नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

सोलापूर फाइल्स – श्रवणानंदाच्या नोंदी !

एकुणातच साहित्यिक,सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे आजकाल जिकिरीचे झालंय. त्यातून फारसे काही हाती लागत नाही,हेही एक प्रमुख कारण असावे. पण काही योग कोणीतरी आपल्या वाटेवर आणून ठेवले असतात आणि आपण ते जगायचे असतात. […]

नवे क्षितीज… नव्हे आव्हान

२००६ हे वर्ष माझ्यासाठी नवीन आव्हाने घेऊन आले. डॉ. बेडेकर विद्या मंदिर ही माझी शाळा, तर बी.एन. बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स हे माझे बारावीपर्यंतचे कॉलेज! ही शाळा आणि कॉलेज ‘विद्या प्रसारक मंडळ’ या शैक्षणिक संस्थेतर्फे चालवण्यात येते. या व्यतिरिक्त कॉमर्स आणि आर्टस् कॉलेज, पॉलिटेक्निक, लॉ कॉलेज, इंग्रजी माध्यमाची शाळा तसेच मॅनेजमेंट कॉलेज असे या संस्थेचे खूपच […]

एक परीस स्पर्श (भाग – ४०)

सध्या ! विजय काय विचार करतोय ? हे त्याच्याच शब्दात … काही दिवसांपासून मी टी. व्ही. वर पिंकीचा विजय असो ! ही नवीन मालिका पाहतोय ! त्यातील नायिका म्हणजे पिंकी कोणताही विषय तिच्या लग्नापर्यत नेण्यात तरबेज असते…तसेच काहीसे माझ्या घरातील लोकही तरबेज झालेत, कोणताही विषय ते माझ्या लग्नापर्यत अगदी सहज  नेतात …आज सकाळी – सकाळी बाबांचा  […]

दूर न पोहोचलेले सूर (आठवणींची मिसळ – भाग ८)

आईच्या आठवणीही त्याच्या गांठी नव्हत्या.मग त्या तिन्ही लहान मुलांची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून त्यांच्या वडिलांनी दुसरा विवाह केला.निदान त्यांनी तसे सांगितले.इतरांनी त्यांची स्वतःची गरज न सांगताच ओळखली.ती वयाने त्यांच्यापेक्षा बरीच लहान होती.मग त्यांचा नवा संसार सुरू झाला. […]

उगाच काहीतरी – १

काल बऱ्याच वर्षांनी शाळेतला मित्र भेटला. फॉर्मालिटी प्रमाणे जुन्या गोष्टी, आठवणी झाल्या. बऱ्याच गप्पा झाल्या. त्याला विचारलं ” काय करतोस आजकाल?” ” आय हॅव क्वाईट ए फिव व्हेंचर्स ऑफ माय ओन” ” हं..ग्रेट. म्हणजे एंटरप्रेन्युर झालायेस एकुण. ” – मला कौतुक वाटलं. “आंत्रप्रन्योर…आंत्रप्रन्योर” ” ते शरद तांदळे यांचं पुस्तक ना. त्याची पण एजन्सी आहे का तुझी. […]

मला अस्वस्थ करणारी एक खंत !

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये प्रा. पु. द. कोडोलीकर यांनी लिहिलेला हा लेख तत्कालीन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु आदरणीय डॉ. टी. के टोपे यांच्या शिफारसीमुळं मी वसईत प्राचार्य म्हणून रुजू झालो. त्याकाळी वसईगाव ही ग्रामपंचायत होती. त्यामुळं प्राध्यापकांना नियमाप्रमाणं घरभाडे, अन्य भत्ते मिळत नव्हते. बाहेरील प्राध्यापक इथं आर्थिक अडचण सोसून येण्यास तयार नव्हते. आर्थिक पात्रता असलेले […]

जहाँ चार यार मिल जाए

मित्र म्हणजे ज्यांच्यासमोर रोजचे मुखवटे काही क्षण काढून ठेवता येतात अशी जमात ! हरिभाईच्या चार भिंतींमधील संस्कृतीने ज्यांना आजही बांधून ठेवले आहे असे हे सारेजण ! […]

इंद्रधनूच्या निमित्ताने…

एका मोठ्या कार्यक्रमाची जुळवाजुळव दोन महिने आधीच सुरू झाली होती. माझा जवळचा मित्र महेश वर्दे ‘इंद्रधनू’ या संस्थेचा अध्यक्ष होता. इंद्रधनूचा वार्षिक कार्यक्रम भव्य स्वरूपात एका मोठ्या ग्राऊंडमध्ये आयोजित करण्याचा त्यांचा विचार चालू होता. राजकपूर आणि व्ही. शांताराम यांच्या चित्रपटातील गाणी असा मोठा विषय त्यांनी निवडला होता. सुप्रसिद्ध संगीत संयोजक अप्पा वढावकर संगीत संचालन करणार होते. […]

नंदराज जटयात्रा – भाग 3

बाराव्या दिवशी यात्रा ३०४९ मी. उंचीवरील गरोली पाताळ या ठिकाणी येते. हे अंतरसुद्धा १०-११ कि.मी. आहे. तेराव्या दिवशी यात्रेकरू कैलगंगेत स्नान करतात व ‘पातरनचौनिया’ या मुक्कामाकडे प्रस्थान करतात. हे अंतर १२ कि.मी. असून वाट अवघड व चढणीची आहे. पातरनचौनियाची उंची ३६५८ मी. आहे. कोणतीही यात्रा ही संस्कृतीचे, रितीरिवाजाचे दर्शन आहे. श्रद्धायुक्त अंतःकरणाने परमेश्वरी चरणी लीन होण्यात […]

उघडी खिडकी (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३८)

“आपण बसा ना ! माझी मावशी थोड्याच वेळात खाली येईल. आपलं नांव नानासाहेब नाफडे म्हणालात ना !” मावशींची पंधरा वर्षांची नटखट भाची बंगल्यात नुकताच प्रवेश केलेल्या पाहुण्यांना म्हणाली. ती पुढे म्हणाली, “तोपर्यंत मी आहे ना तुमच्याशी बोलायला. चालेल ना !” थोड्याच वेळांत तिची मावशी खाली येणार आहे हे लक्षात घेऊन पण ह्या क्षणी त्या भाचीला खूष […]

1 111 112 113 114 115 493
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..