नवीन लेखन...

अमेरिकेतील समुद्रकिनारे

समुद्रकिनाऱ्यावरील शुभ्र, मुलायम वाळू त्याचे सौंदर्य अधिकच वृद्धिंगत करीत असते. क्षितिजापाशी दूरवर अस्ताचली जाणारे सूर्यबिंब सौंदर्यात अधिकच भर घालीत असते आणि विविध जहाजे. शिडाच्या होड्या चित्रात रंग भरीत असतात. समुद्रदर्शन हा एक विलक्षण आनंददायक अनुभव असतो. मग तो आपल्याकडील असो वा अमेरिकीतील-काही फरक पडत नाही. […]

‘एक अभूतपूर्व सामना’

हिंदुराव धोंडे पाटील (निळू फुले) व मास्तर (श्रीराम लागू) यांच्यामधील रंगलेला ‘सामना’ पाहिलेला नाही असा मराठी सिने रसिक विरळाच. या सिनेमातली या दोन अतिशय ताकदीच्या कलाकारांमधील ही अभिनयाची जुगलबंदी म्हणजे आपल्यासारख्या चित्रपट प्रेमींना मेजवानीच आहे. […]

धार्मिक संस्कृतीच्या खुणा

भारत माझा देश आहे व माझे देशावर प्रेम आहे. दक्षिणेतील कन्याकुमारी पासून उत्तरेतील हिमालयातील काराकोरम पर्वत रांगातील नयनरम्य काश्मीर – हिमाचल व उत्तराखंडचे बर्फाच्छादीत सौंदर्य- पश्चिमेस समुद्रात बुडालेली द्वारका व ईशान्य भारताच्या सात भगिनी ! चारी बाजूंनी विखुरलेल्या वैविध्यपूर्ण नैसर्गिक सौंदर्याबरोबरच येथे असलेल्या हजारो धार्मिक स्थळांचेही गारुड भारतीय मनावर पसरले आहे. हे सर्व अनुभवायचे असेल. […]

सोशल प्रोजेक्ट

बारा वर्षांचा राजन मराठी पाचवीच्या वर्गात होता. मधल्या सुट्टीत तो इतर मुलांसोबत डबा खाण्याऐवजी शाळेच्या मैदानात जाऊन विशाल वडाच्या सावलीत अर्धा तास बसत असे. घंटा होण्यापूर्वी पोटभर पाणी पिऊन पुन्हा वर्गात येऊन सगळ्यांमध्ये मिसळून जात असे. त्याचे मित्र अजय , विशाल, आनंद त्याला नेहमी आग्रह करायचे की,” तू डबा तर आणत नाहीस पण आमच्यातला थोडा थोडा […]

अमेरिकेतील नगररचना

अमेरिकेसारख्या राष्ट्राचा इतिहास तर गेल्या तीनचारशे वर्षांचा. शिवाय ते प्रगत राष्ट्र. इथल्या नगररचना, रस्ते, वाहतुकी यांचा पूर्णपणे विचार आधीच केला गेलेला. याचे एक स्पष्ट उदाहरण म्हणजे सॅन फ्रान्सिस्को देता येईल. हे शहर तसे डोंगराचा एक भाग समुद्राला मिळतो अशा ठिकाणी वसवलेले. […]

चिमणी..

माघ महिन्यातील श्रीगणेश जयंतीच्या दिवशी मला ‘चिमणी’ची न चुकता आठवण होतेच. कमर्शियल जाहिरातींची कामं करताना अनेक स्त्री-पुरुषांशी संपर्क आला‌. कामानिमित्तानं आलेला हा संपर्क, कुणाशी काही दिवसांचा तर काहींशी अनेक वर्षांसाठी असायचा.
रमेश, वेलणकरांकडे कामाला असतानाची गोष्ट आहे. […]

देवमाशांचा माग

देवमासे वर्षभराच्या काळात आपल्या वास्तव्याची जागा बदलत असतात. त्यांच्या वास्तव्याच्या जागेत होणारा हा बदल वेगवेगळ्या कारणांसाठी असू शकतो. काही जातींचे देवमासे हे उन्हाळ्याच्या काळात, जिथे खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं अशा किनाऱ्यापासून दूरच्या ठिकाणी जातात; तर थंडीच्या दिवसात ते प्रजोत्पादनाच्या दृष्टीनं अनुकूल असणाऱ्या किनारी भागात राहतात. […]

रुग्ण स्वभाव दर्शन

अभ्यासामध्ये आपल्या परीक्षेच्या वेळी कधी अभ्यास केला नसेल परंतु डॉक्टर कडे जाताना आपल्या आजाराचा इंटरनेट वरती सखोल अभ्यास करून आलेले महा विद्वान पेशंट…. […]

गारेगार बर्फाचा गोळा

उन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर दिसतो तो गारेगार बर्फाचा गोळा. त्याशिवाय उन्हाळा अपूर्णच वाटतो. काल रस्त्यावर बर्फाचा गोळा विकणारा आला होता. शेजारीन म्हटली, ” घ्यायचा का बर्फाचा गोळा ” ? क्षणभर मनात उत्तर आलं होतं लगेचच ” हो ” म्हणून !! पण मनाला आवर घालत म्हटलं , ” नको !! आता ते येतील इतक्यात. आणि त्यांना नाही आवडत रस्त्यावरचे गोळे किंवा कुल्फी घेतलेली !! ” शेजारीन म्हटली ते यायच्या आत घ्या पटकन खाऊन. […]

फोनाप्पा

आपल्या दैवताशी इतका वेळ अनपेक्षित संभाषण. आप्पांना हे सगळं स्वप्नवत वाटत होतं. या सुखद धक्क्यामुळे आप्पा एकदम निःशब्द झाले होते. तरीही धीर करून म्हणाले “मै क्या बोलू समझ मे नही आ रहा. मै आपको हमारे आंजर्ले गाव मे आनेका निमंत्रण देता हू. यहां का निसर्ग और समुद्र आपको जरूर अच्छा लगेगा. […]

1 60 61 62 63 64 102
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..