नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

दैवगती

रेवा रिमोट कंट्रोलची मोठी गाडी घेऊन इकडे तिकडे बागडत होती . खुश होती . साडेचार वर्षाची चिमुरडी . सुप्रिया सारखा सावळा सतेज रंग , नाजुक जिवणी , टप्पोरे डोळे , अतिशय गोड परी दिसत होती . ‘ मम्मा , मम्मा ‘ अशा तिच्या हाका चालू होत्या . छोटा गोरा गोरा पार्थ गाडी बरोबर धावत होता . […]

संत तुकारामांचे मानवतावादी चरित्र

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रा. धनराज धनगर यांनी लिहिलेला हा लेख मध्ययुगीन कालखंडात आपल्या समाजाभिमुख आचारसंहितेच्या बळावर वारकरी संप्रदाय हा सर्वात लोकप्रिय संप्रदाय ठरलेला दिसतो. या संप्रदायातील एक महत्त्वाचे संत म्हणून संत तुकारामांचा उल्लेख केला जातो. केवळ वारकरी संप्रदायाच्याच नव्हे तर एकूण सर्वच संप्रदायातील साहित्यनिर्मितीचा विचार करता सर्वाधिक लोकप्रिय साहित्यनिर्मिती ही संत तुकारामांचीच असल्याचे […]

मनातलं….

अनुभवांना स्वतःचे रूप देऊन कोपऱ्यात उभी राहिलेली माझी शब्दकळा मला नेहेमीच कोसळण्यापासून वाचवत आलीय. कितीतरी प्रसंगांतून, रूपांनी, माणसांच्या माध्यमातून माझ्या भेटीला आलेले माझे शब्द ! […]

सांगळीवरचा प्रवास

सांगळ म्हणजे वाळलेले कद्दू अर्थात दुधी भोपळे चार बाजूला दोरीने गुंफून यांच्या सहायाने नदी पार करण्यासाठी तयार केलेली असायची. थोड्याशा मोबदल्यात लोकांना पैलतीरावर पोहचवाचे काम काही लोक करायचे. अगदीच अडलेले काम असले की लोक याव्दारे नदी पार करायचे. खरं तर हे अतिशय धाडसाचे काम होते. […]

पुस्तकांचे देणे, पुस्तकांवर बंदी !

पुस्तके असतात सोबती-एकाकी असताना ! अबोलपणे खुणावत असतात-मी आहे. केव्हढा धीर येतो मग. घरातल्या पुस्तकांनी ओथंबून चाललेल्या कपाटांकडे अभिमानाने नजर टाकता येते खरी पण त्याचवेळी सकाळी टीव्ही वर पाहिलेली दिवाळी अंकांच्या संचाची जाहिरात खुणावते, मित्रांच्या पुस्तक-प्रकाशनाची आवतणे येत असतात, प्रदर्शनांकडे पावले वळतात आणि काही काळाने कपाटांची “श्रीमंती” अधिक वाढते. […]

भुताचे बाप

गावदरीच्या वेताळ ओढ्यात दर अमावास्येला भुतं खेळतात हे साऱ्या पंचक्रोशीला माहीत आहे भुते खुर्द आणि भुते बुद्रुक अशा दोन गावांमधून हा वेताळाचा ओढा गेला आहे . पूर्वी अलीकडे म्हणजे डोंगर बाजूला असणारे भुते खुर्द हेच गाव होते पण ओढ्या पलीकडील शेती कसायला ओढा ओलांडून जावे लागे . कधी शेतात संध्याकाळी अंधारले की या ओढ्यातून अलीकडे यायची […]

तुकारामांचे ‘अभंग-काव्य’

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये विजय मडव  यांनी लिहिलेला हा लेख संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम ही नावे वारकरी संप्रदायासाठी संजीवक आहेत. संत ज्ञानेश्वरांनी ज्या भागवत धर्माचा पाया रचला त्या भागवत धर्माचा संत नामदेवांनी पार पंढरपूरपासून पंजाबपर्यंत विस्तार केला. त्यामुळे या संप्रदायामध्ये अगदी विविध स्तरातील विविध जातीतील अगदी तळागाळातील लोकसुद्धा सामील झाले. ह्याच कारणामुळे एक […]

संतांचे सामाजिक कार्य आणि तुकाराम

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये मिलींद सुधाकर जोशी यांनी लिहिलेला हा लेख सामाजिक दृष्टीने संतकार्याचे परीक्षण करण्याचे अनेक प्रयत्न आजवर अनेक विचारवंतांनी केलेले आहेत. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक न. र. फाटक, वि. का. राजवाडे, गं. बा. सरदार, रा. चिं. ढेरे, वि. भि. कोलते, प्रा. सदानंद मोरे यांच्यासारख्या अनेक व्यासंगी विद्वानांनी या बाबत आपली […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १४ – स्थितप्रज्ञ सावरकर

सावरकर यांनी  लहानपणापासून सतीच वाण पत्करले होते. हजारोंच्या घरी पुढेमागे सोन्याचा धूर निघावा म्हणून आपली चूल बोळकी वयाच्या विसाव्या वर्षी फोडून टाकली होती. […]

संत तुकारामांचा भक्तीभाव व समाजप्रबोधन

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये सौ. पद्मावती जावळे  यांनी लिहिलेला हा लेख वारकरी पंथात संत तुकारामांनी फार मोठे कार्य केले आहे. त्यांची महती तशी सर्वांनाच माहित आहेच. म्हणूनच त्यांच्याबद्दल विद्वतजनांनी याप्रमाणे म्हटले आहे, ज्ञानदेवे रचिला पाया । रचिले देवालया । नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार । जनार्दन एकनाथ, ध्वज उभारिला भागवत ।। […]

1 113 114 115 116 117 525
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..