नवीन लेखन...

चला नवीन सुरुवात करू या

 

आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, सर्वांच्याच मनात आशेची नवीन किरणे घेऊन येणारा हा दिवस. 2021 बघता बघता काळाच्या गर्भात विरून गेले. पण जीवनात अनपेक्षित बदल घडवून आणणारे हे वर्ष नक्कीच सर्वांच्या लक्षात राहणारे ठरले. ह्या कोरोंना ने आपल्याला खूप काही शिकवले. ‘वेळ पडली तर मनुष्य सर्व काही शिकतो’ ह्याचे प्रत्यक्ष रूप बघायला मिळाले. जी कामे कधीही केली नव्हती ती सर्व ह्या लॉक डाउन मध्ये करायला लागली. काहीनी त्याचा आनंद घेतला, तर काहींनी ‘मजबूरी का नाम जिंदगी’ म्हणत परिस्थिती ला स्वीकार केले. पण वेळेने ते करायला शिकवले. अश्या कडू, गोड, आंबट,.. आठवणींनी भरलेल्या ह्या वर्षाला राम राम करून आता नवीन वर्षाची सुरुवात करू या.

मनुष्याचे जीवन म्हणजे तडजोड ही आलीच. पण तडजोड नसून तोड-जोड वाले जीवन आहे. समस्या, संबंध, शरीर.. हयामुळे मनाने कितीही तुटले तरी पुन्हा उभे राहणे म्हणजे खरे जीवन. शून्यातून सुरुवात करावी लागली तरी नव्या आशेने, उत्साहाने करणारा मनुष्यच आयुष्याच्या खेळा मध्ये विजयी होतो. खूप काही गमावून ही सर्व काही मिळवण्याची जिद्द ज्याच्या मध्ये आहे तोच यशस्वी होऊ शकतो. म्हणून ह्या नव्या वर्षाची सुरुवात आपण नव्या संकल्पानी करूया.

तुम्हाला माहीत असेल गरुडाचे आयुष्य ७० ते ७२ वर्षाचे असते. या कालावधीत वयाच्या चाळीशी नंतर त्याची चोच दुबली होते. नख बोथट होतात, पंखावरची पिसे झडू लागतात. त्यामुळे गरुडाला वेगाने उडता येत नाही, भक्ष्य ही पकडता येत नाही. अश्या वेळी निरोगी जीवन जगण्यासाठी गरुडाला कठोर परिश्रम करावे लागतात. पाच महिन्याच्या अज्ञातवासात, निर्जन कडेकपाऱ्यात जाऊन राहावे लागते. ह्या दिवसांमध्ये तो आपली चोच कपारीवर आपटून त्रास सहन करतो. कालांतराने जुनी, दुबळी चोच गळून एक नवीन तीक्ष्ण, दणकट चोच फुटते. नव्या चोचीने बोथट झालेली नखं उपटून काढतो. या वेळीही त्याला असह्य वेदना होतात पण त्याही सहन करून काही दिवसातच टोकदार नखं उगवतात. या नखांचा उपयोग तो त्याच्या शरीरावरील जड पिसे उपटण्यासाठी करतो. आणि १५० दिवसांच्या खडतर कालावधी मध्ये असंख्य पीडा सहन करून गरुडाचा नवा जन्म होतो. नव्या दमाने, जोमाने, उत्साहाने तो पुढील आयुष्य जगतो. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुद्धा असा कालावधी आला असेल पण जून सर्व विसरून पुन्हा नव्या उम्मीदेने निरोगी, आशावादी, सकारात्मक दृष्टिकोणाने नव्या वर्षाचे स्वागत करूया.

‘जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरूनी जावे,
पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे

जे झाले त्याची खंत करत न ठेवता, जे शिल्लक राहिले त्याची वाह वाह करत भूतकाळाचा निरोप घेऊया. आज जे आहे त्यात समाधानी राहून प्रत्येक क्षण जीवंत पणे जगू या. जीवंत पणे म्हणण्या पाठी मागे हा उद्देश आहे की प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ या. वर्तमान श्रेष्ठ असेल तर भविष्य नक्कीच चांगले होईल. म्हणून ज्या चुका अजाणते पणी आपल्याकडून झाल्या त्याची पुनरावृती न व्हावी ह्याची काळजी जर घेतली तर नक्कीच मन सदैव आनंदी राहू शकेल. मनाची ओढाताण कमी होईल व भविष्याची सुंदर स्वप्ने साकारायला शक्ति ही मिळत राहील. फक्त वर्तमानात जगण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी. त्यासाठी रोज मनाला सकारात्मक विचारांची ऊब द्यावी. श्रेष्ठ विचारांनी स्वतःला भरपूर करावे. जसे घराबाहेर पडताना आपण आपले पाकीट बरोबर आहे की नाही, त्यात पुरेसे पैसे आहेत की नाही ह्याची तपासणी करतो तसेच रोज आपले मन श्रेष्ठ विचारांच्या पुंजी नी भरलेले आहे की नाही ते ही चेक करावे. शक्तिशाली विचारांचे धन जर बरोबर असेल तर कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यावर मात करू शकतो. मनाला काही नियमांचे बांध घालून चांगले प्रशिक्षित केले तर आयुष्यातले सर्व उतार- चढाव सुखरूप पार पाडू शकतो.

चला तर, नवीन वर्षाच्या ह्या प्रथम दिवशी स्वतःशीच प्रतिज्ञाबंध होऊ या.

१)कोणतेही दृश्य सामोरी आले तरी न डगमगता खंबीर होऊन प्रत्येक परिस्थितीला मी पार करेन.

२)प्रत्येक वेळी सकारात्मक राहून आयुष्याचा एक एक क्षण अविस्मरणीय बनावा असे मी स्वतःला बनवेन.

३)माझी आणि माझ्या कुटुंबाची जवाबदारी नीट पार पाडेन आणि त्यासाठी स्वतःला निमित्त समजून निश्चिंत होऊन पूर्ण करेन.

४) ईश्वराने जे काही दिले त्याचे मनापासून आभार व्यक्त करून, जे आहे त्याला बेस्ट बनवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन.

अश्या प्रकारे आयुष्याची नवीन सुरुवात करूया. नव्या संकल्पनेने नवे विश्व निर्माण करू या. ब्रहमाकुमारी संस्थे तर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

— ब्रह्माकुमारी नीता

Avatar
About ब्रह्माकुमारी नीता 39 Articles
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..