नवीन लेखन...

खरे सौंदर्य

Beautiful Girl face. Perfect skin. Close-up of an attractive girl of European appearance on dark background.
Beautiful Girl face. Perfect skin. Close-up of an attractive girl of European appearance on dark background.

आजचे युग स्पर्धेचे युग आहे. अनेक स्पर्धांमध्ये मनुष्य कळत-नकळत भाग घेत आहे. रूप आणि रुपया ह्या दोघांची स्पर्धा जास्त दिसून येते. आज व्यक्तिची पसंद आणि ओळख ह्या दोन गोष्टींनीच केली जाते. काही वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तिची निवड त्याच्या गुणांनी, संस्कारांनी केली जायची पण आज गुण असो वा नसो रूपवान असणे गरजेचे मानले जाते. बुद्धी असो व नसो धनवान हवे ही मान्यता सगळ्यांमध्ये दिसून येते. परंतु खरे सौंदर्य कोणते ? आज आपल्याला जागोजागी beauty parlour दिसून येतात. शरीराचे सौंदर्य टिकवण्यासाठी किती खटाटोप करतात पण कोणते सौंदर्य जपावे ह्याची समज नाही.

लहानपणापासून चांगले दिसावे ह्यासाठी खूप काही केले पण चांगले बनण्यासाठी काय करावे हे कोणी सांगितले नाही. अष्टावक्र सूकरात, अब्राहम लिंकन ह्यांनी आपल्या गुणसौंदर्य, विचारसौंदर्य आणि जीवनसौंदर्याने बाह्य सौंदर्यावर मात केली. एखाद्या व्यक्तिने कोणत्याही क्षेत्रामध्ये महान कार्य केले तर आपण त्याचा गुण गौरव करताना श्रीफळ अर्थात नारळ देतो. देवळामध्ये सुद्धा भगवंताला श्रीफळ चढवले जाते. ह्या नारळाला ‘श्रीफ़ळ’ म्हणण्या पाठीमागचा उद्देश ही बघितला तर आंतरिक सौंदर्यच आहे. बाहेरून कितीही कुरूप दिसत असणारे आतून किती गुणवान असू शकतात ह्याचे दर्शन ह्या श्रीफळाने होते.

एकदा राजा जनक ह्यांनी आपल्या दरबारात विद्वानांची सभा बोलावली. त्या सभेमध्ये अष्टावक्र ह्याचे आगमन झाले. पूर्ण सभा हसू लागली. त्यांचे हसणे बघून अष्टावक्र सुद्धा हसू लागले. राजा जनक ह्यांना हसण्याचं कारण मात्र कळलं नाही. ते त्या विद्वानांना विचारतात की तुम्ही का हसू लागले ? तेव्हा विद्वान उत्तर देतात की ‘ ह्या विद्वानांच्या सभेत वाकड्या-तिकड्या अंगाच्या व्यक्तीला बघून हसू सुटले.’ मग राजा जनकने अष्टावक्रला हसण्याचे कारण विचारले. अष्टावक्र उत्तरले कि ‘ राजा मला वाटले की तू विद्वानांची सभा बोलावली आहे पण ही तर चमारांची सभा आहे. चमार ह्या बाह्य चामडीला बघतात पण विद्वान मात्र आंतरीक सौंदर्याला बघतात. ‘

आज आपण ही कदाचित हेच करत आहोत, नाही का ? शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनामध्ये value education ला किती महत्व आहे ? मनुष्याची ओळख त्याच्या व्यवहाराने आणि गुणांनी होते पण आज आपण ह्या गोष्टींना एका पेटीमध्ये बंद करून ठेवले आहे जसे जुन्या वस्तू. सुंदर दिसणाऱ्या व्यक्ती, वस्तू आकर्षक तर असतात पण कधी-कधी त्या वस्तूंना, व्यक्तींना हे नाजूकपणे हाताळावे लागते. कारण नेहमीच तुटण्याची भीती असते. जसे काचेच्या वस्तू चांगल्या दिसतात म्हणून आपण त्याचा वापर करतो पण वापरताना अनेकदा ‘ माझ्या हातून तुटणार तर नाही ?’ हा विचार येतो. आज संबंधांमध्ये सुद्धा जितके रूपवान आणि धनवान तितकेच व्यवहारामध्ये नाजूक असल्याचे जाणवते.

खरंतर आपल्याला जे शरीर मिळाले ते आपल्या इच्छेने नाही पण जसे मिळाले त्याचा कधी-कधी आपण स्वीकार ही करत नाही. शरीराची उंची, रंग, बांधा जसे मिळाला त्याला आणखी आकर्षक बनवण्याची इच्छा जरूर असते पण आंतरिक सौंदर्य वाढवणे हे आपल्या हातात आहे. जीवनामध्ये जे प्राप्त झाले त्याबद्दल ईश्वराचे आभार आणि जसे मिळाले त्यापासून संतुष्ट राहण्याचा गुण आपल्यामध्ये असेल तर खूप काही मिळवण्याच्या संधीसुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकतात. समाजामध्ये वावरताना प्रत्येकाबरोबर adjust करणारा, मनमोकळ्या स्वभावाने सगळ्यांचे मन जिंकणारा व्यक्ती सर्वांनाच आवडतो पण संकुचित वृत्तीने वागणारा, अभिमानी, एक्कलकोंडा व्यक्ती ……. मात्र नावडता बनतो.

आज एखाद्या ऑफिसमध्ये काम करणारा व्यक्ती कसा हवा, जीवनसाथी कसा हवा ? जर प्रश्न केला तर आपण म्हणतो की इमानदार, गुणी, समजूतदार, मदत करणारा, पारदर्शी असणारा …….. हवा. वागणूक चांगली असेल तिथे बाह्यसौंदर्याला दुय्यम स्थान दिले जाते. आयुष्यात चांगला सोबती, चांगला डॉक्टर, चांगला वकील ……… मिळायला नशीब लागतं असे म्हटले जाते. ह्या ‘चांगला’ शब्दापाठीमागे त्या व्यक्तीचे गुण, विचार, चारित्र्य चांगले असावे हाच उद्देश असतो. त्याचबरोबर ‘आपण चांगले तर जग चांगले’ हे वाक्य ही कित्येकदा ऐकले असेलच. म्हणजेच आपण गुणी असलो तर आपल्याला ही गुणीजनांचा सहवास मिळतो. आणि जर नाही मिळाला तर आपल्या गुणांनी त्याच्यामध्ये सुद्धा परिवर्तन घडवू शकतो. जसे महात्मा गांधी, संत ज्ञानेश्वर …….. ह्यांच्या जीवनामध्ये दुर्जनांची कडू वागणूक असून ही शांतचित्ताने प्रत्येक समस्येला पार करताना आपण बघितले आहे. असे चारित्र्य सौंदर्य आपण ही जोपासावे ह्यासाठी सर्वप्रथम मानसिक स्थिरता आणि विचारांच्या सुंदरतेला वाढवण्याचा प्रयत्न करू या.

— ब्रह्माकुमारी नीता

Avatar
About ब्रह्माकुमारी नीता 44 Articles
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..