नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)

माझ्या आईच्या पिढीतले पणजोबांच्या घराला “तेंडोलकर युनिव्हर्सिटी” म्हणत. कोल्हापुरला राजाराम कॉलेज होते. पुण्यानंतर कुठे कॉलेज नव्हते, त्यामुळे कोंकण, सातारा, इथले सर्व विद्यार्थी तिथेच येत. महाविद्यालयीन अभ्यासाबरोबरच कसं रहावं, कसं वागावं, ह्याचे धडे त्यांना तेंडोलकरांच्या घरी मिळत. त्यामुळे ते आपलं शिक्षण तेंडोलकर युनिव्हर्सिटीत झालं आहे असं अभिमानाने सांगत. पहिली गोष्ट तिथे शिकवली जाई ती म्हणजे काम करणे महत्त्वाचे. तिथे राहिलेल्याला पुढे आयुष्यात कधीही कोणतेही काम करायला लाज वाटायची नाही. आजोबा स्वतः श्रमप्रतिष्ठा आचरणारे होते. दुसरी गोष्ट म्हणजे वायफळ खर्च न करणे. छानछोकीवर पैसे वाया न घालवणे. तिसरी गोष्ट निर्व्यसनीपणा. कोणतेही व्यसन लावून घ्यायचे नाही. […]

इमारतींचं सौंदर्य

अमेरिकेत सॅन फ्रॅन्सिस्को येथे एका बागेत फिरत असताना अचानक समोर एक दिमाखदार इमारतींची रांग दृष्टीपथात आली आणि ते दृश्य पाहून मी अक्षरशः भारावून गेलो. बागेतल्याच एका बाकावर बसून मी त्या इमारतीचं सौंदर्य शांतपणे न्याहाळू लागलो. बागेच्या समोरच्याच फुटपाथवर पाचसहा इमारतींचीं रांग दिसत होती. रांगेतल्या प्रत्येक इमारतीचं सौंदर्य खरोखरोच अप्रतिम होतं. युरोपियन पठडीतल्या बैठया घरांच्या शैलीतल्या त्या […]

जिम कॉर्बेट – भाग ३

जिम कॉर्बेटचे भारतावर व भारतीय लोकांवर अतिशय प्रेम होते. तो म्हणतो, ‘माझ्या भारतातील बहुसंख्य लोक नि:संशय भुकेकंगाल आहेत, धनहीन आहेत. पण ते अतिशय साधे, भोळे, प्रामाणिक, निष्ठावान व कष्टाळू आहेत. माझे त्यांच्याशी प्रेमाचे नाते जडलेले आहे.’ जिम बऱ्याच वेळा परदेशी गेला होता पण तो कुठेच रमू शकला नाही कारण त्याचे भारताविषयीचे प्रेम व ओढ! भारत हा […]

पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे

“काल “ची असा शब्द वापरण्याऐवजी या शब्दसमूहात “पूर्वाश्रमीची” असा शब्द वापरलाय, बहुधा “महत्वाची” असावीत म्हणून ! महत्व लोप पावल्याने/ निरुपयोगी असल्याने हळूहळू गृहीत धरली जाणारी, काळाच्या ओघात विसरली जाणारी, एका कोपऱ्यात ढकलली गेलेली माणसे यांच्या संदर्भात नुकतेच काही वाचनात आले. पाश्चात्य देशांमध्ये निर्घृणपणे (मर्सिलेस्ली) त्यांना दूर केले जाते. कारण एकच -त्यांच्यासाठी काळ काही विशिष्ट क्षणांमध्ये गोठलेला […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ९ – सावरकरांची क्रांतिवृत्ती

सावरकरांची क्रांतीवृती सर्वश्रुत आहे.वयाच्या केवळ १५व्या वर्षी  “मी स्वदेश स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा झेंडा उभारून, शत्रूला मारीत मारीत मरेतो झुंजेन“ अशी शपथ घेतली होती. […]

माझे आजोळ – भाग ३- आजोबांची कामे (आठवणींची मिसळ ३१)

तेंडोलकरांच्या वाड्यांत मिळालेल्या संस्कारांनी अनेकांचे आयुष्य घडले. आजोबा वायफळ खर्च करत नसत. परंतु जेव्हां जेव्हां एखाद्याला नोकरी नव्हती, शिकायचे होते त्याला त्याला त्यांनी दार सदैव उघडे ठेवले. अडचणीत असणा-या सर्वांना वेळोवेळी आधार दिला. तिथे जेवणाखाण्याची, अंथरूण-पांघरूणाची, जागेची ददात नव्हती. शिस्त जरूर पाळावी लागे पण ती तुम्हालाच कांही शिकवून जाई. […]

राजू भाई

२०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियानाचा राजदूत व २०१९ मध्ये उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट काउन्सिल चा अध्यक्ष होण्याचा बहुमान राजू भाईंना मिळाला. […]

नवरात्री विशेष

वातावरण, व्यक्ती.. ह्यांचा प्रभावापासून मुक्त असलेली आत्मा दुसऱ्याला positive energy देऊ शकते. विचारांचे परिवर्तन सर्व गोष्टीना परिवर्तन करते. लक्ष्मीदेवीचे हात वरदानी, धन देताना दाखवतात म्हणजेच जी आत्मा भरपूर व शक्तिशाली आहे तीच निस्वार्थ राहून देऊ शकते. […]

प्रबोधन सूर्य : संत तुकाराम

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्राचार्य किसन पाटील यांनी लिहिलेला हा लेख संत तुकाराम म्हणजे देहू गावच्या मोरे – अंबिले घराण्यात जन्म घेतलेला एक सुपुत्र . वोल्होबा आणि कनकाई या मातापित्यांच्या उदरातील एक बालक . शेती – भाती आणि दुकानदारी करणाऱ्या या आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेल्या कुटुंबाचा वारस . आपणा सर्वांच्या प्रपंचात येणारे दुःख , भोग […]

1 115 116 117 118 119 525
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..