नवीन लेखन...

निरंजन – भाग १

एकाग्रतेने मनाची स्थिरता वाढते आणि स्थिरता वाढल्यामुळे मन एकचित्त होउन हाती घेतलेल्या कार्यामध्ये आपले आपसुकच चिंतन वाढते आणि जेव्हा चिंतन वाढते तेव्हा नैसर्गिकरित्या आपाल्याला खुप सार्‍या वेगवेगळ्या कल्पना आपोआपच सुचतात. ज्यामुळे कामाची गती वाढते, त्या कामामध्ये कोणतीही अडचण येत नाही. आणि हाती घेतलेले काम खुप सुंदर पद्धतीने पार पाडले जाते.

ही जी एकाग्रता आहे ती प्रत्ये़कामध्ये आहे, फक्त फरक हा इतकाच कि, आपण ती योग्य मार्गावर उपयोगात आणत नाही. एकाग्रतेने केलेले प्रत्येक कार्य हे खुप सुंदर पद्धतीने पार पाडले जाते. कित्येकदा आपण एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करतो परिणामी त्यातले एकही कार्य सुरळीत पार पाडले जात नाही आणि निकाल मात्र शुन्य तर इथे आहे आपल्यामधल्या एकाग्रतेचा अभाव….. कारण जेव्हा आपण एकाच वेळी खुप सार्‍या जबाबदार्‍या स्वत:वर घेतो तेव्हा आपण त्यात तितक्याच क्रियेंमध्ये वाटले जातो. आणि तितक्याच विचारांनी कार्यरत राहतो. अशा वेळी जर आपले लक्ष एखाद्या वेगळ्याच विचारांनी भरले गेले किंवा आपले लक्ष भटकले गेले तर मात्र आपण आपल्या क्रियेमध्ये परिपुर्ण एकाग्रता साधु शकत नाही. त्यामुळे आपण आपले संपुर्ण चित्त एका ठिकाणी लावु शकत नाही. परिणामी कार्य विस्कळीत होते.

“चित्त थार्‍यावर नाहिये” असं आपण आपल्या नेहमीच्या दैन्ंदिन चर्चेत अनेकदा ऐकतो, कधी-कधी काम अपुर्ण राहिल्यावर तर कधी एखाद्याला दिलेली जबाबदारी त्याने विस्कळीतपणे पार पाडल्यावर. “चित्त थार्‍यावर नसणे” म्हणजेच “कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित नसणे”, एकाग्रता नसणे…

अनेकदा आपण अनुभवलं असेलच की कित्येकजण खुप घाई करुन काम करतात फक्त लवकर काम आटोपण्यासाठी, पण तसे होत नाही कारण घाई करुन आपण एकाग्रता साधु शकत नाही. याउलट आपण ते काम कितीतरी पटीने वाढवुन ठेवतो. कारण घाईघाई ने अचुकता साधता येत नाही, जितका वेग महत्वाचा आहे त्याहुनही कितीतरी पटींनी महत्वाची आहे ती आपण केलेल्या कार्यामधली अचुकता…. आणि ही अचुकता साधता येते ती फक्त एकाग्रतेने…..अजुन एक विषय म्हणजे सध्याच्या काळातील लोकांचे विचार हे जितके गतीमय झाले आहेत तितकाच तो अस्थिर ही झाला आहे आणि त्यामुळेच मनाची चंचलता खुपच वाढली आहे. याच चंचलतेचा परिणाम आज नातेसंबधांवर सुदधा दिसुन येत आहे. कारण सतत प्रत्येकाची आवड निवड ही त्यांच्या बदलत्या विचारांप्रमाणे बदलत चालली आहे. इतकेच नाही तर आपण स्वतः ही स्वतःपासुन दुरावले गेले आहोत. कधीकधी कित्येकदा आपण इतरांची विनाकारण चर्चा करत बसतो काहिही कारण नसताना. तर कधी कधी इतरांशी तुलना करुन स्वतःहुन स्वतःचे विचार वाढवुन घेतो. आज जी एकाग्रता आपण इतरांच्या चर्चेमध्ये साधुन बसलो आहोत. तिच जर आपण आपल्या स्वतःवर साधली, स्वतःच्या श्वासांवर साधली तर नक्कीच चित्त केंद्रित होईल, लक्ष्य साधता येईल, विचार कमी होतील, वाईट स्वभाव बदलेल, वाईट सवयी बदलतील, जीवनाचे ध्येय कळेल, जीवनाचे व्यवस्थापन कळेल, वेळेचे महत्व कळेल. कार्य अर्थपुर्ण होतील. खुप काही सुंदर बदल घडतील. म्ह्णजेच कुठेतरी आपल्याकडे एकाग्रता ही जाग्रुत आहे पण ती कुठे उपयोगात आणली पाहीजे याचं वळण मात्र खुपच चुकतय. याची दिशा चुकतेय.

योग्य ती दिशा निवडण्यासाठीच आपल्याला योग्य अशा मार्गदर्शकांची जीवनामध्ये अत्यंत गरज असते. योग्य तो मार्ग आणि योग्य ती दिशा सुचवणारी व्यक्ती ही फक्त ध्यानगुरु असते. अर्थातच ही व्यक्ती संपुर्ण एकाग्र चित्त असणारी असते. एकाग्रतेवर विजय मिळवलेली असते. संपुर्ण स्थिर असते. अशी संपुर्ण स्थिर, एकाग्र चित्त असणारी व्यक्तीच चंचलतेला अंकुश लावु शकते कारण स्थिरतेमध्येच क्षमता आहे अस्थिरतेवर मात करण्याची जशी प्रकाशामध्ये क्षमता आहे अंधकाराला दुर करणाची…………..अशी मार्गदर्शक व्यक्ती म्हणजेच ध्यानगुरु, एकाग्रतेवर ध्यान असणारे गुरु…

गुरु द्रोणाचार्यांच्या नजरेत अर्जुन हे श्रेष्ठ धनुर्धारी होते हे फक्त अर्जुनांच्या एकाग्रतेमुळेच. आपल्या शिष्यांच्या धनुर्विद्येचे परिक्षण करताना त्यांनी एकाग्रता पाहिली ती फक्त अर्जुनाकडे. कारण अर्जुनाने एकाग्रतेने लक्ष्य साधले होते. तसेच एकलव्य ही श्रेष्ठ धनुर्धर होते ज्यांनी न पाहता फक्त ध्वनीवर एकाग्रता ध्यान साधले होते. त्यांनी भुंकणार्‍या श्वानाचा आवाज त्याला इजा न होउ देता भुंकणे बंद केले होते. यावरुन आपल्याला स्पष्ट झालेच असेल कि एकाग्रता हि किती महत्वाची आहे. जर आपण नेहमी २० ते २५ मिनिटे एकाग्रता ध्यान केले तर जीवनामध्ये अकल्पनीय असे बदल नक्कीच घडुन येतील. जीवनामध्ये असे बदल घडवुन आणण्यासाठी एकाग्रता ध्यान खुप महत्वाचे आहे.

– स्वाती पवार

Avatar
About स्वाती पवार 57 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..