नवीन लेखन...
Avatar
About ब्रह्माकुमारी नीता
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

नवरात्री विशेष

वातावरण, व्यक्ती.. ह्यांचा प्रभावापासून मुक्त असलेली आत्मा दुसऱ्याला positive energy देऊ शकते. विचारांचे परिवर्तन सर्व गोष्टीना परिवर्तन करते. लक्ष्मीदेवीचे हात वरदानी, धन देताना दाखवतात म्हणजेच जी आत्मा भरपूर व शक्तिशाली आहे तीच निस्वार्थ राहून देऊ शकते. […]

सहयोग

आपण सहयोग देण्या व घेण्याची अपेक्षा शक्यतो आपल्या माणसाकडून करतो. जिथे संबंधामध्ये जवळीक आहे अश्या व्यक्तीला मनापासून सहयोग देतो. मग तो वस्तु, पदार्थ असो किंवा भावनिक आधार असो देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. कोणी दुःखी असेल व आपण त्याच्या भावना ऐकून घेतल्या तरी त्या व्यक्ति साठी हा ही खूप मोठा सहयोग असतो. एखाद्याला वेळ, आपलेपणा जरी दिला तरी त्याला त्याचे समाधान मिळते. त्यांना समाधान मिळणे हा सुद्धा सहयोग नाही का? […]

मन मंदिर

घरात ही पूजा अर्चना रोज करतो पण मंदिराचे ते रम्य वातावरण घरात जाणवत नाही. ती ऊर्जा, शांती-सुखाचे प्रकंपन आपल्याला आपल्या घरात मिळत नाहीत. सध्याची परिस्थिती बघता ते वातावरण घरात निर्माण करण्याची गरज आहे. आणि ते आपण करू शकतो. […]

महाशिवरात्री विशेष

आज भारत देशामध्ये सर्वत्र ‘महाशिवरात्री’ हा दिवस भक्तिभावाने साजरा केला जात आहे. शिव मंदिरामध्ये बेल पत्र, धोतऱ्याचे फूल, दूध.. घेऊन रांगेत उभे राहून दर्शनाची वाट बघणारे भक्त दिसत आहेत. व्रत, उपवास करून ईश्वराकडे मनोमन आपली इच्छा पूर्ण व्हावी अशी याचना सर्व करतात. पण ज्याची मनोभावे पूजा केली जात आहे त्या ईश्वराची खरी ओळख तसेच मंदिरातली अनेक प्रतीकात्मक रुपकांची ओळख आज आपण करून घेऊ या. […]

जसा संग तसा रंग

स्वाती नक्षत्राच्या पावसाचे थेंब शिंपल्यामध्ये पडल्यास ते मोती बनतात, जर ते थेंब पानावर पडले तर दव आणि सापाच्या तोंडात पडले तर त्याचे विष बनते. थेंब पावसाचे आहेत, परंतु जशी सोबत मिळाली तसे रूप बनले. जर एखाद्या पारस दगडाने लोखंडाला स्पर्श केला किंवा त्यात मिसळले तर ते सोने होते आणि जर लोखंडाला पाणी लागले तर जंक पकडतो. आपल सुद्धा तसेच नाही का? जशी संगत धरू तसे जीवन बनवू. पण मनुष्य जीवन मौल्यवान आहे. त्याचे मूल्य आपण जाणून घ्यावे. […]

कायदा आणि फायदा

कायद्याचा हात पकडून चालणारा व्यक्ति नेहमी निश्चिंत राहतो. त्याला कशाची भीती वाटू शकत नाही… .. कारण कायद्याची रेषा ओलांडली आहे ह्याची चिंता सतत सतावत राहते. म्हणून कोणत्या कर्माची निवड आपण करतोय हे तपसावे. जर व्यावहारिक जीवनामध्ये ही रेषा ओलांडली तर तन, मन, धन, जन,.. .. असेल अनेकानेक प्रकारचे नुकसान सोसावे लागेल ते समजून घ्या.म्हणून लक्षात ठेवा ‘कायदा आणि फायदा’ […]

तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला

भारतीय संस्कृतीमध्ये या दिवसाला फार महत्वाचे स्थान आहे. वास्तविक तिळगुळ देण्यामागील भाव असा आहे की तीळ हे अतिशय सूक्ष्म असलेल्या मनुष्य आत्म्याचे प्रतीक आहे आणि गुळाची गोडी हे आत्मिक प्रेमाचे प्रतीक आहे. […]

सदगुरू

ईश्वराला प्रेमाची भाषा समजते. आपण निस्वार्थ प्रेम केले आणि जर त्याचा आशीर्वाद लाभला तर आपल्या जीवनात सुखांची जणू वर्षाच होईल. […]

चला नवीन सुरुवात करू या

आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, सर्वांच्याच मनात आशेची नवीन किरणे घेऊन येणारा हा दिवस. 2021 बघता बघता काळाच्या गर्भात विरून गेले. पण जीवनात अनपेक्षित बदल घडवून आणणारे हे वर्ष नक्कीच सर्वांच्या लक्षात राहणारे ठरले. कडू, गोड, आंबट,.. आठवणींनी भरलेल्या ह्या वर्षाला राम राम करून आता नवीन वर्षाची सुरुवात करू या. […]

शब्द

लहान असताना रेडिओवर ‘ आवाज के दुनिया के दोस्तो ’ असे बोलून गाण्याचा कार्यक्रम सुरु व्हायचा. खरंच ह्या जगामध्ये आवाजच आवाज आहे. बाह्य जगत आणि अंर्तजगत दोन्ही आवाजांनी भरलेली आहेत. बाह्य जगात ध्वनी प्रदूषण आणि अंतर्जगात विचारांचे प्रदूषण. मनातल्या विचारांना आवाज देणारे आहेत शब्द. विचारांना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे शब्द. विचारांना शब्दांचे रूप कसे द्यायचे हे मात्र प्रत्येकांनी ठरवायचे. […]

1 2 3 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..