नवीन लेखन...

मैफील

गेली पंधरा मिनीटे ती पियानो वाजवत होती. वाजवता वाजवता ती मधेच थांबली.. तिने अचानक विचारलं….. ‘काही आठवलं का रे तुषार?’ […]

पादुका

दरवर्षी पालखी गेल्यावर होते तशी शंकरराव व सुषमाताईंची अगदी सैरभैर अवस्था झाली. स्वामींवर त्यांच्या घराण्याची अतूट श्रद्धा..तीन पिढ्यांपासून. आज गेले चाळीस वर्षे स्वामींच्या पादुका तीन दिवस त्यांच्या घरी मुक्कामी असायच्या. ते तीन दिवस त्यांच्या घरी जणू उत्सव असायचा. दूरदूरवरुन नातेवाईक व आप्तेष्ट दर्शनाला यायचे..दर्शन घेउन तृप्त व्हायचे. […]

पार्क आणि हिरवळ

हल्ली मी सकाळी न चुकता पार्क मधे फिरायला जातोच…!! म्हणजे पूर्वीही जायचो.पण त्यात सातत्य नव्हतं..आता आहे. आता असं काय वेगळं घडलंय असे तुम्ही विचाराल ना? (विचारा हो..!! तसंही मी सांगणारच आहे तुम्हाला..) […]

‘रंजोगम’ – खय्याम साहेब !

खय्याम साहेब तसे एस-जे, एस.डी, एल-पी किंवा आर.डी. यांच्यासारखे खूप फॕन फाॕलोईंग असणारे संगीतकार नव्हते. तसे त्यांचे नावही फक्त दर्दी कान-सेनांनाच ठाउक आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने चटका लागलाच पण त्याचवेळी त्यांच्याविषयी त्यांच्या संगीताविषयी एवढं भरभरुन दाखवले गेले व लिहीले गेले हे पाहून मनाला खरंच समाधान वाटलं त्यांच्या निधनानंतर मी जे काही थोडे कार्यक्रम पाहिले व लेख वाचले त्यात खय्याम साहेबांची बरीच गाणी उल्लेखली गेली. […]

‘अधूरी एक कहाणी’

राधा.. ठाकूर बलदेवसिंगची विधवा सून.. लग्न होउन अजून अंगाची हळदही उतरली नव्हती.. तोवर तिच्या संसारावरच वीज कोसळली.. त्या राक्षसाकडून तिच्या सासरची सारी लोक मारली गेली.. त्यात तिचं कुंकू देखील पुसले गेले.. जन्मभरांच वैराग्य गाठीशी घेउन जगणं नशीबी आलं होतं तिच्या.. पण अशा वैराण वाळवंटात एक सुखद वा-याची झुळूक आली.. जय च्या रुपाने.. ठाकूरने गब्बरला जेरबंद करण्यासाठी […]

गोष्ट_जगातल्या_सर्वकालीन_सर्वोत्कृष्ट_सिनेमाची

जिथे सर्वोत्तम दहा सिनेमांची यादीच बनवणे मुळात अवघड, तिथे सर्वकालिक सर्वोत्तम सिनेमा ठरवणे किती अवघड ना?
आपल्यापैकी प्रत्येकाचे आवडते चित्रपट वेगवेगळे असतील..शंकाच नाही. या विषयावर उहापोह करताना सहजीच सामोरे येणारे काही प्रश्न असे आहेत.. […]

‘एक अभूतपूर्व सामना’

हिंदुराव धोंडे पाटील (निळू फुले) व मास्तर (श्रीराम लागू) यांच्यामधील रंगलेला ‘सामना’ पाहिलेला नाही असा मराठी सिने रसिक विरळाच. या सिनेमातली या दोन अतिशय ताकदीच्या कलाकारांमधील ही अभिनयाची जुगलबंदी म्हणजे आपल्यासारख्या चित्रपट प्रेमींना मेजवानीच आहे. […]

यारी है इमान मेरा

तीन अतिशय वेगळ्या स्वभाव वैशिष्ट्य असणारे मित्र..त्यांची घट्ट मैत्री..त्यांचे स्वतःचे प्रेमाविषयीच्या, रिलेशनशिप विषयीच्या वेगवेगळ्या संकल्पना.. त्यांच्या करियरच्या वेगवेगळ्या वाटा. तरीही तिघे एकत्र येतात तेंव्हा ‘मैत्रीचा सोहळा’ सजरा करतात असे हे तीन मित्र.. सिद्धार्थ, समीर आणि आकाश. […]

गंधर्व_गायक’ मुकेश

मी पूर्वी पुण्यात सणसवाडीला ज्या कंपनीत काम करायचो तिथे पाटील नावाचे अकौंट्स मैनेजर आमच्याबरोबर होते. कंपनीच्या तवेरा मधून येता जाता गाडीत गाणी सुरु असायची. तेंव्हा रेडिओ मिर्ची आणि विविधभारती ही दोनच एफ एम रेडिओवर वाजायची. […]

“बुनियाद-टेलिव्हिजन सिरीजचा शोले”

कासवाच्या गतीने वाढणाऱ्या भारतीय टेलिव्हिजन क्षेत्राला खरा बुस्टर मिळाला तो ऐंशीच्या दशकात. १९८२ मधे दिल्लीतील एसियाड गेम्स च्या निमीत्ताने क्रिडा स्पर्धेचे थेट प्रक्षेपण, १९८३ मधे एकदिवसीय क्रिकेटमधे भारतीय टीमचा विश्व विजय, आणि १९८४ मधे पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर लाइव्ह टेलेकास्ट झालेला त्यांचा अंत्यसंस्काराचा सोहळा, या सर्व घटनांमुळे भारतात घरोघरी टेलिव्हिजनचा प्रसार झपाट्याने होउ लागला होता. टिव्ही […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..