नवीन लेखन...

सहयोग

मनुष्य हा समूहात राहणारा प्राणी आहे. एकमेकांशी संबंध निर्माण करून जीवन जगणे हीच ह्या जीवनाची विशेषता आहे. आज एकटेपणा ही एक शिक्षा असल्याचे जाणवते. कोरोंना काळामध्ये जेव्हा home corontine केले गेले तेव्हा मोबाइल च्या माध्यमाने संपर्क असला तरी आपल्या आसपास लोकांचा वावर किती आवश्यक आहे हे समजले. माणूस कितीही सक्षम झाला तरी त्याला दुसऱ्यांचा सहयोग हा आवश्यक असतोच म्हणून महाभारतात दाखवले आहे की श्रीकृष्णा ने गोवर्धन पर्वत उचलला तेव्हा काही गोप सहयोग देण्यास पुढे आले. सहयोगाची गरज ही सर्वांनाच आहे.
आपल्या शरीराचे कार्य हे सुद्धा अवयवांच्या सहयोगानेच चालते. हाताची पाच बोटे ही सुद्धा आपले कार्य एकमेकांच्या सहयोगाने करतात. पाचही बोटे वेगळी असून एकमेकांशी जोडलेली आहेत म्हणजे प्रत्येक माणूस वेगळा असला तरी सर्वांशी जोडलेला आहे. म्हणून सहयोगाची निशाणी हात दाखवले जातात. तसेच डोळे, दात, हात, पोट .. .. ह्या सर्वांचा आपापसात चांगला मेळ असल्यावर सर्व कसे सुरेख चालते, तेच जर हयापैकी कोणी आडकाठी केली तर मात्र संपूर्ण स्वास्थ्य बिघडून जाते. आपल्याला सर्वात जवळचे आहे ते आपले शरीर, ते जर नीट कार्य करत असेल तर जगण्याचे सुख लाभते. योग ह्या शब्दाचा अर्थ आहे संबंध. जसे एखादा शुभ मुहूर्त काढायला जातो तेव्हा ग्रहांचा एकमेकांशी कसा संबंध आहे ते बघतो ज्याला आपण योग म्हणतो. ग्रहांचा संबंध चांगला असेल तर शुभ कार्ये होतात नाहीतर अशुभ मानले जाते. तसेच शरीराची क्रिया ही सुद्धा शुभ आणि अशुभ होण्यापाठी सहयोग किंवा वियोग काम करतात. शुभ कार्य सर्वांच्या सहमताने होऊ शकते.

कुटुंबातही सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. एखादा सदस्य जर हिरमुसले होऊन बसला असेल तर कार्याची गती मंदावते. तोच सगळ्यांचा सहयोग मिळाला की मोठे कार्य ही सहज होऊन जाते. घरात मंगल कार्य असू दे की काही अडचण येऊ दे पण सुख-दुःखात सर्वांची सोबत मिळणे महत्वाचे. आज कंपनी किंवा व्यापार ही करायचा झाला तर त्यात ही आपल्याला छोटे मोठे कार्य करणाऱ्या लोकांची मदत ही हवी असते. जर कंपनी मध्ये एकाच प्रकारचे काम करणाऱ्यांना भरती केले तर कोणतीच कंपनी चालू शकत नाही. कुटुंब, समाज, देश आणि विश्व ह्यांचे कार्य सर्व गटातल्या लोकांमुळे चालते. म्हणून पूर्वीच्या काळी गावातही कार्याची विभागणी केली जायची. ब्राह्मण वर्ग पूजा पाठ, क्षत्रिय वर्ण रक्षा, वैश्य व्यापार व शूद्र वर्ण साफ सफाई अश्या प्रकारे सर्वांच्या सहयोगाने गावातली कार्य व्यवस्था चालायची. ‘विश्व एक परिवार’, ‘ वसुवैध कुटुंबकम’ ची भावना म्हणूनच सर्वांमध्ये रुजवली गेली. पण हळूहळू परिस्थिती बदलत चालली आहे.

आज मनुष्याची मानसिकता बदलत चालली आहे. मी म्हणजे सर्वस्व असे समजणारी लोक ही आहेत. खूप वेळा काहींच्या तोंडून ऐकायला मिळतं की ‘मला कोणाची गरज नाही, मी एकटा राहू शकतो’, पण हे खरंच शक्य आहे का? कधी कधी अहंकारात येऊन आपण बोलून जातो पण जेव्हा काही करायची वेळ आली तर अनोळखी व्यक्तींची साथ घेऊन का होईना आपण कार्य करतो. पण कोणावाचून माझ काही अडत नाही हे मात्र खरं नाही. एका निर्जीव यंत्राला ही सहयोगाची आवश्यकता असते जसे यंत्राला चालवणारी विद्युत शक्ति, यंत्रामधील वायरिंग, बटन आणि अनेक प्रकरचे पार्ट्स .. ह्या सर्वांच्या सहयोगाने ते यंत्र चालत असते. जर त्यातला छोटासा पार्ट खराब झाला वा एक वायर जरी निघाली तरी मोठे यंत्र बंद पडते. ते व्यवस्थित कार्य करण्यासाठी सर्वच मदत करतात त्याच प्रमाणे आपले जीवन ही सुखरूप चालण्यासाठी सकाळ पासून कार्य करणारे जसे दूधवाला, पेपरवाला, कचरेवाला.. .. ह्यांची ही मदत हवीच.

आपण सहयोग देण्या व घेण्याची अपेक्षा शक्यतो आपल्या माणसाकडून करतो. जिथे संबंधामध्ये जवळीक आहे अश्या व्यक्तीला मनापासून सहयोग देतो. मग तो वस्तु, पदार्थ असो किंवा भावनिक आधार असो देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. कोणी दुःखी असेल व आपण त्याच्या भावना ऐकून घेतल्या तरी त्या व्यक्ति साठी हा ही खूप मोठा सहयोग असतो. एखाद्याला वेळ, आपलेपणा जरी दिला तरी त्याला त्याचे समाधान मिळते. त्यांना समाधान मिळणे हा सुद्धा सहयोग नाही का? हे जीवन जरी प्रत्येक जण आपल्या परीने जगत असले तरी सर्वाची सोबत लागते. म्हणून सहयोग दयावा व घ्यावा.

— ब्रम्हाकुमारी नीता.

Avatar
About ब्रह्माकुमारी नीता 44 Articles
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..