय झाला आहे. फेरीवाले व दुकानदारांचा असा समाज आहे की फुटपाथ हे नागरिकांना चालण्यासाठी नसून आपल्यासाठीच बांधण्यात आले आहेत. सर्व भारतीय नागरीकांस व्यवसाय करण्याचा हक्क आहे पण रस्त्यावर व फुटपाथ व्यापून किंवा त्यावर बसून नाही कारण तो कायद्याच्या चौकटीत बसत नाही.
[…]

विरोधाभास !

झाडे लावा झाडे जगवा असे जनसामान्य म्हणतो. पण एक झाड जीवन देते, वाढविते, पुष्ट करते, पर्यावरणाचे रक्षण करते. तर भ्रष्टाचार रूपी झाड मनाच्या मातीत रुजते आणि मानवाला सैरभैर करून सोडते. या झाडाची फुले व फळे विषारी असतात. वडाच्या झाडाला आलेली फुले व फळे औषधी असतात. याच्या पारंब्या जमिनीत खोल जाऊन झाडाला आधार देतात. तर भ्रष्टाचार रूपी झाडाच्या पारंब्या खोल जाऊन झाडाला पोकळ करतात.
[…]

ट्रेन प्रवासात स्त्रिया किती सुरक्षित?

मुंबईची लाइफलाईन समजल्या जाणार्‍या मध्य व पश्चिम रेल्वेच्या स्थापनेस शनिवारी ६० वर्षे पूर्ण झाली. परंतू प्रवाशांच्या सुरक्षेविषयी ६० वर्षात तेवढी सुधारणा झाल्याचे दिसत नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. मुंबईतील ८० टक्के जनता ट्रेनने प्रवास करते त्यात नोकरी करणार्‍या स्त्रिया, शाळा व कॉलेजात जाणारे विद्यार्थी/वाद्यार्थिनी, वृद्ध, अपंग, दृष्टीहीन यांचे प्रमाण खूप आहे. दळणवळ क्षेत्रात रेल्वेवेचा देशात पहिला नंबर लागत असेल परंतू प्रवाश्यांच्या सुरक्षेविषयी रेल्वे फारच उदासीन आहे असे सध्या घडत असलेल्या घटनांकडे बघितल्यास प्रकर्षाने जाणवते.
[…]

उपवास आणि उपवास

उपवास आणि उपवासात फरक हा नेहमीच असतो.सामान्य माणसाचे उपवासाकडे कुणाचेही लक्ष जात नाही. खरे म्हणाल तर आपल्या देशात पन्नास टक्के लोकअर्धपोटी राहतात. ते रोजच उपवास करतात. ……..
[…]

अवसेची रात्र आणि एक पणती

सर्वत्र पसरलेला गर्द काळोख, भूख, आत्महत्या, भ्रष्टाचार, महागाई इत्यादी आसुरी शक्ती प्रबळ झालेल्या आहे तरीही एक पणती …..
[…]

1 148 149 150 151 152 173