नवीन लेखन...
Avatar
About ब्रह्माकुमारी नीता
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

चला नवीन सुरुवात करू या

आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, सर्वांच्याच मनात आशेची नवीन किरणे घेऊन येणारा हा दिवस. 2021 बघता बघता काळाच्या गर्भात विरून गेले. पण जीवनात अनपेक्षित बदल घडवून आणणारे हे वर्ष नक्कीच सर्वांच्या लक्षात राहणारे ठरले. कडू, गोड, आंबट,.. आठवणींनी भरलेल्या ह्या वर्षाला राम राम करून आता नवीन वर्षाची सुरुवात करू या. […]

शब्द

लहान असताना रेडिओवर ‘ आवाज के दुनिया के दोस्तो ’ असे बोलून गाण्याचा कार्यक्रम सुरु व्हायचा. खरंच ह्या जगामध्ये आवाजच आवाज आहे. बाह्य जगत आणि अंर्तजगत दोन्ही आवाजांनी भरलेली आहेत. बाह्य जगात ध्वनी प्रदूषण आणि अंतर्जगात विचारांचे प्रदूषण. मनातल्या विचारांना आवाज देणारे आहेत शब्द. विचारांना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे शब्द. विचारांना शब्दांचे रूप कसे द्यायचे हे मात्र प्रत्येकांनी ठरवायचे. […]

संस्कार आणि संस्कृति

कर्म आणि संस्कार ह्या मध्ये एक सूक्ष्म धागा आहे जर त्याला जाणीवपूर्वक, युक्तीने तोडण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये आले तर पूर्ण जीवनच बदलून जाईल. […]

विचारांची किमया

संकल्प एक बीज आहे त्याला फळीभूत व्हायला वेळ हा लागतो. सतत दृढतेचे पाणी देत राहिले तर ह्या विचारांची किमया काय आहे ते स्वतःच अनुभव कराल. […]

खरे सौंदर्य

काही वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तिची निवड त्याच्या गुणांनी, संस्कारांनी केली जायची पण आज गुण असो वा नसो रूपवान असणे गरजेचे मानले जाते. बुद्धी असो व नसो धनवान हवे ही मान्यता सगळ्यांमध्ये दिसून येते. परंतु खरे सौंदर्य कोणते ? आज आपल्याला जागोजागी beauty parlour दिसून येतात. शरीराचे सौंदर्य टिकवण्यासाठी किती खटाटोप करतात पण कोणते सौंदर्य जपावे ह्याची समज नाही. […]

अंतर्मुखी सदा सुखी

मनुष्याला जन्मताच ज्ञानेंद्रिया आणि कर्मेंद्रिया मिळाली. त्या द्वारे तो पाच तत्वानी बनलेल्या अनेक वस्तु, पदार्थ,.. ह्यांचा आनंद घेत असतो. पण मानवाला बाह्य सुखांची अशी सवय लागली आहे की आज ह्या सुखांच्या पाठीच त्याची धाव आहे. मृगतृष्णा समान जीवन झाले आहे. पाहणे, ऐकणे, खाणे, गंध आणि स्पर्श एक एक इंद्रियानी जितके आणि जसे सुख घेता येईल तसे […]

मृत्यू एक बंधनमुक्त अवस्था

निसर्गाचे काही शाश्वत नियम आहेत ज्याचे पालन सर्वानाच करावे लागतात. जन्म-मृत्यु आणि त्यानंतर पुन्हा जन्म हे परिवर्तन चालूच राहते. ह्या परिवर्तानाचा अनुभव सर्वाना आज नाही तर उदया करायचाच आहे. मृत्यु हा शब्द ऐकल्यावर स्वस्थ असणारा व्यक्ति ही घाबरून जातो कारण पूर्ण आयुष्यामध्ये ह्याची तयारी कोणीही करत नाही. […]

मनन शक्ति

मानवी मनाचा व त्यामध्ये असलेल्या अद्भुत शक्तींचा शोध लावण्याचा प्रयत्न विज्ञानाने केला आहे. आज ह्या मनाची गती खूप तीव्र झालेली बघतो. म्हणूनच मनोरुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एका मिनिटामध्ये २५ ते ३० विचार चालतात. पूर्ण दिवसामध्ये ४०,००० ते ६०,००० विचार येतात. जर ह्याच गतीने विचार चालत राहिले तर हे मन आणखी कमजोर होऊन जाईल. म्हणून मनाची शक्ती वाढवण्यासाठी मननशक्तीचा उपयोग करणे आवश्यक आहे. […]

बोले तैसा वागे

शब्दाची किंमत ठेवावी वा असावी. पण आज ह्या घोर कलियुगामध्ये शब्दाची काही किंमत नाही. शपथ, वचन, प्रतिज्ञा.. हे शब्द नाहीसे होऊन गेले आहेत. संबंधामध्ये दुरावा येण्याचे हे एक कारण आहे की मनुष्य जस बोलतो तस वागत नाही. कधी कधी विचार येतो की ‘ का बरं एखादा व्यक्ति असं करत असेल?’ काही कारण नसताना ही आज मनुष्याला खोटं बोलावं लागते. […]

बुद्धिबळ

बुद्धीबळ (chess) खेळणारा व्यक्ति आपल्या बुद्धीचा वापर करून, त्या खेळाचे नियम समजून त्या खेळामध्ये पारंगत होतो. त्याचप्रमाणे आपण ही ज्ञानाच्या आधाराने जीवनाचे नियम समजून, बुद्धीचा वापर करून प्रत्येक कार्य करावे. तेव्हाच आयुष्यामध्ये संतुष्टतेचे धन कमवू शकतो. स्थूल धनासोबत संतुष्टतेचे धन ही आपण बुद्धीबळाद्वारे प्राप्त करू शकतो. सुखी-समाधानी होऊ शकतो. […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..